आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief : Akshay Kumar To Reprise His Role Of God In Oh My God, RSVP Announces Horror Comedy Kakuda Starring Riteish Deshmukh, Sonakshi Sinha, Saqib Saleem

बॉलिवूड ब्रीफ:'ओह माय गॉड 2'मध्ये पुन्हा एकदा देवाच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, रितेश, सोनाक्षी आणि साकिब स्टारर 'ककुडा'ची झाली घोषणा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

'ओह माय गॉड 2' या चित्रपटाची चर्चा बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटाविषयी आता एक मोठे अपडेट समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ओह माय गॉड’ चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, यावेळी परेश रावल नव्हे तर पंकज त्रिपाठी अक्षय कुमारसोबत दिसणार आहेत. इतकेच नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शकही बदलले आहेत. 'ओह माय गॉड' चे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले होते, तर 'ओह माय गॉड 2'चे दिग्दर्शन अमित राय करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाच्या उर्वरित कलाकारांची नावेही फायनल झाली असून यामी गौतम या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल. या चित्रपटासाठी अक्षय कुमारने आपल्या बिझी शेड्युलमधून अमित राय यांना केवळ 15 दिवस दिले आहेत. त्याचवेळी अक्षय कुमार 'ओह माय गॉड 2' मध्ये देवाच्या भूमिकेत दिसणार आहे.

RSVP ने केली हॉरर-कॉमेडी 'ककुडा'ची घोषणा; या डायरेक्ट-टू-डिजिटल चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आदित्य सरपोतदार

आरएसवीपीने आपल्या होमग्रोन हॉरर-कॉमेडी 'ककुडा' या चित्रपटाची घोषणा केली असून रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम स्टारर या चित्रपटाचे शूटिंग सोमवारपासून सुरू झाले आहे. 'ककुडा' या चित्रपटातून मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हिंदीमध्ये पदार्पण करत आहेत. या आधी त्यांनी प्रेक्षक आणि समीक्षकांनी गौरवलेले 'क्लासमेट्स', 'मौली' आणि 'फास्टर फेणे' सारखे चित्रपट दिले आहेत. 'ककुडा'मध्ये कॉमेडी आणि स्पूक यांचे मिश्रण असून, एका गावाला मिळालेल्या विचित्र अभिशापाची ही कहाणी आहे. या इलेक्ट्रिफाइन्ग तिकडीचा सामना एका अशा भूतासोबत होतो, ज्याच्या सोबतच्या धम्माल रोलरकोस्टर प्रवासात अंधविश्वास, परंपरा आणि प्रेमावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहते. चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले की, "मी रोनी स्क्रूवाला यांच्यासोबतच्या या सहयोगासाठी अतिशय उत्साहित आहे. हा चित्रपट इतर व्यावसायिक चित्रपटांच्या तुलनेत कणभरदेखील कमी नाही. कास्टिंग अतिशय चोख आहे आणि कथानक तुम्हाला तुमच्या खुर्चीला खिळवून ठेवेल." रितेश देशमुख म्हणतो की, 'मला स्वतःला हॉरर-कॉमेडी शैली आवडते आणि 'ककुडा' माझ्यासाठी एक घोस्टबस्टरचा भाग आजमावण्याची सुरेख संधी आहे." या डायरेक्ट-टू-डिजिटल हॉरर-कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग गुजरातच्या विविध भागात सुरू झाले असून 2022 च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सोनम कपूरने राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'द स्ट्रेंजर इन द मिरर' या पुस्तकाचे कव्हर केले रिलीज

राकेश ओमप्रकाश मेहरा एक असे नाव आहे जे मागील काही वर्षांपासून बॉलिवुडच्या अनेक उत्तम कालाकृतींसोबत जोडले गेले आहे. बहुआयामी लेखक-दिग्दर्शक, ज्यांनी इंडस्ट्रीला 'रंग दे बसंती', 'दिल्ली 6', आणि 'भाग मिल्खा भाग' सारख्या अनेक उत्तम चित्रपट दिले असून आता आपले आत्मचरित्र, 'द स्ट्रेंजर इन द मिरर'च्या अनावरणासाठी सज्ज झाले आहेत, ज्याच्या मुखपृष्ठाचे अनावरण सोनम कपूर हिच्या हस्ते करण्यात आले. आत्मचरित्राचे फॉरवर्ड ए. आर. रहमान यांनी लिहिले आहे ज्यांनी दिग्दर्शकासोबत 'रंग दे बसंती' आणि 'दिल्ली 6' सारखे दोन चित्रपट केले आहेत. पुस्तकासाठी ‘आफ्टरवर्ड’ आमिर खानने लिहिले आहे. सोनम आणि राकेश समीक्षकांद्वारे गौरवलेला चित्रपट 'दिल्ली 6' आणि 'भाग मिल्खा भाग' साठी एकत्र आले होते. अभिनेत्रीने आता आपल्या सोशल मीडिया हँडलवर आपल्या पूर्व-दिग्दर्शकाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण केले, ज्याला तिने कॅप्शन दिले आहे, "फर्स्ट लूक! मेहरा इंडस्ट्रीतील कोणत्याही अभिनेत्यासाठी एक मेंटर आहेत. स्क्रीनवर त्यांचा उत्साह आणि दृष्टि समजून घेणे, खरोखरच एक जादुई अनुभव असेल! आता ते #TheStrangerInTheMirror च्या माध्यमातून आपल्या दृष्टिकोनाला आणि आजवरच्या प्रवासाला सार्वत्रिक करत आहेत.' 27 जुलै रोजी हे आत्मचरित्र लाँच होणार आहे.

पडद्यावर आणि प्रत्यक्ष जीवनात एका आईच्या भूमिकेबद्दल सुप्रिया पिळगांवकरने आपले विचार मांडले

आईच्या प्रेमाला तोड नसते. ते शुद्ध, निरपेक्ष आणि चिरंतन असते. तुम्ही कितीही मोठे झालात किंवा कितीही दूर गेलात, तरी ती कोणत्याही सीमा पार करून तुमच्यावर प्रेम करत असते. अशीच एक आई, जी आपल्या परिचयाची आहे, ती म्हणजे, ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर. जी प्रत्यक्षात एका मुलीची आणि पडद्यावर एका मुलाची आई आहे. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी' मालिकेत तिने साकारलेल्या ईश्वरीमध्ये एका वेगळ्या छटेची आई दिसते. पडद्यावर आई साकारताना आणि प्रत्यक्षात मातृत्वाचा अनुभव घेताना काय वाटते, याबद्दल सुप्रियाने आपले मत मांडले आहे. सुप्रिया पिळगांवकर म्हणजे ईश्वरी म्हणते, “एक आई म्हणून ईश्वरी आपल्या मुलांवर सारखेच प्रेम करते, पण आपणा सर्वांना माहीतच आहे की, देव (शहीर शेख) कडे तिचा विशेष कल आहे. आपल्या आणि आपल्या मुलाच्या नात्यात ती कोणालाच येऊ देत नाही. माझ्या मते, प्रेम आणि काळजी दाखवण्याची प्रत्येक आईची आपली खास पद्धत असते. शेवटी एका आईची इच्छा आपल्या मुलाने आनंदात असावे आणि जीवनात त्याची भरभराट व्हावी हीच तर असते. देवबद्दल ईश्वरीला हेच वाटत असते.” याबद्दल आणखी बोलताना ती म्हणाली, “मला एक मुलगी आहे आणि तिने आई म्हणून माझी निवड केली याबद्दल मला कृतज्ञता वाटते. तिच्या बाबतीत मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. तिच्या जीवनात ती जे निर्णय घेते, त्यात मी तिच्यावर विश्वास ठेवते आणि तिला आधार देते. ती एक सुंदर आणि स्वतंत्र स्त्री झालेली पाहताना माझ्या मनाला खूप आनंद होतो. आपल्याला हे माहीत असते की एक ना एक दिवस आपली मुले पाखरासारखी घरट्यातून उडून जाणार आहेत, पण तरीही एका आईसाठी ती मुले नेहमीच जीवाभावाची राहतात.”

बातम्या आणखी आहेत...