आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief: Ashutosh Rana To Reprise War Role In Shah Rukh Khan Starrer Pathan, Amitabh Bachchan Starrer 'Chehre' Will Not Release On August 28

बॉलिवूड ब्रीफ:शाहरुख खानच्या 'पठाण'मध्ये झाली आशुतोष राणाची एंट्री, अमिताभ बच्चन स्टारर 'चेहरे' 28 ऑगस्टला रिलीज होणार नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाशी संबंधित नवीन अपडेट म्हणजे आशुतोष राणा यांनीही या चित्रपटात प्रवेश केला आहे. आशुतोष राणा यांनी हृतिक रोशनच्या 'वॉर'मध्ये आर्मी कर्नलची दमदार भूमिका साकारली होती. दोन्ही चित्रपट यशराज फिल्म्सचे आहेत. म्हणूनच निर्मात्यांनी या चित्रपटासाठी आशुतोष राणा यांच्याशी संपर्क साधला. 'पठाण'मध्ये शाहरुख पहिल्यांदा एका गुप्तहेर अर्थात रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत.

2. अमिताभ स्टारर 'चेहरे' 28 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही

पीव्हीआरने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची माहिती दिली. या पोस्टमध्ये PVR ने सांगितले आहे की, अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी आणि रिया चक्रवर्ती यांचा कोर्टरुम ड्रामा चित्रपट 'चेहरे' 28 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण, पीव्हीआरच्या या पोस्टवर निर्माता आनंद पंडित यांनी दैनिक भास्करला सांगितले, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याचबरोबर त्यांनी 28 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात 'चेहरे' रिलीज होण्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. दिग्दर्शक रुमी जाफरी दिग्दर्शित 'चेहरे'मध्ये अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, धृतमन चॅटर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

3. हर्षच्या आगामी चित्रपटात स्टंटचे प्रशिक्षण देणार फ्रँक टॉरेस

नीलेश सहाय आणि हर्षवर्धन राणे एका अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटावर या वर्षाअखेर काम सुरु होणार आहे. या चित्रपटात स्टंट शिकवण्यासाठी हॉलिवूडच्या फ्रँक टॉरेस यांना घेण्यात आले आहे. याविषयी फ्रँक सांगतात, 'मी माझ्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात काम करण्यासाठी उत्साहित आहे. यात नॉन स्टॉप अॅक्शन दिसणार आहे. अशा हाणामारीसाठी मी ओळखला जातो.' यापूर्वी फ्रँक यांनी हॉलिवूडच्या अ स्टार इज बॉर्न, 'पॉइंट ब्लँक’, 'अमेरिकन हस्ल’ आणि 'काॅन्ग: स्कल आयलँड’सह अनेक चित्रपटात स्टंट को-ऑर्डिनेट म्हणून काम पाहिले आहे.

4. सप्टेंबरमध्ये 'शाब्बास मितू'चे शूटिंग सुरु करणार तापसी पन्नू

अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा 'शाब्बास मितू' या चित्रपटासाठी मैदानावर उतरणार आहे. नैनितालमध्ये सुरु असलेल्या 'ब्लर' चित्रपटाच्या चित्रीकरणावर ती सध्या लक्ष देत आहे. मात्र नैनितालला जाण्यापूर्वी तिने श्रिजित मुखर्जीला भेटून 'शाब्बास मितू' चित्रपटावर चर्चा केली. अलीकडेच एका मुलाखतीत तापसीने गेल्या एक वर्षापासून चित्रपटासाठी केलेली तयारी आणि नोट्सबद्दल सांगितले. 'ब्लर'चे काम पूर्ण होताच ती सप्टेंबरच्या सुरुवातीला या खेळावर आधारित चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. माहितीनुसार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरु होणार होते, परंतु महामारीच्या दुस-या लाटेमुळे टीमने काम थांबवले होते. श्रिजित सध्या मुंबईत आहेत.

5. अलाया एफ 'फ्रेडी'मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसणार

कार्तिक आर्यनच्या 'फ्रेडी' चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. शशांक घोष दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला कार्तिकने 1 ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. मात्र या चित्रपटासाठी अभिनेत्री नाव जाहीर करण्यात आले नव्हते. आता मात्र सूत्रानुसार, अलावा एफ फ्रेडीची अभिनेत्री असू शकते, अशी चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलावा एफ लवकरच कार्तिक आर्यनसह चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे. अलाया एफची या चित्रपटात एक भावपूर्ण भूमिका आहे. तिला चित्रपटाची ऑफर आली तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. एकता कपूर आणि शशांक घोष यांनी संयुक्तपणे अलाया एफची निवड केली आहे.

बातम्या आणखी आहेत...