आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief: Ayushmann Khurrana Begin The Script Reading Session For ‘Doctor G’, Kartik Aaryan Buys A Swanky Lamborghini Worth Rs 4.5 Crs

बॉलिवूड ब्रीफ:आयुष्मान-रकुलने सुरु केले 'डॉक्टर जी'चे स्क्रिप्ट रिडींग, ‘पठाण’च्या सेटवरून समोर आला जॉनचा पहिला फोटो, कार्तिकच्या नवीन गाडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी

आयुष्मान खुराणा आणि रकुल प्रीत सिंह यांनी त्यांच्या आगामी डॉक्टर जी या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. मंगळवारी दोघेही चित्रपटाच्या स्क्रिप्ट वाचन सत्राला उपस्थित होते. हा एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. ज्याचे शूटिंग पुढील महिन्यात सुरु होणार आहे. यात आयुष्मान आणि रकुल पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. आयुष्मान डॉ. उदय गुप्ताच्या भूमिकेत तर रकुल डॉ. फातिमा या वैद्यकीय विद्यार्थिनीची भूमिका साकारताना दिसणार आहे. याचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करणार आहेत.

  • जॉन अब्राहमने सुरू केले ‘पठाण’चे शूटिंग

शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटात जॉन अब्राहमही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच त्याने चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली. मंगळवारी सेटवरून त्याचा एक फोटो समोर आला तोे नंतर व्हायरल झाला. मात्र, फोटोमध्ये जॉन सामान्य दिसत आहे. तो कॅज्युअल कूल लूकमध्ये असून चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद त्याच्यासोबत दिसत आहे. एसआरके आणि जॉन व्यतिरिक्त दीपिका पदुकोणसुद्धा या चित्रपटात दिसणार आहे.

  • कोरोनामुक्त होताच कार्तिक आर्यनने खरेदी केली लग्झरी गाडी, किंमत ऐकून व्हाल थक्क

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो होम क्वारंटाइन होता. त्यानंतर नुकतीच एक पोस्ट शेअर करत कार्तिकने त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे चाहत्यांना सांगितले होते. आता कार्तिकने एक महागडी कार खरेदी केल्याने चर्चेत आला आहे. कार्तिकने लेम्बोर्गिनी उरस ही महागडी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल 4.5 कोटी रुपये असल्याचे समजते. त्याने खास इटलीहून ही गाडी मागवली आहे. तसेच त्यासाठी 50 लाखांचा टॅक्सदेखील भरला आहे. कार्तिकच्या या लग्झरी कारची सध्या चर्चा रंगतेय.

  • अरुणाचल प्रदेशातल्या आगीमुळे नुकसान झालेल्यांना वरुण-नताशाने केली आर्थिक मदत

अभिनेता वरुण धवन सध्या अरुणाचल प्रदेश येथे त्याच्या आगामी 'भेडिया' या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. दरम्यान वरुणने त्याची पत्नी नताशा दलालसोबत मिळून अरुणाचल प्रदेशात तिरप आणि लाँगलिएँग जिल्ह्यात लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांचा मदतनिधी दिला आहे. वरुणने हा मदतनिधी उपजिल्हाधिकारी सोमचा लोवांग यांच्याकडे सुपुर्द केला. सोमचा यांच्यावर तिरप इथल्या लोकांच्या मदतकार्याची जबाबदारी आहे. वरुणसह क्रिती सेनॉन 'भेडिया' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असून अमर कौशिक हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...