आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief; Bhoot Police Digital Satellite Rights, Priyanka Chopra Rani Ahilyabai Role And Sridevi Daughter Khushi Entry In Telugu Movie

बॉलिवूड ब्रीफ:60-65 कोटीत विकल्या गेले 'भूत पुलिस'चे सॅटेलाइट-डिजिटल राइट्स, पडद्यावर अहिल्याबाईंची भूमिका साकारु शकते प्रियांका, खुशी कपूर करतेय इंडस्ट्रीत डेब्यू

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम स्टारर 'भूत पोलिस' या चित्रपटाचे सॅटेलाइट आणि डिजिटल राइट्स निर्माते रमेश तोरानी यांनी स्टार नेटवर्कला विकले आहेत. असे म्हटले जात आहे की, हा करार सुमारे 60-65 कोटींमध्ये झाला आहे. त्यापैकी 45 कोटी रुपये डिजिटल हक्कांसाठी तर 15-20 कोटी रुपये सॅटेलाइट हक्कांसाठी असल्याचे बोलले जात आहेत. पवन कृपलानी दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट सुमारे 40 कोटी रुपये आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे हक्क विकून 20-25 कोटींचा नफा कमावला आहे.

2.तेलुगू सिनेमात पदार्पण करू शकते श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी
जान्हवी कपूरनंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची दुसरी मुलगी खुशी कपूरही चित्रपटात प्रवेश करणार आहे. मात्र ती बॉलिवूडमध्ये नव्हे तर एका तेलगू चित्रपटांमधून पदार्पण करणार आहे. ताज्या बातम्यांनुसार निर्माते दिल राजू हे तेलुगु सिनेमात खुशीला लाँच करणार आहेत. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र दिल राजू यांचे बोनी कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत खूप चांगले संबंध आहेत. पनी कल्याण यांची भूमिका असलेला सुपरहिट तेलुगू चित्रपट 'वकील साब” दिल राजू यांनी बनवला होता.

3.अक्षय आणि ट्विंकलने लोकांच्या मदतीने उभा केला 1 कोटीचा निधी
अक्षय कुमार आणि ट्विंकल यांनी नुकतीच रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्ससाठी निधी उभारला आहे. दोघांनीही लोक सहकार्यातून एक कोटी रुपये उभे केले आहेत. ट्विंकलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. यावर तिने लिहिले आहे ... “धन्यवाद! आपणा सर्वांच्या मदतीने आम्ही आपले लक्ष्य गाठले आहे. भारतीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लँटसाठी 1 कोटी रुपये जमा केले.”

4. आयुष्मान, रणदीप आणि राजकुमार निर्मात्यांची पहिली पसंत
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकची नुकतीच घोषणा झाली आहे. महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या या चित्रपटासाठी निर्माते आयुष्मान खुराणा, रणदीप हुड्डा आणि राजकुमार राव यांच्या नावावर चर्चा करत आहेत. या तिघांपैकी एखाद्याला वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी घेतले जाऊ शकते. यावर व्यापार विश्लेषकांनी आपली मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, वीर सावरकर सारख्या व्यक्तीमत्त्वाच्या बायोपिकसाठी निपूण अभिनेत्याचा विचार करायला हवा. व्यापार विश्लेष्कांच्या मते, तिघेही व्यावसायिक कलाकार आहेत. आपल्या भूमिकेसाठी ते प्रचंड मेहनत घेतात. रणदीपने ‘सरबजीत’साठी फक्त 20 दिवसात 18 किलो वजन कमी केले होते. तसेच राजकुमारनेदेखील 'ट्रॅप्ड’ आणि 'बधाई दो’मध्ये शारीरिक बदल केले होते. आयुष्मान तर वेगवेगळ्या राज्याची बोलीभाषा बोलण्यात पारंगत आहे. त्यामुळे तिघेही वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी योग्य निवड आहेत. मात्र फायनली ही भूमिका कोणाला मिळेल, ते पाहणे रंजक ठरेल.

5. राणी अहिल्याबाईंची भूमिका साकारु शकते प्रियांका चोप्रा
लेखक आणि गीतकार मनोज मुंतशिर एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ते 18 व्या शतकातील माळव्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहेत. एका मुलाखतीत मुंतशिर यांनी सांगितले की, ते मुख्य भूमिकेसाठी प्रियांका चोप्राला घेणार आहेत. त्यांच्या मते, प्रियांका अशा प्रकारच्या भूमिका जिद्द आणि आत्मविश्वासाने साकारते. बाजीराव मस्तानी या चित्रपटात तिने काशीबाईंची भूमिका जोरदारपणे वठवली होती. आतापर्यंत मुंतशिर यांनी प्रियांकासोबत चर्चा केली नाही. मात्र तिला विचारणा करतील. चित्रपटावर या वर्षाच्या अखेरीस काम सुरु होणार आहे.

6. वडिलांनी कधीही माझ्या शिफारसीसाठी कुणालाही फोन केला नाही - जॅमी लिव्हर
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर गेल्या आठ वर्षांपासून इंडस्ट्रीत संघर्ष करतेय. या संघर्षाबद्दल जॅमीने एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे. जॅमीला आजही लोकप्रिय विनोदवीर अभिनेते जॉनी लिव्हरची मुलगी म्हणून ओळखले जाते. अभिनय क्षेत्रात तिला स्वत: ची ओळख निर्माण करायची आहे म्हणून ती गेल्या आठ वर्षांपासून काम शोधत आहे. 'मला अभिनयाच्या क्षेत्रातच करिअर करायचे आहे. ते ही स्वतःच्या बळावर करायचे आहे. त्यामुळे मी आतापर्यंत वडिलांची मदत घेतलेली नाही अथवा त्यांनी देखील माझी शिफारस कोणाकडे केलेली नाही अथवा शिफारसीसाठी फोनही केलेला नाही. त्यांनी असे काही करावे असे मी कधीही त्यांना सुचवले देखील नाही,' असे जॅमी म्हणाली.

बातम्या आणखी आहेत...