आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ब्रीफ:जाहिरातीच्या शूटिंगसाठी एकत्र आले रणबीर-कतरिना, पंजाबी कुडी झाली शिल्पा शेट्टी, रणवीर सिंहचा हटके मास्क

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील सहा महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

ब्रेकअपच्या दोन वर्षांनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकत्र चित्रीकरण करताना दिसले. या दोघांनी अलीकडेच एका जाहिरातीमध्ये सोबत काम केले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीर आणि कतरिना कैफ यांनी एका मोबाईल कंपनीची जाहिरात नुकताच शूट केली आहे. या शूटवेळी त्यांनी बरीच धमाल देखील केलेली व्हिडिओत दिसत आहे. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर लवकरच ही जाहिरात दिसणार आहे. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी या दोघांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र नंतर काही कारणास्तव हे दोघेही विभक्त झाले. लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न आहेत.

  • अभिषेकने साइन केलेला पहिला ऑटोग्राफ

अमिताभ बच्चन यांनी बुधवारी त्यांचा मुलगा अभिषेकसोबतचा एक जुना अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत लहान अभिषेक दिसतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये बिग बींनी लिहिले, हा फोटो तत्कालीन सोव्हिएत युनियनमधील ताश्कंद शहरातील आहे. तिथे अभिषेकने त्याचा पहिला ऑटोग्राफ साइन केला होता.

  • पंजाबी कुडी झाली शिल्पा शेट्टी

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘जर मी पंजाबमधील एखाद्या गावातील मुलीशी लग्न केले असते तर ती अशी दिसत असती’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे. या व्हिडिओत शिल्पा अनोख्या अंदाजात दिसत आहे. हा व्हिडिओ फेस फिल्टरने बनवण्यात आला असून यामध्ये शिल्पा पंजाबी मुलगी असल्याचे दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘लाँग-लाची’ हे गाणे सुरु आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

  • रणवीर सिंहचा हटके मास्क

अभिनेता रणवीर सिंह आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. बऱ्याच वेळा चाहत्यांना त्याची कपड्यांची स्टाईल आवडते तर काही वेळा चाहते त्याला कपड्यांची स्टाईल बदलण्याचा सल्ला देखील देतात. रणवीर सिंहचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये रणवीरने हटके प्रकारचा मास्क घातला आहे. त्याचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहेत. रणवीरला वांद्रे येथील डबिंग स्टुडिओच्या बाहेर स्पॉट केले गेले. यावेळी रणवीरने ट्रॅकसूट घातला होता आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता. मात्र, रणवीरचा हा लूक चाहत्यांना आवडलेला दिसत नाही. या फोटोवर चाहते गंमतीशीर कमेंट करताना दिसत आहेत.

  • भूमी म्हणते - आजच्या नट्यांना धाडसी भूमिका करण्याचे स्वातंत्र्य

अभिनेत्रींना इंडस्ट्रीत सशक्त भूमिका मिळताना पाहून भूमी पेडणेकर खूप खुश आहे. तिने याचे श्रेय जया बच्चन, रेखा आणि शबाना आझमी आदींसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींना दिले आहे. भूमी म्हणते, “या सर्वांनी त्यांच्या काळात बरीच पुरोगामी पात्रे निभावली. मग नव्वदच्या दशकात अभिनेत्रींना चांगल्या भूमिका मिळू लागल्या. मग ते ‘रंगीला’, ‘डीडीएलजे’ किंवा ‘कुछ कुछ होता है’ असो. मी येण्यापूर्वी एक मोठा बदल आधीच सुरू झाला होता. अभिनेत्री म्हणून मला फक्त चित्रपटात ग्लॅमरस भूमिका कराव्यात अशी अपेक्षा कुणी ठेवत नाही. त्याउलट बऱ्याच गोष्टी मला विचारल्या जातात. महिलांच्या कौशल्यांचा आदर होतो त्यांना भूमिका निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ग्लॅमरस भूमिका करण्याचे बंधन लादले जात नाही.

डी-कपल्डमध्ये एकत्र येणार माधवन-सुरवीन

नेटफ्लिक्स इंडिया येत्या 6 महिन्यांत नवीन प्रकल्पांच्या शूटिंगची तयारी करत आहे. याअंतर्गत गोव्यात त्यांचा एक प्रकल्प आधीच सुरू आहे. ‘डी-कपल्ड’ हा चित्रपट असून त्यात आर माधवन आणि सुरवीन चावला महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ते अडचणीत सापडलेले आणि मोडलेले वैवाहिक जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या जोडप्याची भूमिका साकारत आहेत.

बातम्या आणखी आहेत...