आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief: Bollywood Updates, Rishi Kapoor's Last Film 'Sharmaji Namkeen' Will Be Released On September 4, Akshay Kumar, Bell Bottom Postponed, Karisma Kapoor Sells House

बॉलिवूड ब्रीफ:ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 4 सप्टेंबरला होणार रिलीज, अक्षयच्या 'बेलबॉटम'चे प्रदर्शन लांबणीवर, करिश्मा कपूरने विकले घर

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील 5 रंजक बातम्या एका क्लिकवर...

दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा 'शर्माजी नामकीन'चा अखेरचा चित्रपट यावर्षी 4 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवशी प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे शूटिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. ऋषी यांच्याही पात्राचे चित्रीकरण पूर्ण होऊ शकले नव्हते. आता अभिनेता परेश रावल ऋषी यांच्या पात्राच्या उर्वरित भागाचे चित्रीकरण पूर्ण करणार हेत. हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडणार आहे. परेश रावल यांनी ऋषी यांची आठवण म्हणून रिलीज करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मॅकगफिन पिक्चर्ससह रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश भाटिया यांनी केले आहे. हा चित्रपट एका 60 वर्षाच्या माणसाच्या कथेवर आधारित आहे. ऋषी कपूर यांचे गेल्या वर्षी 30 एप्रिल रोजी कॅन्सरने निधन झाले होते.

  • अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'ची रिलीज डेट पुढे ढकलली

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट यावर्षी 2 एप्रिलला प्रदर्शित होणार होता, मात्र आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. बेल बॉटमची तारीख पुढे ढकलण्यामागे अक्षयचाच दुसरा चित्रपट कारणीभूत ठरला आहे. ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट याच तारखेच्या आसपास रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षयसह कतरिना कैफ रणवीर सिंह आणि अजय देवगनसुद्धा दिसणार आहेत. त्यामुळे बेल बॉटमच्या निर्मात्यांनी तिकिटबारीवरील संघर्ष टाळण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. अक्षयचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट मार्च किंवा एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे 2 मोठे चित्रपट 30 दिवसांत रिलीज करणे हा मोठा मूर्खपणा ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे. बेल बॉटम या चित्रपटाचे आत्ता पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे आणि आता तो जूनमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येईल. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त वाणी कपूर आणि लारा दत्ता मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

  • करिश्मा कपूरने 'या' कारणामुळे विकले घर

सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री करिश्मा कपूर चर्चेत आली आहे. करिश्माने अलीकडेच तिचे मुंबईतील घर विकले आहे. यामागे एक मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिला हे घर विकणे सोईस्कर ठरल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे सरकारने फ्लॅट मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर करिश्माने हे घर विकल्याचे सांगितले जात आहे. करिश्माने तिचा मुंबईतील खार परिसरातील फ्लॅट विकला आहे. तब्बल 10.11 कोटी रुपयांना हा फ्लॅट विकल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी अलिकडेच मुद्रांक शुल्कात कपात करण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचा फायदा घेत करिश्माने तिचे घर विकले आहे. 20 डिसेंबर रोजी या घराची नोंद झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, करिश्माने तिच्या मालमत्तेवर 20.22 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. करिश्माचे हे घर आभा दमानी यांनी खरेदी केल्याचे वृत्त आहे.

  • सैन्य दिनाच्या निमित्ताने अक्षय सैनिकांसोबत खेळला व्हॉलीबॉल

सैन्य दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन यांनी जैसलमेरमध्ये सैनिकांची भेट घेतली. बच्चन पांडे या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अक्षय आणि कृती जैसलमेरमध्ये आहेत. चित्रपटाच्या शूटिंमधून वेळ काढत कलाकार सैनिकांच्या भेटीला पोहोचले. यावेळी, अक्षय कुमारने जवानांसोबत व्हॉलीबॉल खेळला. ‘आर्मी डे फ्लॅग ऑफच्या निमित्तानं काही जवानांसोबत व्हॉली बॉल सामना खेळला आहे,’ असे कॅप्शन देत अक्षयने व्हिडिओ शेअर केला आहे.

  • ‘मॅडम चीफ मिनिस्टर’साठी रिचा चड्ढाने मागितली माफी

अभिनेत्री रिचा चड्ढाचा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या पोस्टवरुन सध्या वाद सुरु असून रिचाने एक पोस्ट शेअर करत जाहीरपणे माफी मागितली आहे. या चित्रपटाचे 5 जानेवारीला एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. यात रिचाच्या हातात झाडू दाखवण्यात आला होता. त्या फोटोवर ‘अनटचेबल, अनस्टॉपेबल’ असे लिहिण्यात आले होते. हा मजकूर वाचल्यानंतर सोशल मीडियावर या पोस्टरसह रिचा आणि निर्मात्यांवर अनेकांनी कडाडून टीका केली. त्यानंतर आता रिचाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

“या चित्रपटात काम करण्याचा एक वेगळा अनुभव होता. यातून मला बरंच काही शिकता आले. चित्रपटाचं पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आणि त्याच्यावर कडाडून टीका झाली. पण काही गोष्ट योग्य असल्यामुळेच ही टीका सहन करावी लागली. नकळतपणे आमच्याकडून झालेल्या चुकीची जाणीव झाल्यावर आम्ही दुसऱ्याच दिवशी एक नवीन पोस्टर तयार केले. हे खरंच अत्यंत चुकीचे होते आणि आमच्याकडून नकळतपणे झाले होते. कोणीही जाणूनबुजून हे करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे झालेल्या प्रकारावरुन सगळ्यांची क्षमा मागते,” असे रिचा म्हणाली आहे.

सुभाष कपूर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रिचा चड्ढासोबतच मानव कौल आणि सौरभ शुक्ला मुख्य भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 22 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...