आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:'द फॅमिली मॅन 2'वर तमिळनाडू सरकारकडून बंदी घालण्याची मागणी, भन्साळींच्या 'बैजू बावरा'मध्ये दरोडेखोर रुपमती साकारु शकते दीपिका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

अभिनेता मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन 2’ ही वेब सीरिज रिलीजपूर्वीच वादाच्या भोव-यात सापडली आहे. राज्यसभा खासदार वायको यांनी या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रच लिहिले आहे. याआधीही एनटीकेचे संस्थापक सीमन यांनी देखील या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ आता स्वत: तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारला अधिकृतपणे पत्र लिहून या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या वेब सीरिजमध्ये ईलम तमिळला अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला आहे. श्रीलंकेतील ऐतिहासिक संघर्षात सामील असलेल्या ईलाम तमिळांची विश्वासार्हता संपवण्याचे आणि त्यासंबंधातील तथ्य चुकीच्या पद्धतीने सादर केले असल्याचे देखील या पत्रात म्हटले आहे. या सीरिजमध्ये तमिळ बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचे कारण देत तमिळनाडू सरकारने ही वेब सीरिज केवळ तमिळनाडू नाहीतर संपूर्ण देशात प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

2. पुन्हा एकदा भन्साळींच्या चित्रपटात दिसू शकते दीपिका पदुकोण, दरोडेखोर राणीच्या भूमिका साकारणार

दीपिका पदुकोण पुन्हा एकदा दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत काम करू शकते. रिपोर्ट्सनुसार, भन्साळी सध्या आलिया भट्ट सोबत 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटात व्यस्त आहेत, त्यानंतर ते 'बैजू बावरा' या चित्रपटावर काम सुरु करणार आहेत. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी त्यांची पहिली पसंती दीपिका पदुकोणला आहे. हे पात्र दरोडेखोर राणी रुपमतीचे असून 1952 च्या मूळ चित्रपटात कुलदीप कौर यांनी ते साकारले होते. या प्रोजेक्टबाबत भन्साळी आणि दीपिका यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप पेपरवर्क पूर्ण झाले नाही. दीपिकाने यापूर्वी भन्साळींच्या 'गोलियों की रसलीला: राम लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटात काम केले होते.

3.सैफ अली खान म्हणाला - तिन्ही खानांपेक्षा कमी यश मिळणे भाग्याचे ठरले

शाहरुख, सलमान आणि आमिर या तिन्ही खानापेक्षा कमी यश मिळणे माझ्यासाठी नेहमीच भाग्याचे ठरले, असे सैफ अली खान म्हणाला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'ही लोक म्हणजे, शाहरुख, सलमान आणि आमिर यांचा जन्म अभिनेता होण्यासाठी झाला असावा, मला असे वाटते. कारण त्यांचे ध्येय लहानपणापासूनच अभिनेता व्हावे असावे, परंतु मी जेव्हा चित्रपटात आलो तेव्हा माझे काही ध्येय नव्हते. सुपरस्टार बनण्याचा कधी विचारही केला नव्हता. बस मी काम करत गेलो. वेगवेगळ्या प्रकारची पात्रे, बारकावे शिकत गेलो. आता मी माझ्या प्रत्येक पात्रात वेगवेगळे प्रयोग करत आहे.'

4. मृणाल ठाकुर म्हणाली - तुफानचे प्रदर्शन टाळण्याचा निर्णय चांगला होता

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित फरहान अख्तर आणि मृणाल ठाकूर ‘तूफान’ 21 मे रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार होता तथापि, रिलीजच्या काही आठवड्यांपूर्वी निर्मात्यांनी हा चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच असे घडले की महामारीमुळे डिजिटलवरील चित्रपट प्रदर्शन टळले. याबद्दल मृणाल म्हणाली, ‘या चित्रपटाच्या टीममधील कोणताही सदस्य हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या बाजूने नव्हता, कारण बऱ्याच जणांनी साथीच्या रोगादरम्यात आपल्या जवळच्यांना गमावले. त्यामुळे सद्य परिस्थितीबद्दल संवेदनशील असणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असे मला वाटते. कलाकार म्हणून मनोरंजन करणे माझे काम आहे, प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे आमचे कामच आहे, परंतु या काळात प्रदर्शन करणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे निर्मात्यांचा हा निर्णय चांगला होता.

5. सप्टेंबरमध्ये 'धमाका' चित्रपट प्रदर्शित करु शकतात निर्माते

कार्तिक आर्यनने आपल्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी ‘धमाका’ चित्रपटाची घोषणा केली. तेव्हापासून कार्तिक या चित्रपटासाठी सतत चर्चेत आला आहे. रिलीजसाठी निर्माते चांगली वेळ शोधत आहेत. सुरुवातीला निर्माते हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत होते पण आता त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सप्टेंबर महिना निवडला आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम जोरात सुरू आहे. त्यात कार्तिक न्यूज अँकर झाला आहे. कथा त्याच्या पात्राभोवती फिरत असल्याचे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक आर्यन लवकरच अनीस बज्मीच्या ‘भूल भुलैया’ चित्रपटाची शूटिंग मुंबईत सुरू करणार आहे. यासह तो रोहित धवनच्या तेलुगु िसनेमाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.

6. श्री श्री रविशंकर यांच्यासोबत मिळून कोरोना पीडितांसाठी मदत करणार भूमी पेडणेकर

द आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशनने ‘मिशन जिंदगी’ हे अभियान सुरू केले आहे, यात कोराना रुग्णांच्या मदतीसाठी संपूर्ण भारतातून लोक पुढे आले आहेत. यातील वॉलंटियर भारताच्या अनेक शहरात कोरोना ग्रस्त लोकांची मदत करत आहेत. या उपक्रमाला चांगले यशही आले भूमी पेडणेकरने कोरोनाग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी जागतिक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि त्यांच्या ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन’ सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात भूमी म्हणते, कोरानाच्या या दुसऱ्या लाटेचा हा सर्वात धोकादायक टप्पा आहे. या गंभीर टप्प्यातून भारत सध्या जात आहे. या संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत करणे फार महत्वाचे आहे.

7. कृती सेननला बॉलिवूडमध्ये झाली 7 वर्षे पूर्ण, म्हणाली- अभिनयात करिअर करण्याचा कधी विचार केला नव्हता

कृती सेननने बॉलिवूडमध्ये 7 वर्षे पूर्ण केली आहेत. ती म्हणते, “मी चित्रपटाच्या सेटवर परत आले आहे, माझे काम मला खरोखर उत्साही करते. मी ‘बच्चन पांडे’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले. आता मी ‘आदिपुरुष’ वर देखील काम करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंतचा प्रवास माझ्यासाठी खूप खास ठरला आहे, ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. मी एक अभियंता आहे आणि अभिनयात करिअर होईल, याचा मी कधीही विचार केला नव्हता मी स्वत: ला खूप भाग्यवान समजते, मला येथे येण्याची आणि माझे स्वप्न जगण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.‘

बातम्या आणखी आहेत...