आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:'द्रौपदी’आधी रामायणावर आधारित चित्रपटावर काम करणार दीपिका-मधू मंटेना, थेट ओटीटीवर रिलीज होणार सोनम कपूरचा ‘ब्लाइंड’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

निर्माते मधू मंटेनाने महाभारतावर आधारित एका चित्रपटाची घोषणा केली होती. त्यात ते दीपिका पदुकोणला घेणार होते. द्रौपदीच्या दृष्टिकोनातून कहाणी सांगितली जाणार होती. मात्र याविषयी पुढे काही अपडेट आले नाही. आता एका मुलाखतीमध्ये मधूंनी सांगितले. मी आणि दीपिका एकत्र काम करत आहोत पण हा द्रौपदीचा प्रोजेक्ट नसणार. आम्ही आधी रामायणावर आधारित प्रोजेक्ट करणार आहाेत.

2. थेट ओटीटीवर रिलीज होणार सोनमचा ‘ब्लाइंड’
गेल्या दोन वर्षापासून सोनम कपूरचा एकही चित्रपट रिलीज झाला नाही. नुकतेच तिने सुजॉय घोष यांच्या निर्मितीचा मिस्ट्री थ्रिलर ‘ब्लाइंड’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. खरं तर, हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज करण्याच्या हिशोबाने बनवण्यात आला होता. मात्र आता ओटीटीवरच रिलीज होणार असल्याचे ऐकण्यात आले आहे. सूत्रानुसार, सुजॉय हा चित्रपट आणखी जास्त होल्ड करु इच्छित नाही. सध्या तो तीन डिजिटल स्ट्रीमिंग कंपन्यांशी चर्चा करत आहे. यापैकी एक चांगली कंपनीची तो निवड करणार आहे. हर चित्रपट याच नावाने बनलेल्या कोरियन सिनेमाचा हिंदी रीमेक आहे.

3. प्राइम व्हिडिओ आणि ‘शमशेरा’मध्ये करार, यशराज फिल्म्सचा आगामी प्रोजेक्ट
यशराज बॅनरचा ‘शमशेरा’ दीर्घकाळापासून चर्चेत आहे. रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर यांच्या भूमिका असलेल्या याची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली होती, मात्र चित्रपट पुढे ढकलत गेला. कधी रणबीरच्या दुसऱ्या चित्रपटामुळे तर कधी काेराेनामुळे. पुन्हा चित्रपटावर काम सुरू झाले. ‘शमशेरा’चे पोस्ट थिएट्रिकल डिजिटल राइट्स प्राइम व्हिडिओने विकत घेतले. म्हणजेच चित्रपटागृहात प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट प्राइमवर दाखवला जाईल. तर सॅटेलाइट अधिकार स्टार नेटवर्कला विकले गेले आहेत. चित्रपटाचे थिएट्रिकल आणि संगीत अधिकार यशराज फिल्म्स यांच्याकडेच आहेत.

4. नसीरुद्दीन शाह यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात येईल
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना या रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी स्वतः टेलिफोनिक मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांना न्यूमोनिया झाला असून त्यांच्या फुप्फुसात एक पॅच आढळला आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी ही माहिती दिली होती. त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचे कारण नाही. तसेच त्यांना कोरोना किंवा इतर कोणताही आजार नसल्याचे रत्ना पाठक यांनी सांगितले होते. यापूर्वी नसीरुद्दीन यांना शुक्रवारी डिस्चार्ज मिळेल अशी बातमी होती.

5. रुपाली गांगुलीने खरेदी केली लक्झरी कार
अभिनेत्री रुपाली गांगुलीने अलीकडेच एक नवीन लक्झरी कार खरेदी केली आहे. रुपालीने स्वतः नवीन गाडीसोबतचे छायाचित्र सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले असून यात तिच्यासह तिचे पतीदेखील दिसत आहेत. फोटोसह रुपालीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'द टॉल एंड द शॉर्ट ऑफ इट! भारतीय व्हा भारतीय खरेदी करा, भारतीयांना समर्थन द्या!"

बातम्या आणखी आहेत...