आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:'दोस्ताना 2'मधून जान्हवी कपूरची हकालपट्टी करु इच्छित होता कार्तिक आर्यन, 'छतरीवाली' असेल रकुलच्या कंडोम टेस्टरची भूमिका असलेल्या चित्रपटाचे नाव

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

कार्तिक आर्यन आणि करण जोहरच्या 'दोस्ताना 2' या चित्रपटाविषयी सुरु असलेल्या वादावर नवीन माहिती समोर येत आहे. एका वृत्तानुसार, कॉलिन डी-कुन्हा दिग्दर्शित या चित्रपटाचे 60 टक्के चित्रीकरण पूर्ण झाले होते. त्यानंतर जानेवारीत कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या मैत्रीत वितुष्ठ निर्माण झाले. जान्हवीने कार्तिकबरोबरचे मैत्रीचे नाते संपुष्टात आणले. त्यामुळे कार्तिक एवढा निराश झाला की, त्याने दिग्दर्शकाला हा चित्रपट बंद करण्यास सांगितले. असे सांगितले जात आहे की, कार्तिकने डी-कुन्हा यांना जान्हवीला चित्रपटातून बाहेर केले तरच तो चित्रपट करेल, असा इशारा दिला होता. त्यासाठी कार्तिक आपल्या मानधनातही कपात करण्यास तयार होता. मात्र निर्माता करण जोहर यासाठी तयार नव्हता आणि अखेर कार्तिकनेच या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

2. 'छतरीवाली' असेल रकुल प्रीत सिंहच्या आगामी चित्रपटाचे नाव
नुकतीच एक बातमी आली आहे, की रकुल प्रीत सिंह एका महिलाकेंद्रित चित्रपटात कंडोम टेस्टिंग करणाऱ्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मान खुराणा स्टारर ‘डॉक्टर जी’मध्ये रोमॅँटिक भूमिका केल्यानंतर रकुल आयुष्यमानच्या पावलावर पाऊल टाकत आहे. रकुलने पूर्वीच रॉनी स्क्रूवाला यांच्या बॅनरखाली निर्मिती होणाऱ्या या चित्रपटाचा करार केला आहे. या चित्रपटाने नाव ‘छतरीवाली’ असणार आहे. मराठी चित्रपट निर्माते तेजस विजय देओस्कर (बकेट लिस्ट) चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल, याबाबत संदिग्धता आहे.

3. मार्वलच्या चित्रपटात हरीश पटेल
80 आणि 30 च्या दशकात अनेक चित्रपटांत काम करणारे अभिनेते हरीश पटेल हे मार्वल स्टुडिअोजचा पुढला हॉलिवूडपट ‘एटरनल्स’मध्ये दिसणार आहेत. चित्रपटाच्या प्रोमोमध्येही झकळलेले पाहायला मिळाले. त्यांनी 1998 मध्ये आलेल्या ‘गुंडा’ चित्रपटात इबू हटेला ही भूमिका केली होती. या भूमिकेची सोशल मीडिया युजर्स आठवण काढत आहेत. हॉलिवूड चित्रपटाबाबत हरीश म्हणाले, 'होय, तुम्ही टिजरमध्ये जी व्यक्ती पाहिली ती मीच आहे.'

4. विजयच्या दुसऱ्या चित्रपटात दिसणार कतरिना कैफ
दक्षिण भारतात ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘गीता गोविंदम’सारख्या चित्रपटातून आपली छाप सोडणारा विजय देवरकोंडा करण जोहरच्या ‘लायगर’ सिनेमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यात त्याच्यासोबत अनन्या पांडे दिसणार आहे. ताज्या माहितीनुसार, पहिल्या हिंदी सिनेमाच्या रिलीज आधीच देवरकोंडाच्या पदरात दुसरा बॉलिवूड सिनेमा येऊन पडला. यात कतरिना त्याची हिरोइन असल्याचे बोलले जात आहे. सूत्रानुसार,‘लायगर’चे शूटिंग पूर्ण होताच विजय यावर काम करणार आहे. आतापर्यंत याविषयी जास्त माहिती समोर आली नाही.

5. आता ‘भाईजान’ असेल ‘कभी ईद कभी दिवाली’चे शीर्षक
सलमान खान आणि साजिद नाडियादवाला यांच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ सिनेमाचे शीर्षक बदलण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. आता निर्मात्यांनी या अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटाचे शीर्षक ‘भाईजान’ ठेवण्याचे ठरवले आहे. सलमानवरच भाईजान हे शीर्षक सूट होते, असे साजिदला वाटते. सलमानच्या ‘टायगर 3’चे शूटिंग पूर्ण केल्यानंतरच या चित्रपटावर काम सुरू केले जाईल. सध्या निर्मात्यांनी या सिनेमाच्या शीर्षकाची नोंदणी करून घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...