आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief: Idharth Malhotra Signs Another Actioner With Karan Johar’s Dharma Productions Saif Arjun's   'Bhoot Police' Look Released 

बॉलिवूड ब्रीफ:'शेरशाह'नंतर सिद्धार्थ मल्होत्राने साइन केला करण जोहरचा आणखी एक सिनेमा, ‘भूत पुलिस’च्या निर्मात्यांनी प्रदर्शित केला सैफ-अर्जुनचा लूक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

सिद्धार्थ मल्होत्रा ​​लवकरच एका पाठोपाठ एक अनेक चित्रपटांत दिसणार आहे. त्याचा धर्मा प्रॉडक्शन चित्रपट ‘शेरशाह’ ओटीटीच्या रिलीजसाठी सज्ज आहे. तर त्याने ‘मिशन मजनू’ चे 60 टक्के शूटिंगही पूर्ण केले असून आता त्याने ‘थँक गॉड’ चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. तो साऊथच्या ‘डीजे’ चित्रपटाच्या रिमेकमध्येही दिसणार आहे. इतके असून त्याने नुकतेच करण जोहरचा आणखी एक चित्रपट साइन केला आहे. बऱ्याच अॅक्शन चित्रपटासह हा एक रोमँटिक चित्रपट असेल. या चित्रपटासाठी करण जोहरने नुकतेच सिद्धार्थशी संपर्क साधला.

2. ‘भूत पुलिस’च्या निर्मात्यांनी प्रदर्शित केला सैफ-अर्जुनचा लूक
सैफ अली खान आणि अर्जुन कपूर लवकरच ‘भूत पुलिस’ चित्रपटात दिसणार आहेत. आता या हॉरर-कॉमेडी चित्रपटातून सैफचा फर्स्ट लूक समोर आला. करीना कपूरने सोमवारी सकाळी इंस्टाग्रामवर सैफच्या पात्राचे फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर केले. या पोस्टरमध्ये सैफने ब्लॅक शर्टवर लेदर जॅकेट घातले आहे. सैफचे पात्र सांगताना करीनाने पोस्टमध्ये लिहिले आहे...‘पॅरानॉर्मल से डरें नहीं, ‘विभूती’ के साथ महसूस करें ‘सैफ’ (सेफ). ‘भूत पुलिस’ लवकचर येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार वर. चित्रपटात सैफ आणि अर्जुनसोबत यामी गौतम आणि जॅकलीन फर्नांडीजदेखील आहेत.

3. शशी कपूर यांच्या नातवाची होतेय बॉलिवूडमध्ये एंट्री

बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टार किडची एंट्री होणार आहे. दिवंगत अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान पृथ्वीराज कपूर लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. कुणाल कपूर आणि शीना यांच्या मुलाचे नाव जहान आहे. तो अनुभव सिन्हा निर्मित आणि हंसल मेहता दिग्दर्शित चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जहानसोबत आदित्य रावल देखील स्क्रीन शेअर करणार आहे. जहान आणि आदित्यला चित्रपटात संधी देण्याबाबत अनुभव सिन्हा म्हणाले, ‘ते दोघी अतिशय उत्साही आहेत. हंसल आणि मला आगामी चित्रपटात नवे चेहरे हवे होते. आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे आणि दोघेही प्रचंड मेहनत घेत आहेत.’ तर हंसल मेहता म्हणाले, ‘चित्रपटाचा विषय निवडल्यानंतर मी नव्या चेहऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक होते. जहान आणि आदित्यची निवड त्यांचे कौशल्य पाहून केली आहे. चित्रपटातील त्यांच्या भूमिका कठीण आहेत आणि मला विश्वास आहे की प्रेक्षकांना त्या नक्की आवडतील.’

4. 10 कोटींत विकले ‘मेजर’ चित्रपटाचे सॅटेलाइट अधिकार
दक्षिणेचा सुपरस्टार महेश बाबूच्या बॅनरखाली बनत असलेल्या अभिनेते आदिवी शेष यांच्या आगामी ‘मेजर’ चित्रपटाविषयी मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाचे हिंदी उपग्रह अधिकार निर्मात्यांनी 10 कोटी रुपयांना विकले आहेत. यात अभिनेता आदिवि शेष मुंबईत 2008 मध्ये झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे जीवन पडद्यावर साकारणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झालेली नाही. हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

5.आणखी एक स्पॅनिश थ्रिलर करणार तापसी पन्नू
अनेक चित्रपटांच्या रिमेकमध्ये दिसलेली तापसी पन्नू आणखी एका रिमेकसाठी तयार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत “हंटर’ फेम गुलशन देवैयादेखील दिसणार आहेत. चित्रपट ‘बीए पास’ आणि ‘सेक्शन 375’ फेम दिग्दर्शक अजय बहल दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग 20 जुलैपासून नैनीतालमध्ये होणार आहे. अजून चित्रपटाचे शीर्षक ठरलेले नाही. मात्र काही माहिती समोर आली आहे. हा एक स्पेनिश थ्रिलर ‘जुलियाज आय’चा रिमेक आहे. यात तापसी बेलेन रुएदाची भूमिका साकारणार आहे. ती महिला आपल्या जुळ्या बहिणीच्या मृत्युचा रहस्य उलघडण्याचा प्रयत्न करते. निर्माते चित्रपटाला भारतीय मुलामा देण्याचा प्रयत्न करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...