आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief: Kiara Advani To Reunite With Bhool Bhulaiyaa 2 Co Star Kartik Aaryan In Sajid Nadiadwala’s Next Arjun Kapoor Says Janhvi Khushi Strengthens Relationship With Father

बॉलिवूड ब्रीफ:साजिद नाडियाडवालाच्या आगामी चित्रपटात झाली किआरा आडवाणीची एंटी, अर्जुन कपूर म्हणाला - जान्हवी-खुशीमुळे वडिलांसोबतचे नाते आणखी घट्ट झाले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

किआरा अडवाणीचा चित्रपट 'शेरशहा’ या महिन्यात प्रदर्शित होत आहे. दरम्यान, तिला कार्तिक आर्यनसोबत आणखी एका चित्रपटासाठी साइन करण्यात येत असल्याची चर्चा आहे, त्याचा निर्माता साजिद नाडियादवाला आहे. दिग्दर्शक समीर विद्धंसच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटाचे नाव आधी 'सत्यनारायण की कथा’ ठरवण्यात आले होते, मात्र आता त्याला विरोध झाल्याने निर्माते नव्या नावाचा विचार करत आहे. निर्माते नव्या जोडीचा शोध घेत होते आणि आता त्यांनी कार्तिक सोबत किआराला घेण्याचे ठरवले आहे. दोघेही आधीपासून 'भूलभुलैया 2' मध्ये काम करत आहेत. मात्र अद्याप चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. या शीर्षक नसलेल्या चित्रपटाविषयी बोलायचे तर कार्तिक त्यात सत्या नावाच्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल. तर किआराचे नाव कथा असेल. ही एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे, जी डिसेंबर 2021 मध्ये सुरु होईल.

2. अर्जुन कपूर म्हणाला - बहिणी जान्हवी आणि खुशीमुळे वडिलांसोबतचे नाते आणखी घट्ट झाले

अभिनेता अर्जुन कपूर एका मुलाखतीत वडील बोनी कपूर आणि त्याच्या नात्याविषयी मनमोकळेपणे बोलला. तो म्हणतो, बहिणी जान्हवी आणि खुशीमुळेच मी वडिलांच्या अधिकच जवळ गेलो. वडिलांसोबतचे माझे नाते आणखी घट्ट आणि चांगले झालेे. मी वडिलांसाेबत जास्त काळ राहू शकलो नव्हतो, बरेच लोक मला वडिलांसारखा असल्याचे म्हणत होते. मात्र मला कधीच तसं वाटले नाही. मात्र आता जान्हवी आणि खुशीमुळे दुरावलेली मनं जवळ आली आहेत. त्यांच्यासोबत आता चांगले नाते तयार झाले आहे. मी वडिलांना समजू शकलो. आम्ही सर्वांनीच जुनं विसरुन नव्याने नात्याची विण घट्ट केली आहे. खरं तर, अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला बोनी यांच्या पहिल्या पत्नी दिवंगत मोना शैरी यांची मुले आहेत. तर जान्हवी आणि खुशी बोनी यांच्या दुसरी पत्नी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली आहेत.

3. आमिरच्या 'लालासिंग चड्ढा'सोबत होणार अल्लूच्या 'पुष्पा'ची टक्कर
अल्लू अर्जुनच्या आगामी “पुष्पा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली. चित्रपटाचा पहिला भाग या वर्षी नाताळावर प्रदर्शित होणार आहे. मोठी गोष्ट म्हणजे त्याच दिवशी आमिर खान त्याचा 'लालसिंग चड्ढा” हा चित्रपटही प्रदर्शित करणार आहे. असे झाले तर दोघांच्या चित्रपटाची टक्कर निश्चित आहे. 'पुष्पा’विषयी बोलायचं झालं तर, यात अल्लू आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याशिवाय यात फहाद फाजिलदेखील दिसतील. सुकुमार दिग्दर्शित हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे. तो देशभरात अनेक भाषेत रिलीज होणार आहे. याचा पहिला भाग ख्रिसमस 2021 आणि दुसरा 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

4. धर्मा बॅनरच्या चित्रपटात जान्हवी-राजकुमार एकत्र

राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांना पहिल्यांदा प्रेक्षकांनी ‘रुही’ मध्ये पाहिले होते. आता दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याचे ऐकिवात आहे. दोघांनी धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटावर स्वाक्षरी केली आहे, ज्याचे दिग्दर्शन “गुंजन सक्सेना” दिग्दर्शक शरण शर्मा करणार आहेत. दोघेही क्रिकेटपटूंच्या भूमिकेत दिसतील. दोन्ही कलाकार चित्रपटासाठी क्रिकेटचे प्रशिक्षण घेतील. कथा काल्पनिक असेल, त्यात भावनांचा तडका दिला असेल.

5. करणने अभयसोबत सुरु केला आपला दुसरा चित्रपट, सेटवरुन शेअर केला फोटो
अभिनेते सनी देओलचा मुलगा करण देओलने दोन वर्षांपूर्वी 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता त्याने त्याच्या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. अजय देवगण या चित्रपटाची निर्मिती करणार असून त्याचे दिग्दर्शन देवेन मुंजा करणार आहेत. देवेन यांनी या आधी “चलते चलते” आणि “ओम शांती” ओम ‘ दिग्दर्शन केले होते. करणच्या कारकिर्दीतील हा दुसरा चित्रपट आहे, तो तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. त्याची कथा रॉकी, रॅम्बो आणि राहुल या तीन मित्रांभोवती विणली गेली आहे. यात अभय देओलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सेटवरुन दोन्ही काका-पुतण्याने हा फाेटो शेअर केला आहे.

6. अभिनेत्री रश्मी देसाई म्हणाली - राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचे माझे स्वप्न, त्यासाठी कठोर परिश्रम घेतेय

टेलिव्हिजनवर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर रश्मी देसाई आता डिजिटल माध्यमाकडे वळली आहेत. नुकतीच “तंदूर” या वेब सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण करणाऱ्या रश्मीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले, तिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकायचा आहे आणि त्यासाठी ती कामही करत आहे. रश्मी म्हणते, “मला एक अभिनेत्री म्हणून ओटीटीवर काम करायचेे होते कारण माझी बरीच स्वप्ने आहेत, जी मला पूर्ण करायची आहेत. मला राष्ट्रीय पुरस्कार हवा आहे. तो मिळवण्यासाठी मी त्या दिशेने काम करत आहे, मेहनत घेत आहे. मला माहीत नाही हा प्रवास कसा आहे. किती काळ चालेल, तो कसा असेल, पण मी प्रयत्न करेन. टीव्ही एक सुंदर व्यासपीठ आहे आणि नेहमीच असेल, प्रत्येक माध्यमाची स्वतःची आवड, प्रेक्षक आणि प्रेक्षक संख्या असते. ‘

7. किंशुक वैद्य लवकरच खंडेराव होळकर यांच्या भूमिकेत दिसेल

'पुण्यश्लोक अहिल्याबाई' या ऐतिहासिक मालिकेत खंडेराव होळकर यांच्या भूमिकेसाठी किंशुक वैद्य या अभिनेत्याला निवडण्यात आलेे. आजवर काही ऐतिहासिक आणि पौराणिक भूमिका केलेल्या या अभिनेत्याची निवड अगदी चपखल असल्याचे म्हटले जात आहे. या भूमिकेबद्दल किंशुक वैद्य म्हणतो, 'खंडेराव होळकर ही भूमिका करायला मिळणे ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. मला स्वतःला ही मालिका खूप आवडते, त्यामुळे ही भूमिका मिळाल्याने माझ्या आनंदाला पारावार राहिलेला नाही.'

बातम्या आणखी आहेत...