आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवाजुद्दीन सिद्दिकी आणि नेहा शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘जोगीरा सारा रा रा!’चे शूटिंग पूर्ण झाले आहे. दोन्ही कलाकारांनी नुकतेच त्याचे अंतिम शूट पूर्ण केले. दिग्दर्शक कुशन नंदी म्हणाले, चित्रपटाची गाणी वगळता टीम सदस्यांनी चित्रपटाचे शूटिंग निर्धारित मुदतीत आणि सुरक्षेच्या खबरदारीसह पूर्ण केले. मला खात्री आहे, प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद घेतील. चित्रपटाची स्क्रिप्ट गालिब असद भोपाली यांनी लिहिली आहे. ही कथा एका अनोख्या जोडप्याभोवती विणलेली असून चित्रपटाचे चित्रीकरण प्रामुख्याने लखनऊ आणि वाराणसीमध्ये झाले आहे. हा चित्रपट 2021च्या शेवटी प्रदर्शित होईल.
2. अनुष्का शर्माने विराट कोहलीला केले लिफ्ट
अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती सतत सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते. यावेळी अनुष्काचा एक वेगळाच अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. अनुष्काने विराटसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून यावेळी ती पैलवानाच्या भूमिकेत दिसतेय. या व्हिडिओत अनुष्का आपला पती विराट कोहली याला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एकदा नाही तर दोनदा तिने त्याला उचलले. या व्हिडिओत जेव्हा अनुष्काने पहिल्यांदा विराटला उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती त्याला सांगते की, तू स्वतःला उचलू नकोस. तर दुसऱ्या प्रयत्नात तिने त्याला अक्षरशः सहज उचलले. अनुष्काने विराटला उचलून घेतल्यानंतर त्याच्या तोंडून ओ तेरी हे शब्द निघाले. 'मी करुन दाखवल् का?', असे कॅप्शनही तिने या व्हिडिओला दिले आहे. हा व्हिडिओ अनुष्काने शेअर केल्यापासून तो वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात अनुष्का आणि विकार एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले आहेत.
3. ‘तूफान’मध्ये मृणाल ठाकुरला मिळाली मराठी भाषेत बोलण्याची संधी
‘बाटला हाउस’ आणि ‘सुपर 30’ सारख्या हिट चित्रपटांनंतर अभिनेत्री मृणाल ठाकुर लवकरच राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी ‘तूफान’ या चित्रपटात दिसणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये मृणालला आपली मातृभाषा मराठीमध्ये बोलण्याची संधी दिली आहे. मृणाल या चित्रपटात अनन्या ही भूमिका साकारणार असून अनन्या चित्रपटात मराठी भाषेत बोलताना दिसणार आहे. याविषयी बोलताना मृणाल म्हणाली की, 'सर्वात चांगली गोष्ट ही आहे की अनन्या आणि मी दोघीही महाराष्ट्रातील आहोत. तुम्ही मला या चित्रपटातमध्ये मराठी बोलताना पाहाल आणि ते नैसर्गिकरित्या ओघात आलेले आहे. जेव्हा तुमच्यासोबत परेश सरांसारखे कलाकार असतात जे मराठीत प्रतिक्रिया देतात, तेव्हा ती एक छान संवादाची आणि मजेची जागा बनून जाते.' या चित्रपटात मृणालसह फरहान अख्तर, परेश रावल आणि सुप्रिया पाठक हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
4. अजयच्या अभिनयावर खुश भन्साळींनी वाढवला पात्राचा रोल
आलिया भट्टच्या गँगस्टरवर आधारित ‘गंगुबाई काठियावाडी’चे शूटिंग पूर्ण होणार होते, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुन्हा एकदा त्याचे चित्रीकरण थांबले आहे. आधी संजय लीला भन्साळी आणि नंतर आलिया कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर शूटिंग थंाबले होते. त्यामुळे अजयचे एक दिवसाचे शूटिंगदेखील अपूर्ण राहिलेे, मात्र आता अजयने भन्साळीसोबत ते उरलेले शूटिंग पूर्ण केलेे. चित्रपटात अजय पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. सूत्रानुसार, अजय चित्रपटात असल्यामुळे भन्साळी खुश झाले आहेत त्यामुळे त्यांनी अजयचा रोल वाढवला आहे. गंगू अडचणीत असते तेव्हा चित्रपटात अजयची एंट्री होते.
5. 'लीगर'मध्ये झाली हॉलिवूडच्या अॅक्शन दिग्दर्शकाची एंट्री, अॅक्शन सीनचे अँडी लाँग करणार दिग्दर्शन
दक्षिणेचा सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या पहिल्या हिंदी ‘लीगर’मध्ये हॉलिवूडच्या अॅक्शन दिग्दर्शकाची एंट्री झाली आहे. चित्रपटाचे शूटिंग जोरदार सुरू आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील स्टंट दृश्याचे दिग्दर्शन करण्यासाठी हॉलीवूड स्टंट दिग्दर्शक अँडी लाँग यांची एंट्री झाली आहे. अँडी अॅक्शन दृश्यासाठी ओळखले जातात. जे एकदम वेगळे असतात. त्यांच्या सर्वात चर्चेत चित्रपटापैकी ‘रॉबिन हुड’, ‘पुलिस स्टोरी: लॉकडाउन’, ‘हर्ज़लोस’, ‘ड्रॅगन ब्लेड’, ‘कमांडो ३’चे नाव येते. ते जॅकी चेनसोबत मिळून चकित करणारे सीन देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. खरं तर, ‘लीगर’मध्ये विजय एका किक बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी त्याने स्वत:मध्ये बरेच बदल केले आहेत. थायलंडमध्ये मार्शल आर्टचे प्रशिक्षणही घेत आहे.
6. अभिनेत्री निकिता दत्ताला झाली कोरोनाची लागण
गेल्या काही दिवसांमध्ये बरेच सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. आता अभिनेत्री निकिता दत्तालाही याची लागण झाली आहे. ती स्वत: घरात अलगीकरणात राहत आहे. मुंबईत ‘रॉकेट गँग’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान निकिताला आजाराची लागण झाली आहे. ती म्हणाली, ‘हे सर्व खूप दुर्दैवी आहे, पण अभिनय तुम्हाला धीर धरायला शिकवतो. साथीच्या रोगामुळे अनेक वेळा वेळापत्रक थांबवावे लागले. आत्ता मी घरी आहे आणि मला दहा दिवसांनी पुन्हा चाचणी करण्यास सांगितले आहे.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.