आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'शेरशहा'चे नवीन पोस्टर रिलीज, ‘हेरा फेरी 3’ वर काम सुरू आहे, परेश रावलने दिली बातमी

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपट 'शेरशहा' बटालियनची कमान सांभाळायला आणि नेतृत्व करायला पूर्णपणे सज्ज असून या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर 25 जुलैला प्रदर्शित होणार आहे. "ये दिल मांगे मोर" ही ललकारी देशाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा घुमणार आहे. तत्पूर्वी 'शेरशहा'चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. विष्णु वर्धन दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शन व काश एंटरटेन्मेंट यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'शेरशहा' 12 ऑगस्ट, 2021 पासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.

  • ‘बैजू बावरा’मध्ये होऊ शकते दीपिका पदुकोणची एंट्री

कार्तिक आर्यन सध्या संजय लीला भन्साळीच्या आगामी ‘बैजू बावरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आधी यात रणबीर कपूरला घेतले होते. आता त्यात कार्तिक दिसणार आहे. चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत भन्साळीने यात दीपिका पदुकोणला घेण्याचा विचार केला आहे. सर्व काही निर्मात्यांच्या मनानुसार झाले तर, कार्तिक आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसू शकतात. दीपिकाने ‘बैजू बावरा’ साइन केला तर भन्साळी सोबतचा तिचा हा चौथा चित्रपट असेल. मात्र कलाकारांच्या निवडीवरुन अधिकृत घोषणा झाली नाही.

  • 'गदर 2’मध्ये आपल्या मुलासाठी पाकिस्तानला जाणार तारा सिंह

सनी देओल यांच्या भूमिका असलेल्या ‘गदर’चा सिक्वेल बनत आहे. दिग्दर्शक अनिल शर्माने ‘गदर 2’च्या कथेवर काम करणे सुरू केले आहे. यात सनी देओलसोबत अनिलचा मुलगा उत्कर्ष शर्मादेखील दिसणार आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘जीनियस’ फ्लॉप ठरला होता. अनिल यांना चित्रपटाची कल्पना सुचल्याचे ऐकले आहे. या कथेत तारा सिंह बनलेले सनी आपल्या मुलासाठी पाकिस्तानला जातात. सध्या सनी आणि अनिल ‘अपने 2’ची तयारी करत आहेत. याचे काम झाल्यानंतरच ते 'गदर 2’वर काम सुरू करतील.

  • ‘हेरा फेरी 3’ वर काम सुरू आहे, परेश रावलने दिली बातमी

अभिनेते परेश रावल यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, ‘हेरा फेरी 3’ चे काम चालू आहे. ते म्हणाले, निर्मात्यांनी या प्रकल्पाचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. या वर्षाच्या अखेरीस आपल्याला या प्रकल्पाशी संबंधित चांगली बातमी मिळेल, अशी आशा आहे. कथा जवळजवळ तयार आहे. संवाद आणि पटकथा करण्याचे काम चालू आहे. जेथे दुसरा भाग संपला होता, तेथुनच ‘हेरा फेरी ३’ची कथा सुरू होईल. त्याचबरोबर एप्रिलमध्ये चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनीही सांगितले होते, अजूनही या चित्रपटावर काम सुरू आहे. आम्हाला सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते, कारण हा चित्रपट पूर्ण करण्याची जबाबदारी अक्षय कुमार, परेश, आमची कंपनी आणि सुनील शेट्टी यांच्यावर समान आहे. आम्ही सर्व जबाबदाऱ्या शेअर करु. प्रेक्षकांपर्यंत एखादा चांगला चित्रपट पाेहचवण्याचे आमची जबाबदारी आहे. भगवंताने, आम्हाला इतकी चांगली फ्रेंचायझी दिली आहे. म्हणून आम्ही कथा, पटकथा आणि संवाद यावर जास्तीत जास्त काम करत आहोत.

  • आपल्या एनजीओच्या माध्यमातून लोकांची मदत करणार पूजा हेगडे

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडेने ‘ऑल अबाऊट लव्ह’ या संस्थेची स्थापना केली आहे. या एनजीओच्या माध्यमातून ती लोकांची मदत करणार आहे. तिने याची घोषणा करण्याआधीच अनेक गरजवंतांची मदत केली आहे. पूजाच्या संस्थेने कृत्रिम हातपाय असलेल्या मुलांसाठी मंगलोरमधील रूग्णालयात पैसेही दान केले आहेत. लाॅकडाऊन कालावधीत 100 वेठबिगारी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एका महिन्याचे रेशनही दिले हाेते. बाल कर्करोगाच्या रूग्णांची वैद्यकीय बिले भरण्यासही तिने मदत केली हाेती. तिने आपल्या संस्थेविषयी सांगितले, ‘ऑल अबाऊट लव्ह’ ही समाजासाठी काहीतरी करण्याचा एक छोटा मार्ग आहे. मी लोकांची खूप आभारी आहे. एखाद्याच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो, अशा ठिकाणी मी पोहोचले आहे.

बातम्या आणखी आहेत...