आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief News And Updates 31 July; Akshay Kumar Announces Bell Bottom Release Date, Raveena Tandon Will Not Replace Shilpa Shetty In Super Dancer 4

बॉलिवूड ब्रीफ:अक्षय कुमारने जाहीर केली 'बेल बॉटम'ची रिलीज डेट, 'सुपर डान्सर 4'मध्ये शिल्पा शेट्टीची जागा घेण्यास रवीना टंडनचा नकार, 'शेरशाह'चे पहिले गाणे रिलीज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. जॅकी भगनानी आणि अक्षय कुमारने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ‘बेल बॉटम’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. ‘तुमचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच येत आहोत. 19 ऑगस्ट 2021 रोजी बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन अक्षय कुमारने दिले आहे. यापूर्वी ‘बेल बॉटम’ हा चित्रपट 27 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात अक्षयसोबत हुमा कुरेशी, वाणी कपूर, लारा दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोशिना आडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल आडवाणी या चित्रपटाचे निर्माते आहेत.

2. रविना टंडनचा शिल्पा शेट्टीची जागा घेण्यास नकार
राज कुंद्राला पॉर्नेग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुपर डान्सर 4 या शोमध्ये स्वतःहून सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. वृत्तानुसार, निर्मात्यांनी शोसाठी अभिनेत्री रविना टंडनला विचारणा केली आहे. पण रविनाने नकार दिल्याचे समोर आले. रविनाला नकार देण्याबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी रविना म्हणाली, ‘हा शो शिल्पाचाच असेल आणि तिलाही शोमध्ये काम करायला आवडेल.’ शोशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शिल्पा शेट्टी ही शोचा एक महत्वाचा भाग होती आणि लवकरच ती शोमध्ये पुन्हा येईल अशी आशा करुया. तो पर्यंत गीता कपूर आणि अनुराग बासू हे परीक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्यासोबत शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कलाकार दिसणार आहेत.’

3. 'शेरशाह'चे पहिले गाणे रिलीज
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा आडवाणीच्या आगामी ‘शेहशाह’ चित्रपटातील पहिले गाणे ‘रातां लम्बियां’ हे रिलीज झाले आहे. या गाण्यातील सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. विष्णु वर्धन दिग्दर्शित ‘शेरशाह’ हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या गाण्यात कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमा यांच्यातील लव्हस्टोरीची एक झलक पहायला मिळाली. तनिष्क बागची यांची रचना असलेले हे गाणं गायक जुबिन नौटियाल-असीस कौर यांनी गायलेलं आहे. ‘शेरशाह’ या चित्रपटाची निर्मीती धर्मा प्रोडक्शन आणि काश एंटरटेनमेंट यांनी केली आहे. येत्या 12 ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा प्रीमियर 240 देशांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर करण्यात येणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ आणि कियारा यांच्यासोबत शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशु अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोपडा यांच्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत.

4.मंदिरा बेदीने राज कौशलच्या स्मरणार्थ केली पूजा
मंदिरा बेदी हिचे पती राज कौशल यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. राजच्या स्मरणार्थ मंदिरा बेदीने घरी एक पूजा ठेवली होती. या पूजेचा एक फोटो शेअर करत मंदिरा बेदीने "30 वा दिवस", असे कॅप्शन दिले आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या छायाचित्रामध्ये मंदिरा बेदी तिची मुलगी तारा आणि मुलगा वीरसोबत हवन कुंडाभोवती बसलेली दिसत आहे. राज कौशल यांचे 30 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ते 49 वर्षांचे होते.

5. अॅक्शनच्या तयारीसाठी दररोज 2 तास ट्रेनिंग घेत आहे दीपिका
आगामी 'पठाण' या चित्रपटात केवळ शाहरुख खानच नव्हे तर दीपिका पदुकोणही हॉलिवूड स्टाइलचे हाय-ऑक्टेन अॅक्शन सिक्वेन्स करताना दिसणार आहे. यासाठी दीपिका पदुकोणने तयारीही सुरू केली आहे. पठाणच्या ट्रेनिंगमध्ये वर्कआउटसह मिक्स फंक्शनल ट्रेनिंग आणि योगाचा समावेश आहे. पठाणच्या ट्रेनिंगसाठी दीपिकाने दररोज 1.5 तास डेडिकेट करत आहे. याशिवाय ती स्ट्रीक्ट डाएटही फॉलो करत आहे. पठाणचे एक शेड्युल पूर्ण करण्यासोबतच ती शकुन बत्राच्या चित्रपटाचे शेड्युलही पूर्ण करण्यात व्यस्त आहे. याशिवाय दीपिका प्रभाससोबत नाग अश्विनचा मेगाबजेट चित्रपट, द इंटर्नचा हिंदी रिमेक, महाभारत, रामायण, 83, फायटर आणि पठाण या चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...