आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief: Rajkummar Rao And Kriti Sanon Starrer Hum Do Hamare Do To Release On October 29 On Disney+ Hotstar, Sabbir Khan’s Stars Nawazuddin Siddiqui's Adbhut Teaser Out

बॉलिवूड ब्रीफ:राजकुमार आणि कृती सेननच्या ‘हम दो हमारे दो’ 29 ऑक्टोबरला होणार रिलीज,  नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘अद्भुत’चा टीजर आउट

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी...

‘बरेली की बर्फी’नंतर कृती सेनन आणि राजकुमार राव ‘हम दो हमारे दो’ चित्रपट घेऊन येणार आहेत. मंगळवारी कृती आणि राजकुमारने आपापल्या सोशल मीडिया हँडलवर एक-एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर टीजर प्रदर्शित केला गेला. टीजरची सुरुवात ‘स्त्री’, ‘लुका छुपी’, ‘बाला’ आणि ‘मिमी’चा उल्लेख करण्यात आला आहे. नंतर परेश रावल यांचा आवाज ऐकू येतो... ‘अब हमारा हीरो क्या करेगा?’ त्यानंतर स्क्रीनवर कृती दिसते. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 29 ऑक्टोबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात परेश यांच्या व्यतिरिक्त रत्ना पाठक शाह आणि अपारशक्ती खुराणा मुख्य भूमिकेत आहेत.

नवाजच्या ‘अद्भुत’मधील पात्राचे फर्स्ट लूक आणि टीजर प्रदर्शित
चित्रपटात दिसणार आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर शेअर केले आहे. सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडियाने शब्बीरसोबत दुसऱ्यांदा कोलेबोरेट केले आहे. याविषयी शब्बीर म्हणतात, ‘आम्ही नवाजुद्दीन, डायना, श्रेया आणि रोहन या दमदार कलाकारांसोबत ही कथा घेऊन येत आहोत, त्यामुळे खूप उत्साहित आहोत. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना एकत्र आणेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. चित्रपटावर 2021 मध्ये काम सुरू होणार आहे. दुसरीकडे नवाजला आंतरराष्ट्रीय अॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या विषयी ते सांगतात, आतरराष्ट्रीय मंचावर आमचे कौतुक झाले. ही खूपच आनंदाची बातमी आहे, मात्र कौतुकासाठी प्रत्येक वेळेस पश्चिमेची गरज पडायला नको. प्रचंड मेहनतीसाठी माझ्या घरातून माझे कौतुक होणे महत्त्वाचे आहे.

‘सरदार उधम’मध्ये शहीद भगतसिंगांचे पात्र साकारणार अमोल पराशर

विकी कौशलचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. नुकतेच विकीने चित्रपटातील आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची ओळख करुन दिली. त्याने अमोल पराशरचा एक फोटो सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत, अमोल शहीद भगतसिंगांचे पात्र साकारत असल्याचे सांगितले. शूजित सरकार दिग्दर्शित ‘सरदार उधम’ क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी सरदार उधमसिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट भारतासह 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्रसारित केला जाईल. रिसर्चनुसार, सरदार उधम सिंह यांनी ज्यावेळी भगत सिंह यांची भेट घेतली होती, त्याचवेळी ते अत्यंत भारावले होते, ज्यामुळे त्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अधिक प्रेरणा मिळाली. भगत सिंग यांच्या क्रांतिकारी पदचिन्हांवर चालताना, सरदार उधम, त्यांच्या शक्तिशाली विश्वासार्हतेने खूपच प्रभावित झाले आणि स्वातंत्र्य लढ्यात तेवढ्याच जोष आणि आवेशाने लढले.

इरफान होता पहिली पसंत
आणखी एक माहिती समोर आली. ती म्हणजे, उधमच्या भूमिकेसाठी शूजितची पहिली पसंत दिवंगत अभिनेते इरफान खान होते, पण त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा चित्रपट विकीला देण्यात आला.

‘पिप्पा’ चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान वाटतो : मृणाल ठाकूर
मृणाल ठाकूरचा ‘पिप्पा’ हा आगामी चित्रपट आहे. यात ती ईशान खट्टर आणि प्रियांशू पेन्युलीसोबत दिसणार आहे. प्रियांशू तिच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मृणालने आपल्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याचे शूटिंग आतापर्यंत अमृतसर आणि मुंबईत सुरू होते. याविषयी मृणाल म्हणते, पिप्पाच्या वेळी मी खूप चांगला वेळ घालवला, अभिनेत्री म्हणून बरेच शिकायला मिळाले. माझ्या तयारीदरम्यान मला बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यात मजा आली. मला भारताच्या विजयाचे व्यक्तिचित्रण करणाऱ्या चित्रपटाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे. राजा कृष्ण मेनन, रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर आणि संपूर्ण कलाकारांबरोबर काम करण्याचा एक चांगला अनुभव होता. सोनी राजदानदेखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी त्यांच्या भागाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. ईशान खट्टर आणि प्यान्युली या चित्रपटाचे शूटिंग सुरू ठेवणार आहेत. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या ‘द बर्निंग चाफेस’ या पुस्तकावर आधारित आहे.

सान्या-अभिमन्यूचा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी येणार
करण जोहरचा “मीनाक्षी सुंदरेश्वर” हा चित्रपट 5 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी दिसणार आहेत. सोशल मीडियावर ही माहिती शेअर करताना करणने लिहिले, “ही अनोखी आणि सुपर क्यूट प्रेमकथा आहे. ती पाहण्यासाठी सज्जा व्हा..’ खरं तर, हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. तो तामिळनाडूतील मदुराईच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हा चित्रपट एका तरुण जोडप्याच्या समस्यांवर आधारित आहे. चित्रपटातील सान्याच्या पात्राचे नाव मीनाक्षी आहे, तर अभिमन्यू सुंदरेश्वरची भूमिका साकारत आहे. याचे दिग्दर्शन विवेक सोनी यांनी केले आहे. या चित्रपटाद्वारे अभिमन्यू ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.

'बियाँड द स्टार' असेल सलमानच्या माहितीपटाचे शीर्षक
सलमान खानवर एक माहितीपट बनणार असल्याची बातमी नुकतीच आली होती. या माहितीपटाचे शीर्षक ‘बियाँड द स्टार: सलमान खान’ असे ठेवण्यात आले आहे. या सिरीजमध्ये सलमानचा प्रवास दाखवला जाणार आहे. याचे शूटिंगदेखील सुरू झाले आहे. या प्रोजेक्टची निर्मिती सलमान खान फिल्म्स, विज फिल्म्स आणि अप्लॉज एंटरटेनमेंट मिळून करणार आहेत. यात सलमानच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारे त्याचे कुटुंब, सह-कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांची माहिती असेल. ही सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यासाठी सलमानने एक ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत करारदेखील केला आहे. मात्र याविषयी अजून कोणतीच अधिकृत घेाषणा झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...