आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ 2023 मध्ये ईदला प्रदर्शित होऊ शकतो,  तापसी म्हणते - मोठे अभिनेते स्त्रीप्रधान चित्रपटासाठी तयार होत नाहीत

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

रणबीर कपूर लवकरच ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात एक वेगळे पात्र साकारताना दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत परिणीती चोप्रा, अनिल कपूर आणि बॉबी देओलदेखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल 2022मध्ये सुरू होणार आहे. 6 महिन्यांच्या सतत शूटिंगनंतर, निर्माते ऑक्टोबर 2022 मध्ये त्याचे शूटिंग पूर्ण करण्याचा विचार करत आहेत. रणबीरचा संदीप रेड्डी वंगासोबतचा हा चित्रपट लार्ज दॅन लाइफ इंटेंट गँगस्टर नाट्यावर आधारित आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे, त्यामुळे निर्मात्यांना त्याच्या मेकिंग आणि रिलीज प्लॅनबाबत कोणतीही कमी सोडायची नाही. भूषण कुमारने ‘अ‍ॅनिमल’च्या सर्व भागधारकांशी त्याच्या रिलीजबाबत आधीच चर्चा सुरू केली आहे. सर्व काही योजनेनुसार चालले तर रणबीरच्या कारकिर्दीतील हा पहिला चित्रपट ठरेल, जो 2023 च्या ईदला रिलीज होऊ शकतो. याशिवाय तो ‘शमशेरा’साठीही चर्चेत आहे.

सिद्धांतने पूर्ण केले ‘युध्रा’मधील पोर्तुगालचे शूटिंग शेड्यूल, शेअर केला व्हिडिओ
एक्सेल एंटरटेनमेंटचा चित्रपट ‘युध्रा’मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन दिसणार आहेत. सिद्धांतने या चित्रपटाचे पोर्तगाल शूट पूर्ण केले आहे. त्याने ‘युध्रा’चा एक मेकिंग व्हिडिओ तयार करुन शेअर केला आहे. त्यात तो आपल्या पलंगावरुन उठताना आणि समुद्र किनाऱ्यावर फिरताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धातची ६ पॅक्ची शरीरयष्टी दिसत आहे. त्याला पाहून त्याने प्रचंड मेहनत केल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये तो परफेक्ट शेपसाठी किकिंग आणि पंचिंगचा सराव करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग ऑगस्टमध्ये सुरू झाले होते.‘युध्रा’सह एक्सेलकडे पुढच्या वर्षासाठी ड्रीम प्रोजेक्ट चित्रपट ‘जी ले जरा’देखील आहे. याच्या व्यतिरिक्त सिद्धांतकडे ‘बंटी और बबली 2’ देखील आहे.

मोठे अभिनेते स्त्रीप्रधान चित्रपटासाठी तयार होत नाहीत

बॉलिवूडमध्येही अभिनेत्रीसोबत भेदभाव केला जातो, याविषयी तापसी पन्नुने नुकतेच आपली मत व्यक्त केले. ती म्हणाली, पाहिल्यापासूनच हा एक मोठा मुद्दा राहिला आहे. स्त्रीप्रधान चित्रपटात जेव्हा मला एखाद्या मोठ्या कलाकारांची गरज पडते, तेव्हा ते मिळत नाहीत. एवढेच नव्हेतर स्त्रीप्रधान चित्रपटाचे नाव ऐकून कोणीच तयार होत नाही. आधी ज्याने अशा चित्रपटात काम केलेले असत तोदेखील लवकर तयार होत नाही. पडद्यावर त्यांची प्रतिमा मलिन होईल, याचा त्यांना धाक असतो. कारण ते पडद्यावर अभिनेत्रीपेक्षा कमी दिसू इच्छित नाहीत. ‘मिशन मंगल’मध्ये5 महिला होत्या, मात्र अक्षय टॉपवर होता. तरीदेखील एकाही अभिनेत्रीला पडद्यावर कमी वेळ मिळाला, याची खंत वाटली नाही. एखादा अभिनेता अशा प्रकारच्या चित्रपटात काम करत असेल तर समजून घ्या तो खूपच निडर आहे.

‘मंकी मॅन'मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अभिनेता सिकंदर खेर

अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेरने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो हॉलिवूड चित्रपटांमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहे. अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘मंकी मॅन’ द्वारे तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. देव पटेल ‘मंकी मॅन’ दिग्दर्शित करणार आहेत. दिग्दर्शनाबरोबरच तो चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयी सिकंदर म्हणाला, कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ नसता तर तो या मोठ्या चित्रपटाचा भाग झाला नसता. मात्र, लतीफ आता या जगात नाहीत. देव आणि सिकंदर व्यतिरिक्त, ‘मंकी मॅन’मध्ये शोभिता धुलीपाला, पिटोबाश त्रिपाठी आणि शार्ल्टो कोपलेदेखील दिसणार आहेत. पॉल अंगुनावाला, जॉन कॉली आणि देव यांनी या चित्रपटाचे लेखन केले. हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो.

'शबाना'मध्ये पहिल्यांदाच दिसणार प्रिन्स-युविका, टीजर-पोस्टर प्रदर्शित
टीव्हीची दमदार जोडी प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांची भूमिका असलेली वेब सिरिज ‘शबाना’चे टीझर पोस्टर रिलीज करण्यात आले. दोघेही पहिल्यांदाच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. त्याच्या पोस्टरमध्ये प्रिन्स आणि युविका डी-ग्लॅम लूकमध्ये दिसत आहेत. याविषयी प्रिन्स आणि युविका म्हणतात, ‘पहिल्यांदाच वेब सीरिजमध्ये एकत्र काम करत आहोत. आधी व्यस्त वेळापत्रकामुळे नकार दिला होता, मात्र कथा ऐकल्यानंतर ते नक्कीच करू, अशी खात्री झाली.’ मालिकेची निर्मिती निखिल खेरा यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...