आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:कुटुंबासोबत 'राधे' बघणार सलमान खान, 'विक्रम वेधा'च्या रिमेकमधून बाहेर पडला हृतिक, ट्राेल करणाऱ्यांना अमिताभ यांनी दिले खणखणीत उत्तर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

सुपरस्टार सलमान खानचा 'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट उद्या (13 मे) देशभरातील निवडक चित्रपटगृहांसह पे पर व्ह्यू सर्विसअंतर्गत झी 5 वर प्रदर्शित होतोय. तत्पूर्वी सलमान आपल्या घरीच संपूर्ण कुटुंबासह हा चित्रपट बघणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमानच्या जवळच्या एका मित्राने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे सलमान आपला चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत कधीच पूर्ण बघत नाही. पहिल्यांदाच थेट त्याच्या घरीच चित्रपट रिलीज होणार आहे. आणि तो कुटुंबासह चित्रपटाचा आनंद अनुभवणार आहे. प्रभू देवा दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसह दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

2 'द नाइट मॅनेजर’साठी आता हृतिकने सोडला 'विक्रम वेधा’
हृतिक रोशनने 'विक्रम वेधा’ या तामिळ सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार होता. मात्र आता त्याने हा रिमेक सोडल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या काही कलाकारांनी आधी हा सिनेमा सोडल्याची चर्चा होती. चित्रपटावर याच महिन्यात काम सुरू होणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला उशीर झाला. हृतिकदेखील हा सिनेमा करण्यात तयार होता. मात्र अचानक त्याने निर्णय बदलला. हृतिकने 'द नाइट मॅनेजर’चा रिमेक साइन केल्याची चर्चा अाहे. या चित्रपटाद्वारे हृतिक डिजिटल डेब्यू करणार आहे. याशिवाय तो वॉर फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या फायटरमध्येही लीड रोल साकारणार आहे. या चित्रपटाची घोषणा यावर्षी जानेवारी महिन्यात हृतिकच्या वाढदिवशी करण्यात आली होती.

3. 9 जुलैला 6 भाषांत प्रदर्शित होणार 'ब्लॅक विडो’
'ब्लॅक विडो’ या हॉलिवूड सिनेमाचे चार नवीन पात्रांचे पोस्टर्स मंगळवारी रिलीज करण्यात आले. या पोस्टर्समध्ये स्कॉरलेट जोहानसन, राचेल वेइज, फ्लोरेंस पुग्न आणि डेव्हिड हार्बर दिसत आहेत. पोस्टर्समध्ये त्यांचा लूक दमदार दिसत आहे. हा चित्रपट 9 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचेही निर्मात्यांनी सांगितले आहे. तोपर्यंत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल, असा त्यांचा विश्वास आहे. हा चित्रपट भारतात सहा भाषेत रिलीज होणार आहे. तो इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळमध्ये येईल.

4. ट्राेल करणाऱ्यांना अमिताभ यांनी दिले खणखणीत उत्तर
मदत करूनही टीका झाल्यामुळे अमिताभ बच्चन नाराज आहेत. त्यामुळे काेरोना महामारीत बिग बीने किती दान केले याची लिस्टच त्यांनी सोशल मीडियावर टाकून टीका करणाऱ्यांना खणखणीत उत्तर दिले आहे. केलेल्या मदतीविषयी सांगणे किंवा टाकणे हे लाजिरवाणे वाटते, मात्र मला काही लोकांमुळे ही माहिती टाकावी लागत आहे, असे बिग बी म्हणाले. ते म्हणाले, राेज मिळणाऱ्या शिव्या आणि अपमानास्पद टिप्पणीचा सामना करावा लागण्याआधीच मला ही यादी टाकायला हवी होती.

अमिताभ यांनी लिहिले... मीदेखील दान करतो. बऱ्याच वर्षापासून दान करत आलो. मात्र ते सांगायला हवेच हे मला गरजेचे वाटत नव्हते. मदत केल्याचे सांगणे मला लाजिरवाणे वाटते. मात्र मला हे नाइलाजाने सांगावे लागत आहे. मला आणि माझ्या कुटुंंबाला नेहमीच शिव्या आणि विचित्र टिप्पण्यांचा सामना करावा लागतो, मात्र आम्ही कधीच याकडे लक्ष दिले नाही. अमिताभ यांनी आतापर्यंत केलेल्या दानाची माहिती आकडेवारी आणि गाव, शहर, संस्था आणि हॉस्पिटलच्या नावासह शेअर केली आहे.

5. ‘कोविड वॉरियर’ अभियानात पुढाकार घेतल्याने सर्वांचे आभार : भूमी
भूमी पेडणेकर देशभरातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. तिने ‘कोविड वॉरियर’ नावाने सोशल मीडियावर एक अभियान सुरू केले आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहे. तिच्या या कामात तिला बऱ्याच लोकांनी साथ दिली आहे. ते पाहून भूमी खुश झाली अाहे. याविषयी ती म्हणाली, 'महामारीने आपल्याला एकत्र आणि जवळ आणले आहे. याआधी आपण कधीच नव्हतो. संकट आणि दु:खाच्या या काळात आपण त्यांची मदत करण्यास एकत्र आलो आहोत. ज्यांना आपण ओळखतही नाही. मी त्या प्रत्येक भारतीयाचे आभार मानते जे नागरिकांना वाचवण्यासाठी आणि गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या डिजिटल माध्यमावर प्रत्येक भारतीय माझ्यासोबत उभा असल्याचे मला माहीत आहे. मला त्यांचा अभिमान आहे.'

6. वेब सीरिज ‘महारानी’मध्ये हुमा कुरैशी राजकारण करताना दिसणार
हुमा कुरैशीच्या वेब सीरिज ‘महारानी’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही सीरिज राजकारणावर अाधाारित आहे. यात हुमा कुरैशाी राताेरात एका राज्याची मुख्यमंत्री बनते. ही वेब सीरिज काल्पनिक असल्याबरोबरच खऱ्या जीवनावरही आधारित आहे. हुमा यात राणी भारतीची भूमिका साकारत आहे. तिचे भाग्य रातोरात बदलते. तिला वर्तमान मुख्यमंत्री आजारी झाल्यामुळे रातोरात मुख्यमंत्री बनवण्यात येते. सोहम यात बिहारच्या मुख्यमंत्र्याची भूमिका करत आहेत. तर अमित सियाल विपक्ष पार्टीच्या एका व्यक्तीची भूमिका करत आहेत. यात दमदार संवाद आहेत.. ‘शतरंज के खेल में, आप तब तक नहीं जीत सकते जब तक आप महारानी पर कब्जा नहीं कर लेते’. करण शर्माने या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. 28मे रोजी ही सीरिज रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...