आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:आज रिलीज हाेणार ‘राधे’चे शीर्षक गीत, साजिदने दिला आवाज; जूनमध्ये प्रदर्शित होऊ शकते 'द फॅमिली मॅन 2' सीरिज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

सलमान खान आणि दिशा पाटणी यांच्या भूमिका असलेल्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’चे टायटल ट्रॅक बुधवारी रिलीज होणार आहे. गाण्याचे बोल ‘राधे-राधे’आहे. ते साजिद आणि वाजिद यांनी मिळून कंपोज केले होते आणि साजिदने याला आपला आवाज दिला आहे. गाण्याच्या माध्यमातून साजिद त्याचा दिवंगत भाऊ वाजिदला श्रद्धांजली वाहणार आहे.

याविषयी साजिद म्हणाला, गाण्यात आयकॉनिक ट्यून आहे. ती प्रेक्षकाचे लक्ष आकर्षित करेल. सलमानने या टायटल ट्रॅकवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मला बोलावले होते. त्यानंतर मी गाण्याला आवाज देण्याचे ठरवले. हे गाणे माझ्या खूप जवळचे आहे. या माध्यमातून मी माझा भाऊ वाजिदला श्रद्धांजली देऊ इच्छित आहे. हे गाणे डान्स मास्टर मुदस्सर खानने कोरिअोग्राफ केले आहे.

2. जूनमध्ये प्रदर्शित होऊ शकते मनोज वाजपेयीची 'द फॅमिली मॅन 2’ सीरिज

मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेली वेब सीरिज 'द फॅमिली मॅन'चे दुसरे सीझन यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार होते पण त्यावेळी ‘तांडव’ या वेब शोच्या वादामुळे निर्मात्यांनी ती प्रदर्शित केली नव्हती. आता हा शो जूनमध्ये प्रदर्शित होऊ शकतो, असे बोलले जात आहे. सूत्रानुसार, प्राइम व्हिडिओ लवकरच दिग्दर्शक जोडी राज आणि डीके यांच्यासमवेत रिलीजची अंतिम तारीख जाहीर करू शकते. खरं तर, प्राइम व्हिडिओच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे तेलुगू अभिनेत्री सामन्था अक्किनेनी या मालिकेतून हिंदीमध्ये पदार्पण करणार आहे.

3. फरहान अख्तरच्या 'तूफान'चे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर​​​​​​​

फरहान अख्तरचा 'तूफान' सिनेमा याच महिन्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार होता. मात्र आता तो पुन्हा लांबणीवर टाकण्यात आला आहे. कोरोनामुळे देशाची सद्यस्थिती पाहून निर्मात्यांनी एक स्टेटमेंट जारी केले आहे. यात त्यांनी लिहिले आहे, 'कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही उभे आहोत. जोपर्यंत परिस्थिती ठीक होत नाही तोपर्यंत तुफानचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. निर्मात्यांकडून लवकरच प्रदर्शनाची पुढची तारीख सांगण्यात येईल,' असेही पुढे लिहिण्यात आले आहे.

अशी होती आधीची प्लानिंग
चित्रपटाच्या प्रमोशन धोरणानुसार, मे महिन्याच्या सुरुवातीलाच ट्रेल लाँच आणि कलाकारांच्या मुलाखती होणार होत्या. मात्र आता सर्वच पुढे ढकलण्यात आले आहे.

4. विद्युत जमवालच्या 'सनक’मध्ये दिसणार बॅलेट अॅक्शन​​​​​​​​​​​​​​

विपुल अमृतलाल शाह यांच्या बॅनरखाली बनत असलेल्या विद्युत जामवालच्या आगामी सनक चित्रपटाचे दिग्दर्शन कनिक वर्मा करणार आहेत. चित्रपटाविषयी त्यांनी सांगितले, 'प्रेक्षकांनी आतापर्यंत विद्युतचे अॅक्शन असलेले चित्रपट पाहिलेले आहेत. मात्र यात त्याची वेगळीच शैली पाहायला मिळेल. विद्युतला कमांडो किंवा विशेष सैनिकाच्या भूमिकेतच पाहिले आहे. मात्र सनकमध्ये तो सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसेल. यात बॅलेट अॅक्शन पाहायला मिळेल.'

5. सारा-अनन्याने नकार दिल्यानंतर रकुलचा बोल्ड भूमिकेला होकार

रकुल प्रीत सिंहने रॉनी स्क्रूवाला यांचा डिजिटल सिनेमा साइन केला आहे. या सामाजिक नाट्यावर आधारित ती कंडोम टेस्टरची भूूमिका साकारणार आहे. हा चित्रपट फायनल झाला आहे. सद्यपरिस्थिती ठीक होताच निर्माते यावर काम सुरू करतील. यातच या भूमिकेसाठी रकुल निर्मात्यांची पहिली पसंत नसल्याचे समाेर आले आहे. सूत्रानुसार, रकुलच्या आधी निर्मात्यांनी सारा अली खान आणि अनन्या पांडे यांना विचारणा केली होती. त्यात साराने कथा एेकल्यानंतर नकार दिला होता तर अनन्यानेदेखील ही भूमिका आणि संकल्पना खूपच बोल्ड असल्याचे सांगत यात काम करण्यास नकार दिला होता.

6. जॅकलीन फर्नांडिसने लाँच केले YOLO फाउंडेशन

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने आयुष्यातील दयाळूपणा आणि चांगुलपणाच्या कथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एका फाउंडेशनची स्थापना केली आहे. या चांगल्या आणि समाजोपयोगी कामासाठी तिने अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत हातमिळवणी केली आहे. या संस्था समाजाच्या हितासाठी अतिशय उपयुक्त असे काम समाजाच्या तळागाळात जाऊन करत आहेत.‘रोटी बँक’ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, जॅकलीन या महिन्यात एक लाख लोकांपर्यंत जेवण पोहोचवणार असून फीलाइन फाउंडेशनसोबत, अभिनेत्रीने भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी एक उपक्रम सुरु केला आहे. त्यासोबतच, कोविड काळातील फ्रंट लाइन कार्यकर्ता मुंबई पोलिस दलाला मास्क आणि सॅनिटायझरचे देखील वितरण करण्यात येणार आहे. तिने यासंदर्भात आपल्या सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्टदेखील शेअर केली आहे. जॅकलीन कठीण काळात ज्यांना सर्वाधिक गरज होती त्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे राहिली आहे, मग ते पूरग्रस्तांच्या घरांचे पुनर्निर्माण असो की मुलांच्या पोषणासाठीचे कार्य, आपल्या सकारात्मक दृष्टीकोनासोबत, जॅकलीनने त्या लोकांमध्ये प्रेम आणि आनंद पसरवला आहे, ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज होती.

बातम्या आणखी आहेत...