आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief Salman Khan Returns To Set For First Time After Lockdown, Trailer Of 'Tufan' To Be Released On June 30 Filhaal 2 Mohabbat: Akshay Kumar And Nupur Sanon Unveil Yet Another Romantic Poster

बॉलिवूड ब्रीफ:लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सेटवर परतला सलमान खान, 30 जूनला येणार 'तुफान'चा ट्रेलर, अक्षय कुमारच्या 'फिलहाल 2'चे दुसरे पोस्टर आउट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

सलमान खान सोमवारपासून ‘अंतिम’ चित्रपटाच्या पॅचवर्कसाठी शूटिंगच्या सेटवर परत आला आहे. तो पहिले दोन दिवस कमलिस्तान स्टुडिओ आणि पुढील दोन दिवस भायखळ्यातील बंगल्यात शूट करणार आहे. सलमान दुसऱ्या लॉकडाउननंतर पहिल्यांदा सेटवर परतला. यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान सलमानने चित्रपटाचे चित्रीकरण केले होते आणि त्याची ‘राधे’देखील ईदला प्रदर्शित झाला होता. ‘अंतिम’ विषयी सांगायचे झाले तर त्यामध्ये सलमानची खास भूमिका आहे. त्यामध्ये त्याचा मेहुणा आयुष शर्मा मुख्य भूमिकेत आहे. ऑक्टोबर आणि त्यापलीकडे थिएटर सुरू होण्याची अपेक्षा नसल्यामुळे मांजरेकर यांनी नुकताच हा सिनेमा पुढे ढकलला होता.

2. ट्रेलर रिलीजच्या आधी ‘तूफान’चे नवे पोस्टर झाले रिलीज
अमेझॉन प्राइम व्हिडिओद्वारे ‘तूफान’चा ट्रेलर 30 जुलै रोजी रिलीज होणार आहे. सध्या निर्मात्यांनी चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज केले आहे. चित्रपटाला एक नवीन रिलीज डेट मिळाली आहे. तूफान भारतात आणि 240 देशांत इतर क्षेत्रासह 16 जुलाई 2021 पासून अमेझॉन प्राइम व्हिडिओबराेबरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. ‘तूफान’चे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे तर यात फरहान अख्तरने अभिनय केला आहे आणि मृणाल ठाकूर व परेश रावल देखील प्रमुख भूमिकेत आहेत.

3. अक्षय कुमारचा म्युझिक व्हिडिओ 'फिलहाल 2' चे दुसरे पोस्टर रिलीज
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी ‘फिलहाल 2’ या म्युझिक व्हिडिओचा पहिला लूक रिलीज केला होता. आता अलीकडेच अक्षयने या गाण्याशी संबंधित दुसरे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. या नव्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार आणि नुपूर सेनन रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. गाण्याचे दुसरे पोस्टर शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, "काही कथा कायम आपल्यासोबत असतात. 'फिलहाल 2 मोहब्बत'चा टीझर 30 जून रोजी रिलीज होत आहे." या म्युझिक व्हिडिओपूर्वी गायक ब्री प्राक 'फिलहाल' हा म्युझिक व्हिडिओ घेऊन आला होता. या म्युझिक व्हिडिओमधील अक्षय आणि नुपूरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.

4. अभिनेत्री तापसी पन्नूने साइन केला आणखी एक युनिक चित्रपट
तापसी पन्नू सर्वात व्यग्र अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या खात्यात अनेक चित्रपट आहेत. त्यातील काहींचे शूटिंग अडकले असून काहीजण रिलीजसाठी तयार आहेत. दरम्यान, तापसीने एक अनोख्या संकल्पनेचा चित्रपट साइन केला. हा विज्ञान कल्पित चित्रपट आहे. यातून प्रेक्षकांसमोर एलियनची कहाणी दाखवली जाईल. एका सूत्रानुसार, या विज्ञान कल्पित चित्रपटाचे नाव ‘एलियन’ असू शकते. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी भारत नीलकंठण यांना देण्यात आली आहे. नीलकंठानने पटकथा तापसीला सांगितली असून अभिनेत्रीलाही पटकथा आवडली आहे. प्रकल्पाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले, हा विज्ञान कल्पित चित्रपट एलियनवर आधारित आहे. कहाणी पूर्णपणे वेगळी असणार आहे. चित्रपट कोणत्याही हॉलिवूड प्रकल्पावर आधारित नाही. भारतासारख्या देशातही सामान्य लोकांमध्ये एलियन कसे अस्तित्वात असू शकतात हे या चित्रपटात दाखवले जाईल. यात व्हीएफएक्सचा बऱ्यापैकी वापर करण्यात येईल. चित्रपटाच्या बजेटपैकी 10 कोटी रुपये फक्त व्हिज्युअल इफेक्टवर खर्च होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

5. मामुटीचा मल्याळम चित्रपट ‘वन’चा हिंदी रिमेक बनवणार बोनी कपूर
बोनी कपूर यांनी मामुटीच्या मल्ल्याळममधील हिट राजकीय नाट्यावर आधारित चित्रपट ‘वन’च्या रिमेकची अधिकार विकत घेतले. याचा रिमेक बनवण्यासाठी बोनी यांचे एक मित्र राजेश वासानी यांनी सुचवले होते. याच्या हिंदी रिमेकची तयारी 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये केली जाणार आहे. यात एका आदर्श मुख्यमंत्र्याचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. मूळ चित्रपटात कडक्कल चंद्रन (ममूटी) यांना केरळच्या मुख्यमंत्रीच्या रुपात दाखवण्यात आले होते. िशवाय अजय देवगणसोबत ‘मैदान’चे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर बोनी आपली मुलगी जान्हवी कपूरसोबत 2019च्या मल्याळम सिनेमा ‘हेलेन’ च्या रिमेकवरदेखील काम सुरू करणार आहेत.

6. शेवटच्या क्षणांत भावाशी बोलू न शकल्याचे दु:ख आहे : निक्की
‘बिग बॉस 14’ मध्ये झळकलेली निक्की तांबोळी स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये सहभागी झाली आहे. हा शो लवकरच टीव्हीवर सुरु होणार आहे. यादरम्यान तिचा भाऊ जतिन तांबोळीचे कोरोनामुळे निधन झाले. मात्र निक्कीने आपले दुःख कधीच कामात अडसर ठरू दिले नाही. भावाच्या निधनानंतर निक्की ‘खतरों के खिलाडी’ साठी केपटाऊनला रवाना झाली. निक्कीने सांगितले, ‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर मला इतके काम मिळाले की बसून आपल्या भावांसोबत काही बोलूही शकले नाही. भावाला माझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होती परंतु मला वेळच मिळाला नाही त्याचं खूप दुःख जाणवतंय.

7. ‘नागिन’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसू शकते रिद्धिमा पंडित
टीव्ही मालिका ‘नागिन’ च्या सहाव्या सिझनची नुकतीच घोषणा झाली. यातील काही नवीन कलाकारांची नावे समोर आली आहेत. मालिकेमध्ये नव्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेसाठी एकीकडे नियती फतनानीच्या नावाची चर्चा सुरू आहे तर दुसऱ्या मुख्य भूमिकेसाठी नव्या हिरोइनची निवड केल्याचे बोलले जात आहे. यात रिद्धिमा पंडित दिसू शकते. रिद्धिमा मुख्य अभिनेत्रीपैकी एक असेल. नियती फतनानीसोबत रिद्धिमाची निवड करण्यात आली. रिध्दिमाचे नाते एकता कपूर सोबत चांगले आहे. एकता नेहमीपासूनच रिद्धीमाचे कौतुक करत आली आहे.

बातम्या आणखी आहेत...