आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Bollywood Brief; Sunny Deol Ameesha Patels Gadar 2 Go On Floors In November, Aditya Chopra Turned Down An Offer Of 400 Crores From OTT Platform

बॉलिवूड ब्रीफ:नोव्हेंबरपासून फ्लोअरवर येणार सनी देओल-अमिषा पटेलचा 'गदर 2', आदित्य चोप्राने नाकारली OTT प्लॅटफॉर्मकडून मिळालेली 400 कोटींची ऑफर

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

दिग्दर्शक अनिल शर्मा 2001 च्या सुपरहिट ठरलेल्या 'गदर' या चित्रपटाच्या दुस-या भागाची तयारी करत आहेत. पहिल्या भागाप्रमाणे या चित्रपटातही सनी देओल, अमिषा पटेल मुख्य भूमिकेत असतील. याशिवाय, अनिलचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील चित्रपटात दिसणार आहे. उत्कर्षने 'जिनिअस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये त्याने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम केले. तो या चित्रपटात अमिषा आणि सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. 2001 मध्ये 'गदर' रिलीज झाला तेव्हा उत्कर्ष फक्त 6 वर्षांचा होता. नोव्हेंबरपासून हा चित्रपट फ्लोअरवर येणार असल्याची चर्चा आहे.

 • आदित्य चोप्राने 400 कोटींची ऑफर नाकारली ?

कोरोना काळात अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय शोधला. सलमान खान आणि अजय देवगण सारख्या अभिनेत्यांचे चित्रपटही येथे लाँच करण्यात आले होते, परंतु यशराज बॅनरचा प्रमुख आदित्य चोप्राने ओटीटी प्लॅटफॉर्मकडून आलेली ऑफर नाकारल्याचे वृत्त आहे. बंटी और बबली 2, शमशेरा आणि पृथ्वीराज हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, अमेझॉन प्राइम व्हिडिओने आदित्यला 4 चित्रपटांसाठी 400 कोटींची ऑफर दिली होती, पण निर्मात्याने ती नाकारली. एका सूत्राने सांगितले की, आदित्य लवकरच त्याच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करेल.

 • सत्यघटनेवर आधारित ‘सेव्ह द फॉरेस्ट’ थीमवर आधारित वरुणचा ‘भेडिया’

वरुण धवन आपल्या आगामी 'भेडिया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने फेब्रुवारीमध्ये चित्रपटाची घोषणा केली होती आणि मार्चमध्ये शूटिंग सुरू केले होते. हा चित्रपट 'सेव्ह द फॉरेस्ट’च्या थीमवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. मात्र चित्रपट अमर कौशिक यांच्या शैलीत हलक्याफुलक्या शैलीत चित्रित केला गेला आहे. या चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल जूनमध्ये मुंबईत शूट केले गेले. सध्या यावर पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन अमरने केले आहे. कोरोना महामारीच्या काळात या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले. चित्रपटात वरुणचे पात्र पौर्णिमेच्या रात्री लांडगा होताना दिसेल. मात्र हिरोइनच्या पात्राची माहिती समोर आली नाही.

 • यशराज बॅनरचे काम मिळाल्याने स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटतेय - शालिनी पांडे

अभिनेत्री शालिनी पांडे बॉलिवूडमध्ये 'जयेशभाई जोरदार’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. तिने गुरुवारी तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिला कसली इच्छा आहे? असे विचारले असता, शालिनी म्हणाली, तिला देशभरातील चित्रपटगृहे उघडण्याची इच्छा आहे आणि प्रेक्षक मोठ्या पडद्यावर 'जयेशभाई जोरदार’ पाहायला जातील. शालिनी पुढे म्हणते, 'मी गेल्या एक वर्षापासून ‘जयेशभाई जोरदार’च्या रिलीजची वाट पाहत आहे. आता मी आणखी वाट पाहू शकत नाही.’ शालिनीचा आदित्य चोप्रासोबत तीन चित्रपटांचा करार आहे. यावेळी ती म्हणाली, 'यशराज बॅनरसोबत 3 चित्रपटांचा करार करणे म्हणजे एक मोठी गोष्ट आहे, हे निश्चितपणे एक मोठे लाँचपॅड आहे. एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.'

 • टायगर श्रॉफच्या आगामी ‘गणपत’ चित्रपटात झाली एली एवरामची एंट्री

टायगर श्रॉफ सध्या ‘गणपत’ चित्रपटाच्या शूटिंमध्ये व्यग्र आहे. यात टायगरसोबत कृती सेनन दिसणार आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात एली अवरामदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. एली लवकरच चित्रपटाच्या इतर कलाकारांसेाबत शूटिंग सुरू करणार आहे. आतापर्यंत या भूमिकेसाठी नोरा फतेही आणि नूपुर सेननचे नाव समोर आले होते. टायगर आणि कृतीप्रमाणेच एलीचादेखील चित्रपटात स्पेशल लूक असेल आणि निर्माते तिच्या भूमिकेचे डिझाइन करत आहेत. चित्रपटाची कथा 2030 पासून सुरू हाेणार आहे. मात्र याची कथा 2090 वर आधारित असल्याचे बोलले जात होते. याचे दोन भाग बनवले जातील. यात गणपतचे 10 वर्षांचे जीवन दाखवले जाईल, तसेच त्याच्या एमएमए फायटिंग करिअरमधील चढउतार दाखवला जाईल. चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबरपासून सुरू होईल. ते जानेवारी 2022 मध्ये संपणार आहे. चित्रपटात मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्सचा वापर दाखवला जाईल. हा चित्रपट 2022 च्या नाताळला प्रदर्शित होऊ शकतो.

 • ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार पलक तिवारीचा चित्रपट ‘रोजी : द सॅफ्रॉन चॅप्टर’

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ‘रोजी : द सॅफ्रॉन चॅप्टर’ चित्रपटातून पर्दापण करणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाची निर्मिती प्रेरणा व्ही अरोराने याविषयी खुलासा केला. तिने चित्रपटाच्या रिलीजविषयी सांगितले, या वर्षी ऑक्टोबरमध्ये रोजी रिलीज होईल, याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. हा चित्रपट नोएडामध्ये झालेल्या एका सत्यघटनेवर आधारित आहे. अकाली मृत्यू झाल्यानंतर कुटुंब आणि मित्रांवर त्याचा काय परिणाम होतो, याची कथा चित्रपटात दाखवली जाणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, लखनऊ आणि भारताच्या इतर भागात करण्यात आले. हा चित्रपट एका हॉरर प्रेमकथेवर आधारित आहे. अरबाज खान आणि तनीषा मुखर्जीदेखील या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल रंजन मिश्रा यांनी केले आहे. विवेक ओबेरॉय निर्मित हा पहिला चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...