आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief; Sushant Singh Rajput Girlfriend Rhea Chakraborty Bigg Boss 15 Contestant Hrithik Started Preparing For 'Krrish 4', Hints From The Video

बॉलिवूड ब्रीफ:'बिग बॉस 15'मध्ये स्पर्धक म्हणून दिसू शकते रिया चक्रवर्ती, ‘क्रिश 4’च्या तयारीला लागला हृतिक, व्हिडिओतून दिले संकेत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी

छोट्या पडद्यावरील बिग बॉस या कार्यक्रमाचे 15 वे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या नवीन पर्वात कोण कोण कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत, याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना आहे.या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी निर्मात्यांनी आता रिया चक्रवर्ती हिच्याशी संपर्क साधला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉसचे निर्मात्यांनी या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. रिया ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी होती. त्याच्या निधनानंतर ती चर्चेत आली होती. रियाशिवाय वरुण सूद, नेहा मर्दा, भूमिका चावला, पार्थ समथान, सुरभी चंदना, दिशा वकानी, कृष्णा अभिषेक या पर्वात सहभागी होऊ शकतात अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

2. 'क्रिश 4' चा टीझर पाहा

सुपरस्टार हृतिक रोशनच्या ‘क्रिश’ चित्रपटाला 15वर्षे पूर्ण झाली आहेत. हृतिकने हा आनंद एका खास पद्धतीने शेअर केला आहे. चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्याने ‘क्रिश 4’ बद्दलचे संकेत दिले आहेत. एक छोटासा व्हिडिओ पोस्ट करत हृतिकने लिहिले, ‘जे झाले ते संपले. आता भविष्यात काय घडणार आहे ते पाहण्याजोगे राहिल. या पोस्टसह हृतिकने स्पष्ट केले की, ‘क्रिश 4’ नक्कीच पाइपलाइनमध्ये आहे. बातमीनुसार, हा चित्रपट किमान एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला आहे आणि तो 2022 मध्ये सुरू होऊ शकेल. हृतिक या चित्रपटात तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. या तीन पात्रांसाठी तीन वेगवेगळे लुक डिझाइन केले आहेत.

3. ‘इमर्जन्सी’मध्ये इंदिरा गांधींच्या भूमिकेसाठी कंगनाने केले स्कॅनिंग
कंगना रनोट आपल्या बॅनरच्या ‘मणिकर्णिका फिल्म्स’ अंतर्गत ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची तयारी करत आहे. नुकतेच तिने आपल्या साेशल मीडिया अकाउंटवर दोन व्हिडिओ शेअर केले. त्यात ती पूर्ण शरीराचे स्कॅनिंग करताना दिसत आहे. यात कंगना दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या चित्रपटात दिसणार आहे. बॉडी स्कॅनिंगच्या माध्यमातून त्यांच्या लूकचा खाका तयार करण्यात येईल. यापूर्वी प्रोस्थेटिकचा वापर करून कंगनाने जयललिताचे पात्र साकारले होते. मात्र ‘इमर्जन्सी’ चित्रपट इंदिरा गांधी यांचा बायोपिक नसल्याचे कंगनाने स्पष्ट केले आहे. यासह कंगनाने तिच्या आणखी एका कमेंटसाठी चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर दोन कथा पोस्ट केल्या आहेत. ज्यामध्ये तिने भारत आणि इंडिया यांच्यातील फरक सांगितला. भारताची व्याख्या सांगताना कंगनाने लिहिले, ‘हा एक संस्कृत शब्द आहे. भा म्हणजे भाव, रा म्हणजे राग आणि ता म्हणजे ताल. याशिवाय कंगनाने इंडियाबद्दलही भाष्य केले आहे. तिने लिहिले, ‘भारत आपल्या पुरातन संस्कृतीवर विश्वास ठेवुन त्याच मार्गावर पुढे जाईल तेव्हाच प्रगती होईल.' याशिवाय कंगनाने देशाचे नाव बदलण्याचाही सल्ला दिला आहे. तिने इंडियाचे नाव बदलून भारत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

4. रिलीजपूर्वी कायदेशीर कचाट्यात सापडली ‘ग्रहण’ मालिका, बॅन करण्याची झाली मागणी
वेब सिरीज ‘ग्रहण’ मालिका 24 जूनला रिलीज होणार होती, मात्र आता ती कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. 1984 च्या दंगलीवर आधारित या वेब सिरीजला बंद करण्याची मागणी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष बीबी जागीर कौर यांनी केली आहे. अमृतसरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत कौर यांनी सांगितले, ‘1984च्या शीख नरसंहारवर आधारित ‘ग्रहण’ नावाच्या सिरीजमध्ये एका शीख पात्राला आक्षेपार्ह पद्धतीने चित्रित केले. वेब सिरीजमध्ये एका शीख पात्रावर शीख नरसंहार केल्याचा आरोप केला जात आहे, जे अत्यंत निंदनीय आणि बनावट आहे. ‘ग्रहण’ मालिकेचे निर्माते अजय जी राय आणि सुनील रायन यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या मालिकेद्वारे शिखांच्या जखमेवर मीठ शिंपडण्याचे काम केले जात आहे. रंजन चंदेल दिग्दर्शित हा शो सत्य व्यासची कादंबरी ‘चौरासी’वर आधारित आहे. आठ भागाची ही सिरीज 1984 च्या दंगलीवर आधारित आहे.

5. राजकुमार रावसोबत काम करण्याची वाट पाहतेय सामंथा
सामंथा अक्किनेनी सध्या ‘द फॅमिली मन 2’ मुळे चर्चेत आहे. तिला बॉलिवूडमध्ये चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली आहे. या शिवाय तिला हिंदी सिने इंडस्ट्रीतील काही कलाकार आधीपासून आवडतात. यात राजकुमार राव आणि शाहिद कपूर यांच्या नावाचा समावेश आहे. शाहिदसोबत काम करण्याची इच्छा तिने आधीच व्यक्त केली होती. आता एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले, तुला बॉलिवूडचा कोणता अभिनेता आवडतो, यावर तिने राजकुमार रावचे नाव घेतले. एवढेच नव्हे तर राजकुमार राव सोबत तू काम करशील का? असे विचारल्यावर ती म्हणाली, एखादी चांगली स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्कीच काम करेल. मी त्याच्यासोबत काम करण्याची वाट पाहत असल्याचे ती म्हणाली.

5. हॉलिवूडमध्ये एंट्री करणार विद्युत, वंडर स्ट्रीट करणार प्रतिनिधित्व, हॉलिवूड एजन्सीने केले साइन
विद्युत जामवाल जगाच्या टाॅप मार्शल आर्टिस्टपैकी एक मानला जातो. लवकरच तो हॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. हॉलिवूडमध्ये अभिनेते टोनी यांचे काम पाहणारी एजन्सी वंडर स्ट्रीटने आता विद्युतला साइन केले आहे. वंडर स्ट्रीट आता विदेशी सिने कंपन्यात विद्युतला रिप्रेझेंट करणार आहे. या एजन्सीने या पूर्वी टोनी झा, मायकल झा व्हाइट आणि डॉल्फ लुंडग्रिनसारख्या अॅक्शन कलाकारांना रिप्रेझेंट केले आहे. वंडर स्ट्रीटसोबत आपल्या कराराविषयी जामवाल म्हणतो, मी हॉलिवूडमध्ये काही सर्वात मेहनती कलाकारांसोबत जोडून खुश आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी टोनी झा यांनी जामवालसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

6. प्रियंका चोप्रा म्हणाली - सत्यकथा सादर करण्याची संधी देतेय ओटीटी माध्यम

प्रियंका चोप्रा जोनास भारतात वेब प्लॅटफॉर्मची वाढ पाहून खूप आनंदी आहे. नुकतेच तिने एका व्हर्च्युअल कार्यक्रमात भाग घेतला होता, जिथे ती बॉलिवूड इंडस्ट्री, ओटीटी प्लॅटफॉर्म, नवीन टॅलेंट, सर्जनशील स्वातंत्र्य इत्यादी विषयांवर उघडपणे बोलली. भारतातील ओटीटी व्यासपीठाबद्दल बोलताना प्रियंका म्हणाली, या माध्यमाच्या उदयाबरोबरच उद्योगातील करमणूक प्रणाली लोकशाही व्यवस्थेत परिवर्तित झाली आहे. ज्यामुळे अनेक नव्या कलागुणांना संधी मिळत आहे. ओटीटीने बऱ्याच निर्मात्यांना या सूत्राबाहेरचे चित्रपट बनवण्यास प्रोत्साहित केले आहे. ओटीटी लोकांना सत्य कथा समोर आणण्याची संधी देत आहे. बॉलिवूडचा फॉर्म्युला ट्रेंड तोडण्यात हे व्यासपीठही यशस्वी सिद्ध होत आहे. जास्तीत जास्त आशियाई कलाकारांनी यावर आपली प्रतिभा दाखवावी अशी माझी इच्छा आहे. प्रियंकाचे यासाठी काैतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...