आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief Teaser Release Of Siddharth Shukla's 'Broken But Beautiful 3', Deepika Kareena Ramayan News ,Vidya Balan , Adar Jain Tara Sutaria News

बॉलिवूड ब्रीफ:सिद्धार्थ शुक्लाच्या ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ चा टीझर रिलीज ; ‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्रीचा श्वान हरवला, शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आगामी ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ या वेब सीरिजचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आलाय. सोनिया राठी यात सिद्धार्थसह मुख्य भूमिकेत आहे. यंदाच्या सीजनमध्ये रोमान्स आणि ड्रामा एकत्र पहायला मिळणार असे टीझरवरुन दिसून येतंय. आतापर्यंत ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’चा पहिला आणि दुसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. आता आता तिस-या सीझनमध्ये नवी कहाणी आणि नवी स्टारकास्ट देखील पहायला मिळणार आहे.

ऑल्ट बालाजीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर हा टीझर शेअर करण्यात आला आहे. यासोबतच त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात त्यांनी लिहिलंय, 'जिद्द कधी संपत नाही…ती फक्त रूपांतरीत होते….रूमी आणि अगस्त्यची कहाणी सुद्धा अशीच आहे…कधी कधी तुम्हाला जसं हवं असतं तसं होतंच असं नाही….' ही वेब सीरिज येत्या 20 मे रोजी ऑल्ट बालाजीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

2. अभिनेत्री निधी अग्रवालचा कोको हरवला आहे, शोधून देणा-याला 1 लाखाचं बक्षीस
‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्री निधी अग्रवालकडे गोल्डन रिट्रीव्हर जातीचा एक पाळीव श्वान आहे. ‘कोको’ असे त्याचे नाव आहे. मात्र, नुकताच हा ‘कोको’ हरवला आहे. त्याचा शोध घेण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा निधीने केली आहे. टॉलीवूड नेटच्या वृत्तानुसार, निधीचा पाळीव श्वान ‘कोको’ काल तिच्या बंगळूरमधील घरातून बेपत्ता झाला होता. निधीचे तिच्या पाळीव प्राण्यांशी अतिशय जवळचे नाते आहे आणि ती तिच्या सोशल मीडिया हँडलवर या पाळीव प्राण्यांचे बरेच व्हिडीओ शेअर करत असते. निधीने 2017 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली असून तिने बॉलिवूडमध्ये ‘मुन्ना माइकल’ या चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर तिने काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये ‘सव्यसाची’, ‘मिस्टर मजनू’, ‘आईस्मार्ट शंकर’ या चित्रपटांचा समावेश आहे. आता निधीचे ‘भूमि’ आणि ‘पूनगोडी’ हे तामिळ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

3. 'रामायण' सिनेमात सीतेच्या भूमिकासाठी दीपिकाची वर्णी?
दंगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आपल्या आगामी रामायण या चित्रपटामुळे ब-याच दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या या चित्रपटात हृतिक रोशन रावण तर हमेश बाबू श्रीरामाची भूमिका साकारणार असल्याची बातमी होती. आता यात सीतेच्या मुख्य भूमिकेसाठी दोन अभिनेत्रींच्या नावाचा अंदाज वर्तवला जात आहे. सूत्रानुसार, सीतेच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोण आणि करीना कपूरच्या नावाचा विचार सुरु आहे. करीना किंवा दीपिकापैकी कोणीही या चित्रपटात काम करायला तयार झाली, तर ती सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरु शकते.

4. तारा आणि मी आपापल्या जगात खुश आहोत, लग्नाचा सध्या विचार नाही : आदर
आदर जैन आणि तारा सुतारिया यांनी गेल्या वर्षी आपल्या नात्यांचा स्वीकार केला होता. त्यानंतर आदर आणि तारा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होती. आता पहिल्यांदाच आदरने प्रेम आणि ताराशी लग्नाच्या विषयावर बोलला. तो म्हणाला, 'मी माझ्या आणि ताराविषयी सांगू इच्छित आहे. सध्या तर आम्ही दोघेही आपापल्या जगात आनंदी आहोत. तारा माझ्यासाठी खूप खास आहे. आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत. आम्ही बराच वेळ एकत्र घालवतो.' त्यानंतर आदला जैनला विचारले तू ताराशी साखरपुडा करणार आहेस का ? यावर तो म्हणाला, 'आम्ही सध्यातरी लग्नाचा विचार केला केला नाही. अजून बराच वेळ आहे.’

5. स्त्रीप्रधान चित्रपट करायला आवडतील : तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया लवकरच ‘नोव्हेंबर स्टोरी’ नावाच्या तामिळ चित्रपटाद्वारे डिजिटल डेब्यू करणार आहे. ही वेब मालिका 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मुलाखतीत ती म्हणाली, ‘मी एकाच कामावर लक्ष केंद्रित करत नाही. ही एक उत्तम थ्रिलर आणि गुन्हेगारीची कहाणी आहे. ही 7 भागांमध्ये बनवली गेली आहे. मला बऱ्याच काळासाठी वेब सीरिजमध्ये काम करण्याचीही इच्छा होती. यात मी अनुराधाची भूमिका साकारत आहे, जी हॅकर आहे. ती वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढा देते. यात माझे वडील हे गुन्हेगारीवर आधारित कादंबरीचे लेखक असतात. जबाबदारी घेते. शिवाय मला स्त्री प्रधान चित्रपट करण्याचीही आवड आहे.

6. 'तुम्हारी सुलू'च्या निर्मात्यांसोबत पुन्हा काम करणार विद्या बालन
विद्या बालन सध्या शेरनी चित्रपटावर काम करत आहे. यानंतर ती तुम्हारी सुलू या चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत काम करणआर आहे. सूत्रानुसार, विद्याने ऑलिप्सिस एंटरटेन्मेंटच्या पुढच्या सिनेमाला होकार कळवला आहे. या प्रॉडक्शनचे काम तनुज गर्ग आणि अतुल कस्बेकर पाहात आहेत. दोघेही काही दिवसांपासून विद्यासोबत चर्चा करत आहेत. त्यांनी स्क्रिप्टचे कामही पुर्ण केले आहे. स्वाती अय्यर चावला सहनिर्मिती करत आहेत. सिनेमाचे शूटिंग मुंबई आणि दक्षिण भारतात 45 दिवसांत पूर्ण केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...