आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:RRR मध्ये आलियावर चित्रित होणार सर्वात महागडे आयटम साँग, ‘ब्लर’ तापसीच्या बॅनरचा पहिला चित्रपट, स्वत: करणार भूमिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

‘आरआरआर’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. यातून आलिया भट्ट दक्षिणेत पाऊल ठेवत आहे. यात आलियावर चित्रित होणारे डान्स आयटम साँग आतापर्यंतचे सर्वात महागडे असल्याची बातमी आहे. चित्रपटाचे शूटिंग हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. या गाण्यावर सुमारे 3 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे बोलले जात आहे. एका एकरात पसरलेल्या विशाल सेटवर त्याचे चित्रीकरण करण्यात येईल. या गाण्यातील परिधान केलेल्या कपड्यांची किंमतही कोटीमध्ये आहे.

2. ‘ब्लर’ तापसीच्या बॅनरचा पहिला चित्रपट, स्वत: करणार भूमिका

तापसी पन्नूने गुरुवारी आपले प्राॅडक्शन हाऊस ‘आऊटसायडर्स फिल्म्स’ लाँच केले. तिच्यासाेबत प्रांजल खांडडिया जाेडले गेले आहेत, ते कंटेंट क्रिएटर आणि निर्माते आहेत. प्रांजल ‘सुपर 30’, ‘83’, ‘सूरमा’, ‘पीकू’, ‘मुबारकां’ आणि ‘अझहर’ सारख्या चित्रपटाचा भाग राहिले आहेत. या घोषणेसह तापसीने आपल्या बॅनर खाली बनणाऱ्या पहिल्या 'ब्लर’ चित्रपटाचा पहिला लूकदेखील रिलीज केला. चित्रपटात तापसी स्वत: मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन अजय बहल करणार आहेत, त्यांनी यापूर्वी 'सेक्शन 375’ आणि “बीए पास’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

3. शाहिदने साइन केला अ‍ॅक्शन चित्रपट, डिसेंबरपासून शूटिंग
आपल्या ‘जर्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शाहिद कपूरने आता निर्माते भूषण कुमारचा एक अ‍ॅक्शन चित्रपट साइन केला आहे. शाहिदला या चित्रपटाची कथा आवडली आहे. भूषण कुमार आणि अमर बुटाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. शाहिद बऱ्याच दिवसांपासून अमरबरोबर या चित्रपटाविषयी चर्चा करत होता आणि आता तो त्यात काम करायला तयार झाला आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये शाहिद त्याचे चित्रीकरण सुरू करणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलची शूटिंग भारतात होणार आहे. दरम्यान शाहिदने मुंबईत वेब सिरीज ‘फेक’चे शूटिंग सुरू केले आहे. याच्या 30 दिवसाचे शूटिंग दोन महिन्यापूर्वी गोव्यात झाले आहे. त्यानंतर आता निर्माते मुंबईच्या वेगवेगळ्या भागात याच्या तिसऱ्या शेड्यूलचे शूट करणार आहेत. तिसरे शेड्यूल 40 दिवसांचे आहे. यात शाहिदसोबत राशी खन्ना दिसणार आहे. याशिवाय यात विजय सेतुपथी दिसणार आहेत.

4. टेंप्टेशन आयलँड-रिअ‍ॅलिटी शोच्या हिंदी आवृत्तीचे सूत्रसंचालन करणार कंगना रनोट सध्या कंगना रनोट तिच्या आगामी चित्रपटांबद्दल चर्चेत आहे. आता कंगना अमेरिकन रिअ‍ॅलिटी शो ‘टेम्प्टेशन आयलँड’ या हिंदी व्हर्जनचे होस्ट करताना दिसणार आहे. या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून कंगना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. शोचे शूटिंग लवकरच सुरू होऊ शकते, असे बोलले जात आहे. या शोमध्ये कलाकार जोडी आणि एकरीदेखील भाग घेताना दिसणार आहेत. हा कार्यक्रम अतिशय रंजक स्वरुपाने बनवण्यात आला आहे. यामध्ये जोडप्यांमधील खरी बाँडिंग तपासली जाईल.

बातम्या आणखी आहेत...