आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:अक्षय कुमारने 'बेल बॉटम'च्या टीमसोबत साइन केला नवा चित्रपट, आवडता हीरो कोण 'शाहरुख की सलमान?' या प्रश्नाचे उत्तर देत विद्याने केली नेटक-याची बोलती बंद

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

'बेल बॉटम'नंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा या चित्रपटाच्या टीमसोबत काम करणार आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. पण 'बेल बॉटम'प्रमाणेच हा चित्रपटही वासू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांची कंपनी पूजा एंटरटेन्मेंटची निर्मिती असेल. असे सांगितले जात आहे की, निर्मात्यांनी अक्षयला चित्रपटाची कहाणी सांगितल्यानंतर त्याने लगेचच या चित्रपटासाठी होकार दिला आहे. हा एक बिग बजेट अ‍ॅक्शन चित्रपट असेल. 'रक्षाबंधन' आणि 'राम सेतु'च्या रॅपअपनंतर अक्षय या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू शकतो. चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

2. विद्या बालनने केली नेटक-याची बोलती बंद
अभिनेत्री विद्या बालन हिने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसाठी लाइव्ह सेशन आयोजित केले होते. या सेशनमध्ये नेटकरी विद्याला प्रश्न विचारू शकत होते. एका नेटक-याने विद्याला तिचा आवडता अभिनेता कोण असे विचारले आणि सलमान की एसआरके असे पर्याय दिले. त्यावर विद्याने खास शैलीत उत्तर देत 'माय एसआरके' लिहित आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आणि सोबत एक लाल हार्टवाला इमोजीदेखील लिहिला. विद्याच्या या उत्तराचा अर्थ अनेक चाहत्यांना कळाला नाही. परंतु, विद्याच्या या उत्तराचा रोख तिच्या पतीकडे होता. विद्याने आपल्या पतीसाठी प्रेम व्यक्त करत एसआरके लिहिले. या एसआरकेचा अर्थ सिद्धार्थ रॉय कपूर असा होतो. आणखी एका नेटक-याने विद्याच्या रिलेशनशिपचे स्टेटस विचारत लिहिले, 'तुम्ही कमिटेड आहात का?' त्यावर पुन्हा एकदा आपल्या पतीसोबतचा सुंदर फोटो शेअर करत विद्याने लिहिले, 'मला तरी तसंच वाटतंय.' विद्या सध्या तिच्या आगामी 'शेरनी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 18 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

3. सेटवर परतण्याच्या तयारीत विकी कौशल, शेअर केला नवीन लूकचा फोटो
महाराष्ट्र सरकारने कोरोना नियम शिथिल करताच बॉलिवूड हळूहळू पुन्हा कामावर परतत आहे. अभिनेता विकी कौशलही लवकरच सेटवर परतणार आहे. मंगळवारी त्याने सोशल मीडियावर स्वत:चा एक सेल्फी शेअर केला. त्याचा हा फोटो सलूनमधील आहे. यात मास्क घातलेल्या विकी कौशलची नवीन हेअरस्टाईल दिसली. विकीने या फोटोसह मजेशीर कॅप्शन देताना लिहिले, "अरे केस नका कापू..." विकीच्या आगामी चित्रपटाविषयी सांगायचे म्हणजे त्याने शूजित सरकार दिग्दर्शित 'सरदार उधम सिंह'चे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय तो मेघना गुलजार दिग्दर्शित फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ’ यांच्या बायोपिकमध्येही दिसणार आहे.

4. ‘फास्ट अँड फ्युरियस 9’चा चीनमध्ये डंका
कोरोना महामारीमुळे चित्रपट निर्मात्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. अशा वातावरणात विन डिझेल याने ‘फास्ट अँड फ्यूरियस 9’ हा अॅक्शन चित्रपट प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात विन डिझेलने वाहनात बसून थक्क करणारी अॅक्शन दृश्ये दिली आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये 19 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चीनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. निर्मात्यांनी जवळपास दोनशे मिलियन डॉलर खर्च करून हा चित्रपट बनवला आहे, आतापर्यंत बाॅक्स ऑफिसवर 250 मिलियन डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालानुसार या चित्रपटाने चित्रपटगृहांत 255.76 मिलियन डॉलरची कमाई केली असून, यामध्ये चीनमधील कमाई 203 मिलियन इतकी आहे. अमेरिकेत 25 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. समीक्षकांनी या चित्रपटाचे फार कौतुक केलेले नाही.

5. प्रभास-कृती सेनन स्टारर ‘आदिपुरुष’ साठी संगीतरचना करणार सचेत-परंपरा
संगीतकार जाेडी सचेत अाणि परंपरा लाॅकडाऊनमध्ये दिलेल्या अनेक गाण्यांमुळे चांगलेच चर्चेत हाेते. आता हे दाेघेही ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला संगीत देत असल्याची बातमी आहे. ‘साहाे’ नंतर सुपरस्टार प्रभासची भूमिका असलेल्या चित्रपटासाठी संगीत देण्याची त्यांची ही दुसरी वेळ असेल. ‘आदिपुरुष’ हा पुढील वर्षी रिलीज हाेणाऱ्या सर्वात माेठ्या चित्रपटांपैकी एक मानला जाताे. प्रभात रामाच्या, कृति सेनन सीतेच्या आणि सैफ अली खान त्यात रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...