आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:पत्नीच्या आजारपणामुळे अनुपम खेर यांनी सोडला अमेरिकन टीव्ही शो, अभिषेक बच्चनचे आवाहन - स्वतःसाठी नाही तर किमान कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मास्क घाला

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

अभिनेते अनुपम खेर हे अमेरिकन टीव्ही चॅनेल एनबीसीवरील सीरिज ‘न्यू अ‍ॅमस्टरडॅम’ (New Amsterdam)मध्ये काम करत होते. पण आता त्यांनी या सीरिजमध्ये काम करणार नसल्याचे सांगितले आहे. या सीरिजमध्ये ते डॉक्टर विजय कपूरच्या भूमिकेत दिसत होते. न्यू अ‍ॅमस्टरडॅम या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अनुपम खेर यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत होते. 2018 पासून अनुपम खेर या सीरिजमध्ये काम करत आहेत. पण आता त्यांनी पत्नी किरण खेर यांच्या आजारपणामुळे सीरिजमध्ये काम करणार नसल्याचे सांगितले आहे. किरण खेर यांना काही दिवसांपूर्वीच ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. सध्या त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी अनुपम यांनी स्वत: सोशल मीडियावर पत्नी किरणला मल्टीपल मायलोमा नावाचा आजार असल्याचे सांगितले होते. हा रक्त कर्करोगाचा एक प्रकार आहे.

2. अभिषेक बच्चन यांचे आवाहन - आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी मास्क घाला

कोविड 19च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान अभिनेता अभिषेक बच्चनने आपल्या चाहत्यांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. अलीकडेच हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित द बिग बुल या चित्रपटात झळकलेल्या अभिषेकने सोशल मीडियावर स्वतःचा मास्क घातलेला फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "कृपया कृपया कृपया आपला मास्क घाला. स्वतःसाठी नसेल तर आपल्या कुटुंबासाठी, वडीलधा-यांसाठी, मित्रांसाठी आणि प्रियजनांसाठी तरी मास्क घाला," असे आवाहन अभिषेकने केले आहे. अभिषेक सध्या लखनौमध्ये असून येथे त्याच्या आगामी 'दसवी' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाचे एक शेड्युल आग्र्यात पूर्ण झाले आहे.

3. सलमान ‘टायगर ३’ च्या अंतिम शेड्यूलसाठी रशियाला जाणार
सलमान खानचा चित्रपट ‘टायगर 3’च्या चित्रीकरणाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जून व जुलैत रशियात होईल. तेथेच या चित्रपटाचे अखेरचे चित्रीकरण केले जाणार आहे. यासाठी सलमान याच महिन्यात रशियाला जाऊ शकतो. ‘टायगर 3’ ची निर्मिती भव्य रूपात होत असल्याचे निर्मात्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. या मालिकेतील मागील चित्रपटांच्यां निर्मात्यांनी देखील विदेशात चित्रीकरण केले होते. हा चित्रपट सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणेच 2022 मध्ये ईदला प्रदर्शित केला जाणार आहे. अजय देवगणचा ‘मे-डे’ आणि ज्युनियर एनटीआरच्या एका चित्रपटासोबत या चित्रपटाची टक्कर होऊ शकते.

4. 'दिल्ली क्राइम' या वेब सीरिजच्या तिसर्‍या सीझनवर काम सुरू
'दिल्ली क्राइम' या वेब सीरिजच्या दुस-या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. तर आता ताज्या रिपोर्टनुसार, या सीरिजच्या तिस-या सीझनवरदेखील काम सुरु झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक सुधांशु सरिया यांच्यावर 'दिल्ली क्राइम 3'च्या लिखाणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पहिला सीझनची कथा निर्भया गँगरेप आणि हत्येवर आधारित होती. तर आगामी दोन सीझनदेखील वास्तविक जीवनातील गुन्हेगारीवर आधारित असतील.

5. अर्जुन-रकुलच्या ‘दिल है दिवाना’चा टीझर प्रदर्शित

अर्जुन कपूर आणि रकुलप्रीत सिंह यांच्या ‘दिल है दीवाना’ या म्युझिक व्हिडिओचा टीझर गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला. हे गाणे 17 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या रोमँटिक गाण्याचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू यांनी केले आहे. त्याचे चित्रीकरण नुकतेच मुंबईत झाले. त्याला तनिष्क बागचीने संगीत दिले असून शब्बीर अहमद यांनी लिहिले आहे. ‘दिल है दीवाना’ या गाण्यामध्ये अर्जुन दोन भूमिकांमध्ये दिसत आहे. ‘द गूड अँड द बॅड’ अशी झलक पाहायला मिळते. हा टीझर सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांमध्ये गाण्याविषयी उत्सुकता पाहायला मिळते. अर्जुन कपूरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘दिल है दीवाना’ गाण्याचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने ‘एक प्रेम कहाणी जी मजामस्तीने भरली आहे. दिल है दीवाना गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 17 एप्रिल रोजी गाणे प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...