आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावरुण धवन पुढच्या वर्षी फेब्रुवारीपासून दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या 'इक्कीस’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहेत. यापूर्वी दोघांनी 'बदलापुर’मध्येही एकत्र काम केले होते. 'इक्कीस’ लेफ्टिनेंट अरुण खेत्रपालचा बायोपिक आहे. वरुण गेल्या दोन वर्षापासून या प्रोजेक्टवर तयारी करत होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटाचे काम पुढे ढकलत गेले आता याचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. चित्रपटासाठी वरुण लष्कराचे प्रशिक्षण घेत आहे. यातच तो राज मेहताच्या 'जुग जुग जियो’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. या व्यतिरिक्त त्याच्याकडे सध्या 'भेडिया’ आणि 'सांकी’सारखे चित्रपटदेखील आहेत.
विकीच्या 'मिस्टर लेले’च्या एका गाण्यात झळकणार रणबीर कपूर, पाहुण्या कलाकाराची भूमिका
अभिनेता विकी कौशल बऱ्याच दिवसांपासून 'मिस्टर लेले’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहेत. या चित्रपटाविषयी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बातम्यानुसार, रणबीर कपूर या चित्रपटातील एका गाण्यात दिसणार आहे. या गाण्याचे शूटिंग रणबीर बुधवारपासून मेहबूब स्टुडिअयोमध्ये सुरू करणार आहे. रणबीर काही दिवसांपासून या गाण्याचा सराव करत होता. हे एक सोलो ट्रॅक आहे, ते गणेश आचार्य कोरियोग्राफ करणार आहेत. तनिष्क बागची आणि रोचक कोहली याला संगीत देणार आहेत. 'मिस्टर लेले’चे पोस्ट प्रॉडक्शनचे काम आता संपले आहे. चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे. यात कियारा आडवाणी आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
'इंडियाज गॉट टॅलेंट’ची परीक्षक म्हणून शिल्पा शेट्टीची निवड, प्रोमो झाला रिलीज
प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'इंडियाज गॉट टॅलेंट’चे पुढचे सीझन लवकरच सुरू होणार आहे. नुकताच निर्मात्यांनी याचा प्रोमो रिलीज केला आहे. यात शिल्पा शेट्टीची परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. यातील इतर परीक्षक आणि सूत्रसंचालकाची माहिती येणाऱ्या दिवसात दिली जाणार आहे. लवकरच याचे ऑडिशन सुरू होणार आहे. यात यापूर्वी धर्मेंद्र, साजिद खान, फराह खान, करण जोहर आणि मलायका अरोरा सारख्या दिग्ग्जांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. 2009 मध्ये 'इंडियाज गॉट टॅलेंट’ सुरू झाले होते. हे नवे सीझन आहे.
हवामान सप्ताहामध्ये बोलणार भूमी पेडणेकर
अभिनेत्री आणि हवामान योद्धा भूमी पेडणेकर हिला न्यूयॉर्कमधील हवामान सप्ताहासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. क्लायमेट ग्रुपच्या भारताच्या कार्यकारी संचालिका दिव्या शर्मा यांनी सांगितले,
'क्लायमेट वीक’ एनवायसी-२०२१ मध्ये भूमीला आमंत्रित करण्यात आम्हाला आनंद होत आहे. हवामान सप्ताह हा जगभरातील हवामानाशी संबंधित घडमोडींना प्रभावित करणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. शिवाय, भूमी पर्यावरणाविषयी नेहमी बोलत असते. या वर्षाची थीम 'गेटिंग इट डन' आहे. त्या अनुषंगाने, इतर तरुणांवर प्रभाव पडावा म्हणून भूमीला बोलावण्यात आले आहे.
विद्या-प्रतीकचा स्टारर आगामी चित्रपटाचे नाव आहे 'लव्हर्स', लवकरच सुरु होणार चित्रीकरण
विद्या बालन आणि प्रतीक गांधी पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची ब-याच दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित शिरशा गुहा ठाकूरता करणार आहेत. आता दोघांच्या चित्रपटाचे शीर्षक जाहिर झाले आहे. या चित्रपटाचे नाव 'लव्हर्स' असे आहे. त्याचे चित्रीकरण मुंबई व्यतिरिक्त तामिळनाडूतील सुंदर हिल स्टेशन कुन्नूरमध्ये केले जाणार आहे. विद्या सध्या शेफाली शहासोबत दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तर प्रतीक त्याचा आगामी चित्रपट 'भवाई' रिलीज होण्याची प्रतिक्षा करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.