आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविपुल अमृतलाल शाह आणि झी स्टूडियोजचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सनक - होप अंडर सीज' हा चित्रपट लवकरच डिज्नी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सवर प्रदर्शित होणार आहे. यासह निर्मात्यांनी चित्रपटचे नवीन पोस्टरचे देखील अनावरण केले आहे, ज्यामध्ये विद्युत हातामध्ये बंदूक घेऊन मिशनसाठी सज्ज झाला आहे. विपुल शाह यांनी सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडसोबत अनेक उत्तम सिनेमांसोबत दर्शकांचे मनोरंजन केले आहे. या वेळी झी स्टूडियोजच्या सहयोगाने, त्यांचे प्रोडक्शन 'सनक - होप अंडर सीज' या धमाकेदार एक्शनपटासोबत सज्ज झाले आहेत. विद्युत चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून आपल्या करिअरमध्ये यशस्वी निर्माता विपुल शाह यांच्यासोबत हा 5 वा चित्रपट आहे. विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये डेब्यु करणारी बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा स्टारर 'सनक - होप अंडर सीज' झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत आहे. हा विपुल अमृतलाल शाह प्रोडक्शनचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात येणार आहे.
‘न्यूट ब्लँच’वर आधारित असेल शाहिद कपूरचा आगामी चित्रपट
शाहिद कपूर सध्या ‘जर्सी’, ‘कर्ण’ आणि ‘राज और डीके’च्या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. याव्यतिरिक्त त्याच्या खात्यात अली अब्बास जफरचा एक चित्रपट आहे. हा चित्रपट एक फ्रेंच चित्रपट 'न्यूट ब्लँच’वर आधारित असेल. अलीने या रहस्यमय चित्रपटाचे अधिकार मिळवले आहेत. हा चित्रपट एका पोलिसाच्या जीवनावर आधारित आहे. त्याचा अंडरवर्ल्डसोबत संबंध असतो, तो जेव्हा एका शक्तिशाली ड्रग लॉडकडून ड्रग्जची चोरी करतो तेव्हा त्याचे सत्य समोर येते. यामुळे त्याच्या मुलाचा जीव धोक्यात असतो. यात तो आपल्या मुलाचा जीव कसा वाचवतो यावर ती कथा आधारित आहे. शाहिद यात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय प्रेक्षकांना पाहून निर्माते त्याला थोडा बदल करत आहेत. यात शाहिदसोबत भूमी पेडणेकर दिसणार आहे.
बर्मिंघममध्ये गायक दीपसोबत गाण्याचे शूटिंग करणार जॅकलिन
जॅकलिन फर्नांडिस नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूत पोलिस’ चित्रपटात दिसली. आता ती एका संगीत व्हिडिओसाठी गायक दीप मनीसोबत दिसणार असल्याची बातमी आहे. लवकरच या म्युझिक व्हिडिओचे चित्रीकरण बर्मिंघममध्ये सुरू होणार आहे. लॉकडाऊनच्या काळापासून गायक दीप या प्रकल्पावर काम करत आहे. त्याने म्युझिक व्हिडिओसाठी अनेक अभिनेत्रींना संपर्क केला होता, अशी चर्चा आहे. शेवटी त्याने जॅकलिनची निवड केली. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जॅकलिनकडे तिच्या खात्यात ‘अटॅक’, ‘सर्कस’सारखे चित्रपट आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.