आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief:Sonu Sood Is Very Sad After 25 Year Old He Was Trying To Save, Dies Of Covid 19, Shreya Ghoshal Names Her Newborn Son Devyaan

बॉलिवूड ब्रीफ:सोनू सूदच्या अथक प्रयत्नानंतरही वाचू शकले नाहीत 25 वर्षीय युवकाचे प्राण, सोनूने व्यक्त केले दुःख; श्रेया घोषालने बाळाचे नाव ठेवले देवयान

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

अभिनेता सोनू सूदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कोरोनामुळे 25 वर्षीय युवकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या मुलाला वाचविण्यासाठी सोनू सूद आणि त्याची टीम प्रयत्न करीत होती. पण, त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. सोनू सूदने पोस्ट शेअर करत लिहिले की, "आम्ही एका 25 वर्षाच्या युवकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आज तो कोरोनासोबतची झुंज हरला. त्याची जगण्याची शक्यता खूपच कमी आहे हे माहित असूनही मी रोज डॉक्टरांसोबत आशेने बोलत होतो. याबद्दल त्याच्या पालकांना सांगण्याची हिम्मत देखील करू शकत नाही. कोणास असे माहित होते की असे काहीतरी घडेल," असे सोनू म्हणाला.

2. श्रेया घोषालने बाळाचे नाव ठेवले देवयान, शेअर केला पहिला फोटो
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने 22 मे रोजी मुलाला जन्म दिला. आता तिने तिचा नवरा आणि लाडक्या चिमुकल्यासोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. श्रेयाने आणि तिच्या नवरा शिलादित्य मुखोपाध्यायने त्यांच्या मुलाचे नाव 'देवयान' असे ठेवल्याची पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये श्रेयाच्या हातामध्ये त्यांचा लाडका लेक दिसत आहे. आपल्या लाडक्या लेकाकडे श्रेया आणि तिचा नवरा शिलादित्य खूप प्रेमाने बघत आहेत. हा फोटो शेअर करत श्रेयाने लिहिले आहे, 'हा आहे आमचा लाडका देवयान मुखोपाध्याय... 22 मे रोजी तो आमच्या आयुष्यात आला आणि त्याने आमचे आयुष्यात बदलून टाकले आहे. त्याचा हा पहिला फोटो... जेव्हा देवयान आमच्या आयुष्यात आला तेव्हापासून आमचे हृदय त्याने प्रेमाने भरून टाकले आहे. आपल्या बाळाबद्दलचे प्रेम हे एका आईलाच जाणवू शकते...'

3. जॅकलीन फर्नांडिस म्हणाली - मी बहरीनमध्ये त्यांच्यासोबत राहावे अशी आई-वडिलांची इच्छा आहे
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस भारतात महामारीत आपल्या प्राेजेक्ट्सवर काम करण्यात व्यग्र आहे. ती ३५ वर्षांची आहे. श्रीलंकेची राहणारी आहे. तिचे आई-वडील बहरीनमध्ये राहतात. जॅकलीनने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले, आई-वडिलांनी तिची काळजी वाटत असते, त्यामुळे तिने बहरीनमध्ये सोबत येऊन राहावे असे त्यांना वाटते. जॅकलीनने सांगितले, श्रीलंकेत माझे मित्र आणि आईवडील, बहरीनमध्ये राहतात. मात्र जेव्हा बातम्यांमध्ये ते भारताची स्थिती पाहतात तेव्हा घाबरतात. मी बहरीनमध्ये राहवे अशी माझ्या पालकांची इच्छा आहे. एवढेच नव्हे तर माझे नातेवाईकदेखील मला त्यांच्यासोबत राहण्याचे सांगत आहेत. मात्र मला येथे राहूनच माझे काम करावे वाटत आहे. जॅकलीन सध्या हॉरर कॉमेडी सिनेमा ‘भूत पुलिस’सह इतर चित्रपटाचेही शूटिंग करत आहे.

4. आर्मी ऑफ द डेड’मधील भूमिकेविषयी अभिनेत्री हुमा कुरेशीचा खुलासा
हुमा कुरेशीने नुकतेच ‘आर्मी ऑफ द डेड’मधून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या प्रत्येक टीजरमध्ये तिची झलक दिसली होती. त्यामुळे चित्रपटात तिची चांगली भूमिका असल्याचा अंदाज लावल्या जात होता. मात्र चित्रपटात तिची लहान भूमिका पाहून तिचे चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळे हुमा चित्रपटात काय करत आहे, असा प्रश्न विचारला आहे. याचा हुमाने खुलासा केला आहे. तिने बॉलिवूड चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपुर’विषयी सांगितले, यात तिला फक्त 15 मिनिटाचे काम मिळाले होते. अशा प्रकारेच दिग्दर्शक जॅक स्नायडर हॉलीवूडचे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत आणि ‘आर्मी ऑफ द डेड’मध्ये काम केल्याने ते खुश आहेत.

5. सलीम-जावेदच्या माहितीपटाचे दिग्दर्शन करणार नाही झोया, दिग्दशर्काचा शोध सुरु
फरहान अख्तर आणि त्यांचे पार्टनर रितेश सिधवानी रायटर जोडी सलीम-जावेद यांच्या जीवनावर माहितीपट बनवणार आहेत. या माहितीपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर करणार असल्याचे आधी चर्चा होती . मात्र आता ही बातमी चुकीची असल्याचे बोलले जात आहे. अजून दिग्दर्शकाचे नाव निश्चित झालेले नाही. या माहितीपटामध्ये सलीम जावेद यांच्यासोबतच अमिताभ बच्चन यांचीही मुलाखत घेतली जाणार आहे.

6. नोरा फतेहीसाेबत आयटम साँग करण्याची इच्छा : हिमांश कोहली
‘यारियां’ आणि ‘रांची डायरीज’ सारख्या चित्रपटात झळकलेल्या अभिनेता हिमांश कोहलीला नोरा फतेहीसोबत एक डान्स नंबर करायची इच्छा आहे. एका मुलाखतीत हिमांश म्हणाला, जेव्हा कधी मला डान्स आयटम करण्याची वेळ येईल तेव्हा मी नोरा फतेही सोबत डान्स करेल. कारण ती खरंच खूप चांगली डान्सर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. हिमांश नुकताच एका म्युझिक व्हिडिओ ‘वफा न रास आई’ मध्ये झळकला आहे. हिमांश साेबत या व्हिडिओमध्ये आरुषी निशंक होती.

बातम्या आणखी आहेत...