आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना वॉरियर्सना सलाम:लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी पोलिसांविषयी व्यक्त करत आहेत कृतज्ञता, पोस्टमध्ये म्हटले - थँक्यू व्हेरी मच 

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कतरिना कैफसह अनेक स्टार्सनी पोलिस आणि कठीण परिस्थितीत कार्यरत असलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.

देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे काही लोक घरात आहेत तर काही कुटूंबियांपासून दूर आपले कर्तव्य बजावत आहेत. अशाच काही योद्ध्यांना सलाम करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. कतरिना कैफसह अनेक स्टार्स मुंबई पोलिस आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करण्यात व्यस्त असलेल्या सर्व लोकांचे आभार मानत आहेत.

अलीकडेच कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मुंबई पोलिसांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टसह कतरिनाने लिहिले, 'धन्यवाद मुंबई पोलिस. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या समर्पण आणि प्रोत्साहनास सलाम. आम्ही घरात सुरक्षेसह विश्रांती घेत असताना ते कठोर परिश्रम घेत आहेत. मनापासून धन्यवाद. '

मलायका अरोरानेही पोलिसांचे आभार मानत भावनिक नोट लिहिली आहे. एक छायाचित्र शेअर करताना तिने इंस्टाग्रामवर लिहिले की, “आज परिस्थिती गंभीर आहे आणि आम्ही सर्व घाबरलो आहोत. पण असे काही लोक आहेत जे भीती विसरून, आपले सर्वकाही, अगदी स्वतःचा जीव  धोक्यात घालून आपले संरक्षण करण्यासाठी उभे आहेत. आपण आमचे नायक आहात आणि आम्ही मनापासून धन्यवाद देतो.''

सिद्धार्थ मल्होत्राने मुंबई पोलिसांनी शेअर केलेला व्हिडिओ पुन्हा पोस्ट करत त्यांचे आभार मानले आहेत. सिद्धार्थने ट्विटरवर लिहिले आहे की, "मुंबई पोलिस आपले कुटुंब व घर सोडून आपल्या सुरक्षिततेसाठी जीव पणाला लावत आहेत. त्यांचे आभार मानण्याची वेळ आता आली आहे. तुम्ही लोक खरे नायक आहात.''

जाह्नवी कपूरनेही मुंबई पोलिसांना थँक्यू म्हटले आहे. तिने तिच्या इंस्टास्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे, 'स्वतःपुर्वी आमच्याबद्दल विचार केल्याबद्दल आणि देश आणि लोकांचे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद.'

जाह्नवी कपूरने इंस्टा स्टोरीवर लिहिले धन्यवाद.
जाह्नवी कपूरने इंस्टा स्टोरीवर लिहिले धन्यवाद.

अभिनेता अर्जुन कपूरनेही पोलिसाच्या स्केचचे छायाचित्र शेअर केले आहे. यासह त्याने मुंबई पोलिसांना त्यांच्या धाडसासाठी सलाम म्हटले आहे.

अर्जुन कपूरची इंस्टाग्राम स्टोरी
अर्जुन कपूरची इंस्टाग्राम स्टोरी
बातम्या आणखी आहेत...