आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'राजनिती'सह अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री श्रुती सेठ गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. अलीकडेच तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. श्रुतीने इन्स्टाग्राम स्वत:चा रुग्णालयातील फोटो आणि भलीमोठी पोस्ट लिहित चाहत्यांना याविषयीची माहिती दिली. अचानक तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी सर्जरी करण्याचा सल्ला दिला आणि सर्जरीनंतर तिची तब्येत ठीक असल्याचे तिने पोस्टमध्ये लिहिले. त्यासोबतच आरोग्याला कधीच गृहीत धरू नका, असे तिने चाहत्यांना सांगितले आहे.
श्रुतीने एक पोस्ट शेअर करत म्हटले, ‘इमर्जन्सी सर्जरीमुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना 2020 ने चांगलाच धक्का दिला आहे. माझे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सर्व प्लॅन्स मला रद्द करावे लागले.
मला जो धडा घ्यायचा होता तो कदाचित मी घेतला नव्हता. म्हणूनच मला आता त्याची शिक्षा मिळतेय. तुम्ही तुमच्या आरोग्याला कधीच गृहीत धरू नका. रोज सकाळी तुम्हाला डोळे उघडून जग
बघण्याची संधी मिळतेय आणि रोज रात्री तुम्ही शांत झोपू शकता यासाठी कृतज्ञ राहा’, असे तिने म्हटले आहे. बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी गंभीर आजाराशी लढा दिला आहे.
कोण आहेत हे सेलिब्रिटी जाणून घेऊयात..
मुमताज यांना झाला होता कर्करोग
अभिनेत्री मुमताज यांना 2002 साली ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्यावेळी त्यांचे वय 54 वर्षे होते. याकाळात त्यांना 6 वेळा किमोथेरपी आणि 35 वेळा रेडियेशन्सच्या प्रक्रियेतून जावे लागले होते.
त्यावेळी मुमताज म्हणाला होत्या, ''मी शेवटच्या श्वासापर्यंत हार मानणार नाही.''
मुमताज यांच्या व्यतिरिक्त सोनाली बेंद्र, लीजा रे, मनीषा कोइराला या अभिनेत्रींनीही कर्करोगाशी लढा दिला आणि त्यावर यशस्वी मात केली.
ट्राईजेमिनल न्यूराल्जियाने त्रस्त होता सलमान खान
सलमान खान ट्राईजेमिनल न्यूराल्जिया (Trigeminal Neuralgia) नावाच्या आजाराने पीडित होता. यासाठी त्याने दीर्घकाळ उपचार घेतले. या उपचारासाठी तो नेहमी अमेरिकेला जात असतो. हा
एक न्यूरोपॅथिक डिसऑर्डर आहे. या आजारात रुग्णाच्या चेह-यावरील काही भागांत (डोक आणि जबडा) खूप दुखतं. सलमान सात ते आठ वर्षे या आजाराने पीडित होता.
सोनम कपूर
बॉलिवूडमध्ये फॅशन आयकॉन नावाने ओळखल्या जाणा-या अभिनेत्री सोनम कपूरला कमी वयातच मधुमेह झाला होता. दररोज इन्सुलिनचा डोज घेऊन खास डाएटने तिने या आजारावर मात केली. या
आजारामुळे तिचे वजन 85 किलोपेक्षा जास्त झाले होते. आता या आजारापासून सोनमची सुटका झाली आहे. तसेच तिचे वजनही कमी झाले आहे.
अमिताभ बच्चन
77 वर्षीय अमिताभ बच्चन गेल्या 37 वर्षांपासून यकृताशी संबंधित समस्यांना तोंड देत आहेत. 1982 मध्ये ‘कुली’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले होते. त्यावेळी त्यांच्या यकृताला
गंभीर दुखापत झाली होती. या कारणामुळेच अनेकदा त्यांना पोटदुखीचा त्रास होत असतो. याच काळात त्यांना हेपेटाइटिस बी झाला होता.
एका मुलाखतीत अमिताभ यांनी सांगितले होते की, त्यांचे 75 टक्के यकृत निकामी झाले असून फक्त 25 टक्के भाग कार्यरत आहे. या 25 टक्क्याच्या आधारावर माझे आयुष्य सुरु आहे. त्यामुळे हेपेटायटीस बी लस घेणे अतिशय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हेपेटायटीस बी असल्याचे आपल्याला 2000 साली समजल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते.
'कुली' चित्रपटाच्या वेळी झालेल्या अपघाताच्या वेळी सुमारे 200 जणांनी त्यांना एकूण 60 बॉटल रक्तदान केले होते. पण त्यातील एक व्यक्ती हेपेटायटीस बीने ग्रस्त होता. त्यामुळे तो आजार बिग बींच्या वाटेला आला आहे.
धर्मेंद्र यांना जडले होते व्यसन
बॉलिवूडचे हीमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते धर्मेंद्र तब्बल 15 वर्षे डिप्रेशनमध्ये होते. याकाळात त्यांना दारुचे व्यसन जडले होते. धर्मेंद्र अल्कोहोलिक असल्याचे सर्वांना ठाऊक आहे. एकेकाळी ते स्मोकिंगसुद्धा करायचे. मात्र आता त्यांनी स्मोकिंगची सवय सोडली आहे.
मिथुन यांना पाठदुखीचा त्रास
मिथुन चक्रवर्ती यांना पाठदुखीची तीव्र समस्या आहे. गेल्या वर्षी त्रास वाढल्याने त्यांना उपचारासाठी अमेरिकेत नेण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांना थोडा
आराम मिळाला, परंतु त्रास मुळापासून संपलेला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.