आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Bollywood Celebs Also Congratulated Prime Minister Narendra Modi On His Birthday, Kangana Said We Are Very Lucky To Have A Prime Minister Like You

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

70 वर्षांचे झाले नरेंद्र मोदी:शिल्पा शेट्टी, अनिल कपूरसह अनेक सेलिब्रिटींनी पंतप्रधानांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, कंगना म्हणाली- आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखे पंतप्रधान लाभले

मुंबई4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षात पदार्पण केले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर बॉलिवूड सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. लता मंगेशकर, अनुपम खेर, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, कंगना रनोट, सुभाष घई, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगनाने आपल्या शुभेच्छा देताना म्हटले की, आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखे पंतप्रधान मिळाले. तर अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर करुन लिहिले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुम्हाला एक दीर्घ आणि निरोगी आयुष्य देवो, हीच देवाकडे माझी प्रार्थना आहे. जय हिंद.' तर अभिनेता वरुण धवनने लिहिले की, तरुणांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

 • शिल्पा शेट्टी लिहिली - तुम्हाला माझा साष्टांग दंडवत

पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना शिल्पाने लिहिले की, 'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 70 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास अधिक सामर्थ्य, खूप आनंद, सकारात्मकता आणि सर्वात महत्त्वाचे चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा. आपणाला आणखी शक्ती मिळो. तुम्हाला माझा साष्टांग दंडवत.'

 • अनिल कपूर म्हणाले- तुम्ही जे काही करता ते देशहितासाठी असते

अनिल कपूर यांनी लिहिले की, 'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जे काही करता ते देशाचे हित आणि त्यातील लोकांच्या हितासाठी करतात. आता आणि कायम आपल्या सेवेबद्दल मोदीजी तुमचे आभार.'

 • कंगना म्हणाली - तुम्हाला अन्यायकारक वागणूक दिली जाते

पंतप्रधान मोदींसाठी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली, "माननीय पंतप्रधानजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपली नीट कधी भेट झाली नाही. तुमच्याशी बोलण्याची मला कधी संधी मिळाली नाही. पण मी तुम्हाला सांगते की, हा देश तुम्हाला खूप मानतो. इथे खूप आवाज आहे, गोंधळ आहे. तुमच्या बद्दल जे काही बोलले जाते ते कदाचितच कोणाबद्दल बोलले जात असेल आणि इतका अपमान केला जात असेल. कदाचितच कोणत्या इतर पंतप्रधानांप्रती असे अभद्र आणि चुकीचे शब्द वापरले जात असतील. मग तुम्हाला माहित आहे की, हे खूप कमी लोक आहेत. हा फक्त प्रोपोगंडा आहे. एका सर्वसामान्य भारतीयाला जे तुमच्यासाठी वाटतं, हे जेव्हा मी पाहते तेव्हा मला असे वाटतं की, इतका सन्मान, इतकी भक्ती यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांना मिळाली नसावी. करोडो भारतीय तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. आम्ही खूपच भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखे पंतप्रधान लाभले. जय हिंद.'

 • अनुपम खेर यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे
 • दीर्घायुष्यासाठी लता मंगेशकर यांनी दिल्या शुभेच्छा
 • मोहनलाल यांनीही अभिनंदन केले

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनीही ट्विट करून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, 'आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील कित्येक वर्षांसाठी तुम्हाला आनंद आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.'

 • सुभाष घई यांनी मोदी यांचे दृष्टी आणि ध्येय असलेले नेते म्हणून वर्णन केले.
 • रितेश देशमुखनेही ट्विट करुन मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
 • अभिषेक बच्चनने दिल्या शुभेच्छा.
 • चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनीही ट्विट केले आहे.
 • सुनील शेट्टी यांनीही शुभेच्छा दिल्या.
 • वरुण धवन म्हणाला - आपल्याकडून तरुणांना मोठ्या अपेक्षा आहेत
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser