आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जगदीप यांना श्रद्धांजली:जगदीप यांच्या निधनाने बॉलिवूड शोकाकूल, अनुपम खेर म्हणाले  - 'अजून एक चमकता तारा जमिनीवरुन आकाशात गेला'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगदीप यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
Advertisement
Advertisement

सुरमा भोपाली, म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. 8 जुलै रोजी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते.  सुरमा भोपाली यांच्या निधनाची बातमी येताच त्यांच्या चाहत्यांसह बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.  जगदीप यांच्यावर 9 जुलै रोजी मुस्तफा बाजार मझगाव सिया कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार केले जातील. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेते अनुपम खेर, अजय देवगण आयुष्मान खुराना, अनुभव सिन्हा, रणदीप हुड्डा, रितेश देशमुख, रणवीर सिंग, जॉनी लिव्हर, अली असगर, मनोज बाजपेयी यांसह अनेक कलाकारांनी त्यांना शब्दरुपी आदरांजली वाहिली आहे.  

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुरमा भोपाली यांना श्रद्धांजली वाहिली. शिवराज सिंह यांनी लिहिले-

  • शेवटचा चित्रपट 2012 मध्ये आला होता

70 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत जगदीप यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा पहिला चित्रपट 1951 मध्ये रिलीज झालेला अफसाना हा होता. या चित्रपटात ते बालकलाकाराच्या रुपात झळकले होते. 2012 मध्ये आलेला 'गली गली में चोर है' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. यात त्यांनी पोलिस हवालदाराची भूमिका वठवली होती.

  • बॉलिवूड कलाकारांनी जगदीप साहेबांना वाहिली श्रद्धांजली

अभिनेते अनुपम खेर यांनी दुःख व्यक्त करताना लिहिले, “अजून एक चमकता तारा जमिनीवरुन आकाशात गेला. जगदीप साहेब हे कलाविश्वातील उत्तम कलाकार होते. एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांना काही तोड नव्हती. खूप वर्षांपूर्वी एका पार्टीत त्यांनी मला सांगितलं होतं बरखुरदार हँसना आसान है, हँसाना बहुत मुश्किल..तुमची उणीव कायम भासेल.”  

Advertisement
0