आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलविदा सरोज खान:बॉलिवूडची लाडकी नृत्यदिग्दर्शिका सुपुर्द-ए-खाक, सकाळी 7 वाजता मलाडच्या कब्रस्तानमध्ये झाले अंत्यसंस्कार

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • सरोज खान मधुमेह आणि याच्यासंबंधित आजारांशीही झुंज देत होत्या.

बॉलिवूडमध्ये डान्सिंग क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. 17 जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना वांद्रे येथील गुरू नानन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. 

त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आले होते. त्यांची धाकटी मुलगी सुकन्याने सांगितल्यानुसार, लॉकडाऊनच्या नियमांना बघता अम्मीवर सकाळी सात वाजता मलाडस्थित कब्रस्थानमध्ये अंत्यविधी करण्यात आले. कुटुंबीयांनी ठरवल्यानुसार, त्यांच्या आठवणीत तीन दिवस प्रार्थना सभा केली जाणार आहे. सरोज यांच्या पश्च्यात त्यांच्या कुटुंबात मुलगा हामिद खआन, हिना आणि सुकन्या या दोन मुली आहेत. 

  • 24 जून रोजी रुग्णालयात करण्यात आले होते दाखल

24 जूनपासून सरोज यांची प्रकृती ठिक नव्हती. काही दिवसांपूर्वी त्यांना श्नसनाचा त्रास होत असल्यामुळे वांद्र्यातील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याव्यतिरिक्त त्यांना मधुमेह आणि याच्यासंबंधित आजारांशीही झुंज देत होत्या. दरम्यान, त्यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. परंतु चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

  • दोन हजारांहून अधिक गाणी केली कोरिओग्राफ 

40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांसाठी, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी कोरिओग्राफ केली होती. हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केली होती. ‘देवदास’ चित्रपटातील ‘डोला रे डोला’, तामिळ सिनेमा ‘श्रीनगरम’मधली सगळी गाणी, आणि ‘जब वी मेट’मधील ‘ये इश्क हाय’ या गाण्यांच्या नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना तीन वेळा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला. गुरु, खलनायक, बेटा, सैलाब, हम दिल दे चुके सनम, देवदास या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर मिळाले होते. त्यांनी नाच बलिये, झलक दिखला जा अशा अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहिले होते.

  • सरोज यांचे खरे नाव निर्मला होते 

22 नोव्हेंबर 1948 रोजी किशनचंद सद्धू सिंह आणि नोनी ​सद्धू सिंह यांच्या घरी जन्मलेल्या सरोज यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधु सिंह नागपाल आहे. फाळणीनंतर सरोज यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात स्थायिक झाले होते. वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी बालकलाकार म्हणून  'नजराना' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 

  • साधनापासून ते करीनापर्यंत या अभिनेत्रींना दिले नृत्याचे धडे 

साधना, वैजयंतीमाला, कुमकुम, हेलन, शर्मिला टागोर, माला सिन्हा, वहीदा रहमान, झीनत अमानपासून ते रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि सनी लिओनी या अभिनेत्रींना सरोज खान यांनी नृत्याचे धडे दिले. सरोज यांना 'मिस्टर इंडिया' या सिनेमातील श्रीदेवीवर चित्रीत झालेले गाणे हवा-हवाईमुळे यश मिळाले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.   माधुरी दीक्षित ही त्यांची आवडती अभिनेत्री होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबतही त्यांनी काम केले होते.  

  • अखेरचा चित्रपट माधुरी दीक्षितसोबतच 

सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलेले शेवटचे गाणे करण जोहरच्या कलंक चित्रपटातील आहे. या मल्टिस्टारर चित्रपटातील  ‘तबाह हो गये’ हे गाणे त्यांनी कोरिओग्राफ केले होते. या गाण्यात त्यांचा आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित थिरकली होती.  

बातम्या आणखी आहेत...