आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:शोले चित्रपटात 'सूरमा भोपाली'ची भूमिका साकारणार्‍या विनोदी अभिनेता जगदीप यांचे मुंबईत निधन, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगदीप हे अभिनेता नावेद आणि जावेद जाफरी यांचे वडील होते

प्रसिद्ध विनोदी अभिनेते जगदीप म्हणजेच सय्यद इश्तियाक अहमद जाफरी (81) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला. त्यांनी बी. आर. चोप्रा यांच्या ‘अफसाना’ या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यांनी 300 पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. जावेद जाफरी व नावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. ते दोघे नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत.

'सूरमा भोपाली' हे त्यांचे गाजलेले पात्र 

जगदीप यांनी आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. ‘शोले’ चित्रपटातील सुरमाँ भोपाली ही त्यांची भूमिका फार गाजली. गुरुवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील मुस्तफा बाजार माझगाव शिया कब्रस्तानात त्यांचा सुपुर्द-ए-खाक केला जाणार आहे. 

जावेदचा ट्वीट व्हिडिओ व्हायरल होत आहे

जगदीप यांच्या मृत्यूनंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत त्यांनी आपला सूरमा भोपालीचा डायलॉग म्हटला आहे. हा व्हिडिओ 29 मार्च 2018 चा आहे. हा व्हिडिओ मुलगा जावेद जाफरीने ट्वीट केला होता. या व्हिडिओत ते म्हणाले होते की, हसत-हसत या आणि हसत-हसत जा.

2020 मध्ये अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला

2020 मध्ये जगदीप यांच्या अगोदर अनेक बॉलिवूड कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. यामध्ये इरफान खान, ऋषी कपूर, दिग्ददर्शक बासु चॅटर्जी, संगीतकार वाजिद खान आणि कोरिओग्राफर सरोज खान यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. तर अभिनेता सुशांत सिंह राजपूतने देखील मागील महिन्यात आत्महत्या केली होती. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser