आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन:आघाडीच्या अभिनेत्रींनंतर एनसीबी रडारवर आता चार अभिनेते, टॅलेंट मॅनेजर जया साहाने चौकशीदरम्यान उघड केली नावे

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिपोर्ट्सनुसार, आज चारही अभिनेत्यांच्या नावांचा खुलासा होऊ शकतो.
  • चार अभिनेत्यांपैकी एक आघाडीचा अभिनेता, आठवडाभरात एनसीबी समन्स पाठवू शकते

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात आता 4 अभिनेते एनसीबीच्या रडारवर आहेत. वृत्तानुसार, टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानची पार्टनर जया साहाने बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या चौकशीत या कलाकारांची नावे उघड केली आहेत.

  • आज होऊ शकतो नावांचा खुलासा

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, जया साहाची बुधवारी सुमारे चार तास चौकशी केली गेली. यावेळी, तिने ज्या चार अभिनेत्यांची नावे घेतली, त्यापैकी एक आघाडीचा अभिनेता आहे. आज त्यांच्या नावाचा खुलासा होण्याची शक्यता आहे. एनसीबी आठवडाभरात या कलाकारांना समन्स पाठवू शकते.

  • अनेक अभिनेत्रींची नावे आली आहेत समोर

या प्रकरणात आतापर्यंत अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, दीया मिर्झा, नम्रता शिरोडकर, फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा आणि निर्माता मधु मांटेना यांची नावे समोर आली आहेत.

बुधवारी एनसीबीने मधु मांटेनाची चौकशी केली. या दरम्यान ड्रग्ज चॅटवरुन जया साहा आणि मधु मांटेना यांना समोरासमोर आणण्यात आले होते.

  • अभिनेत्रींना पाठवले आहे समन्स

एनसीबीने बुधवारी दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावले. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात शूटिंग करणार्‍या दीपिकाला 25 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान 26 सप्टेंबरला हजर होणार आहेत.

रकुल प्रीत सिंगला 24 सप्टेंबर रोजी हजर व्हायचे होते. पण तिने समन्स मिळाला नसल्याचा बहाणा पुढे करुन चौकशीसाठी हजर होण्याचे टाळले आहे. एनसीबीने पुन्हा तिला समन्स बजावले असून उद्या तिला हजर राहावे लागणार आहे. एनसीबीच्या टीमने श्रद्धा आणि सारा अली खान यांना त्यांच्या घरी जाऊन समन्स दिले.

  • सुशांतच्या मित्राचा दावा - जया फक्त एजंट आहे

रिपब्लिक इंडियाशी झालेल्या बातचीतमध्ये सुशांतचा मित्र युवराज म्हणाला की, क्वान ही एक मोठी एजन्सी आहे. याचा अर्थ असा की, या प्रकरणात (ड्रग्ज) बरेच ए-लिस्टर सामील आहेत. तो म्हणाला, "सर्व स्टार्स कोकीन आणि ड्रग्ज घेतात, हे मी ऐकून होतो. मात्र आता हे स्पष्ट झाले आहे."

युवराज पुढे म्हणाला, "जया साहा फक्त एजंट आहे. सुपरस्टार्स तिला जे सांगतात ते ती करते. एक टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीला ड्रग्ज सप्लायमध्ये सक्रिय असायला हवे? ते ड्रग्ज विक्रेते आहेत का? कदाचित ते त्यातून पैसे कमवत असावेत," असे प्रश्न युवराजने उपस्थित केले आहेत.

युवराजने दावा केला आहे की, चौकशीत 15-20 टॉप कलाकारांची नावे समोर येऊ शकतात. त्याच्या म्हणण्यानुसार, दीपिकाच्या जीवनातील सर्वात खास व्यक्तीदेखील यात सामील आहे.

बातम्या आणखी आहेत...