आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:NCB ने कोर्टात आरोपपत्र दाखल केले, सुशांतची बहीण श्वेता म्हणाली - 'अंधारानंतर प्रकाश नक्कीच असतो'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीने केली होती 33 जणांना अटक

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता जवळपास 9 महिने झाले आहेत. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शुक्रवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यावर सुशांतची बहीण श्वेता सिंग हिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. श्वेता सिंहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, "अंधारानंतर प्रकाश नक्कीच असतो."

या पोस्टमध्ये श्वेता सिंहने एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक माणूस बोगद्यात अंधारातून प्रकाशाकडे जाताना दिसत आहे. सुशांतच्या निधनानंतरपासूनच त्याची बहीण श्वेता सोशल मीडियावर सतत एक मोहीम राबवत आहे आणि आपल्या भावाला न्याय मिळावा अशी मागणी करत आहे. यासह, ती आपल्या भावाशी संबंधित गोष्टी देखील शेअर करत असते.

एनसीबीने 33 लोकांविरोधात आरोपपत्र दाखल केले
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज अँगलचा तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शुक्रवारी 11,700 पानी आराेपपत्र एनडीपीएस काेर्टात दाखल केले. त्यात सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शाैविक चक्रवर्ती, ड्रग पेडलर करमजीत, आजम, अनुज केसवानी, डुऐन फर्नांडिस आणि अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडसह 33 जणांची नावे आहेत. 5 आरोपींना फरार दाखवले आहे. आराेपपत्रात रिया चक्रवर्तीवर ड्रग्जची खरेदी आणि पैसे पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिया आणि शौविक यांच्यावर NDPS अॅक्ट सेक्शन 27A आणि 29 अंतर्गत चार्ज लावण्यात आले आहेत.

जप्त केलेले ड्रग्ज, गोळा केलेले सर्व पुरावे व आतापर्यंतच्या तपासाशी निगडित दस्तऐवजांचा आराेपपत्रात समावेश आहे. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. आराेपपत्रात ड्रग्ज खरेदी आणि आर्थिक व्यवहारात रियाची प्रमुख भूमिका असल्याचे म्हटले आहे. त्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचेही जबाब समाविष्ट आहेत. आराेपपत्रात 50 हजार पानी डिजिटल साक्षी जोडल्या आहेत. त्यात आराेपींतील व्हॉट्सअॅप चॅट, फाेन काॅल डेटा रेकाॅर्ड आणि बँक दस्तऐवजासह इतर पुराव्यांचा समावेश आहे. तसेच 200 साक्षीदारांचे जबाबही आहेत. एनसीबी पूरक आराेपपत्रही दाखल करण्याची शक्यता आहे.

एनसीबीने केली होती 33 जणांना अटक
प्रदीर्घ चौकशीनंतर एनसीबीने रिया चक्रवर्ती, शाैविक, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांच्यासह अनेक ड्रग्ज पेडलर्सना अटक केली होती. अभिनेत्री दीपिका पदुकाेण, सारा अली खान, श्रद्धा कपूरसह अनेकांची चौकशीही करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...