आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Drug Case NCB Investigation Update | Shraddha Kapoor, Deepika Padukon, Sara Ali Khan And Rakul Preet Singh Summoned By NCB In Drug Probe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्स प्रकरण:रणवीर सिंहसोबत दीपिका पदुकोण मुंबईत दाखल, 'या' दिवशी एनसीबीकडून होणार चौकशी

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौकशीदरम्यान रणवीर सिंहने सोबत राहण्याची विनंती केली

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स अँगलने तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंहला चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. यांची 25 आणि 26 सप्टेंबरला चौकशी केली जाईल.

दरम्यान, दीपिका पदुकोण गुरुवारी गोवावरुन मुंबईत दाखल झाली. तिच्यासोबत पती रणवीर सिंहदेखील होता. एनसीबी दीपिकाची शनिवारी चौकशी करणार आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, रणवीर सिंहने दीपिकाच्या चौकशीदरम्यान तिच्या सोबत राहण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

रणवीर म्हणाला की तो कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. तपासणीच्या वेळी तो उपस्थित राहू शकत नाही हे नियम माहित असूनही त्याला एनसीबी कार्यालयापर्यंत परवानगी देण्यात यावी. परंतु, अद्याप त्यांच्या अपीलाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यापूर्वी दीपिकाने एनसीबीच्या नोटिसला उत्तर देताना सांगितले की, ती चौकशीत सामील होईल आणि तपासाला सहकार्य करेल.

सारादेखील मुंबईत दाखल

सारा अली खान गोवावरुन मुंबईत दाखल झाली आहे. तिच्यासोबत आई अमृता सिंह होती. सारा आणि दीपिका शूटिंगसाठी मागील काही दिवसांपासून गोव्यात होत्या. तिकडे, अॅक्ट्रेस रकुलप्रीत आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशची एनसीबी शुक्रवारी चौकशी करेल.

कोणत्या अभिनेत्रीला कधी समन्स

  • रकुलप्रीत सिंह आणि करिश्मा प्रकाश : 25 सप्टेंबर
  • दीपिका पदुकोण : 26 सप्टेंबर
  • सारा अली : 26 सप्टेंबर
  • श्रद्धा कपूर : 26 सप्टेंबर
बातम्या आणखी आहेत...