आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग कनेक्शनमध्ये मोठा खुलासा:चॅटमध्ये दीपिका पदुकोणचेही नाव; चॅटमध्ये दीपिका ‘के’ला ‘माल’बाबत विचारते

मुंबई/नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सारा अली खानसह श्रद्धाकपूरला एनसीबीचे समन्स

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला समन्स पाठवले आहे. त्यांची याच आठवड्यात चौकशी होऊ शकते. ड्रग्ज प्रकरणात रकुल प्रीत सिंह व सिमाेन खंबाटा यांनाही बोलावले जाऊ शकते.

एनसीबी सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांच्या वृत्तांत म्हटले आहे की, अभिनेत्री दीपिका पदुकाेणलाही समन्स बजावले जाऊ शकते. ड्रग्जशी संबंधित व्हाॅट्सअॅप चॅटमध्ये तिचे नाव समोर आले आहे. एनसीबीने सोमवारी सुशांतची मॅनेजर श्रुती माेदी व टॅलेंट मॅनेजर जया साहाची ५ तास चौकशी केली.

चॅटमध्ये दीपिका ‘के’ला ‘माल’बाबत विचारते

मीडियानुसार, ड्रग्जबाबत २८ ऑक्टोबर २०१७ च्या व्हाॅट्सअॅप चॅटमध्ये दीपिका पदुकाेणचे नाव आले आहे. यात ‘डी’ हा काेडवर्ड दीपिकासाठी असल्याचे सांगितले जाते. एका चॅनलच्या दाव्यानुसार, चॅटमध्ये दीपिका “के’ला “माल’बाबत विचारते. ती उत्तरते, हे तिच्याकडे आहे, मात्र घरी ठेवलेले आहे. नंतर “के’ म्हणते की ती तिला काय हवं आहे ती “अमित’ला विचारू शकते. दीपिका स्पष्ट करते की तिला “हॅश” हवे आहे, “वीड’ नव्हे.

बातम्या आणखी आहेत...