आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडचे ड्रग्ज स्कँडल:एनसीबी सध्या बॉलिवूडमधील अन्य सेलेब्सना चौकशीसाठी बोलवणार नाही, तपास यंत्रणेकडून चौकशी झालेल्यांपैकी कुणालाही क्लीन चिट नाही

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या शनिवारी एनसीबीने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची चौकशी केली होती. त्यापूर्वी गुरुवारी रकुल प्रीत सिंगला बोलविण्यात आले होते. - Divya Marathi
गेल्या शनिवारी एनसीबीने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची चौकशी केली होती. त्यापूर्वी गुरुवारी रकुल प्रीत सिंगला बोलविण्यात आले होते.
  • एनसीबीचे डीजी रविवारी मुंबईला पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या टीमबरोबर बैठक घेतली.
  • फॉरेन्सिक तपासणीत करण जोहरच्या पार्टीचा व्हिडिओ खरा असल्याचे समोर आले.

ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) सध्या कोणत्याही अन्य बॉलिवूड स्टारला चौकशीसाठी बोलवणार नाही. रिपोर्ट्समध्ये सूत्रांचा हवाला देऊन हा दावा केला जात आहे. रविवारी मुंबईला पोहोचलेले एनसीबीचे डीजी राकेश अस्थाना सोमवारी सकाळी दिल्लीत परतले असल्याची माहिती आहे.

  • चार्जशीटसाठी 6 महिन्यांचा कालावधी

एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, रविवारी राकेश अस्थाना यांनी आपल्या पथकासह सुमारे 3 तास बैठक घेतली. यामध्ये बॉलिवूड सेलेब्सची चौकशी, पुरावे, निवेदने आणि अटक यावर चर्चा झाली. या दरम्यान अस्थाना यांनी टीमला निर्देश दिले की, या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी आहे. म्हणून पहिले पुराव्यांचा आढावा घेतला जाईल.

  • कोणत्याही सेलिब्रिटीला क्लीन चिट नाही

सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीने आतापर्यंत ज्या सेलिब्रिटींची चौकशी केली आहे, त्यांच्यापैकी कुणालाही सध्या क्लीन चिट दिली नाही. याव्यतिरिक्त, 20 हाय-प्रोफाइल ड्रग पेडलर्स तपास एजन्सीच्या रडारवर आहेत. डेटाचा बॅकअप घेण्यासाठी श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत.

  • करण जोहरचा पार्टी व्हिडिओ खरा

एनसीबीच्या बैठकीत करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओवरही चर्चा झाली. व्हिडिओचा फॉरेन्सिक अहवाल तपास यंत्रणेला प्राप्त झाल्याचे सूत्रांकडून समजते आणि त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की व्हिडिओ खरा असून त्यात छेडछाड केली गेली नाही.

2019 चा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करण जोहरने ही फक्त कौटुंबिक पार्टी होती. त्यात कोणतेही ड्रग्सचे सेवन झालेले नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र दुसरीकडे काही कलाकार मंडळीनी करण जोहरच्या घरी होणाऱ्या पार्टीमध्ये सर्रास अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी केली गेली होती. त्या तपासणी अहवालात हा व्हिडिओ खरा असल्याचा उघड झाले आहे.

अलीकडेच आपल्या एका अधिकृत निवेदनात करण म्हणाला की, "मी ड्रग्ज घेत नाही किंवा त्यासाठी कुणाला प्रोत्साहनही देत नाही. माझ्या आणि माझ्या कुटुंबासह सहकारी आणि धर्मा प्रॉडक्शनबद्दल ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्या निरर्थक आहेत," असे स्पष्टीकरण करणने दिले होते.

बातम्या आणखी आहेत...