आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:अर्जुन रामपालला NCB ने पुन्हा चौकशीसाठी बोलावले, 16 डिसेंबर रोजी होणार चौकशी; घरात सापडली होती बंदी असलेली औषधे

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील महिन्यात झाली होती मेहुण्याला अटक

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेता अर्जुन रामपाल याला पुन्हा एकदा एनसीबीने समन्स बजावले आहे. अर्जुनला उद्या (16 डिसेंबर) सकाळी 11 वाजता पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यापूर्वी 13 नोव्हेंबर रोजी तब्बल सात तास अर्जुनची चौकशी झाली होती.

13 नोव्हेंबर रोजी झालेल्या चौकशीदरम्यान अर्जुनने एनसीबीला सहकार्य केल्याचे सांगितले गेले होते. त्यापुर्वी 9 नोव्हेंबर रोजी त्याच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. अर्जुनच्या घरी ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या. या औषधावर भारतात बंदी आहे. या टॅब्लेट ड्रग्ज प्रकारात मोडतात. याबाबत अर्जुन रामपाल याला खुलासा करायचा होता. 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी अर्जुनची लिव्ह इन पार्टनर ग्रॅब्रिएला डेमेट्रियड्सची चौकशी झाली होती. याशिवाय अर्जुनच्या कार चालकालाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. एनसीबीने अर्जुनच्या घरातून काही मोबाइल फोन आणि लॅपटॉपही जप्त केले होते.

मागील महिन्यात झाली होती मेहुण्याला अटक
अ‍ॅगिसिलोस हा अर्जुन रामपाल याचा मेहुणा आहे. त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांच्या संपर्कात होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी पॉल बारटेल याला अटक केली आहे. पॉल हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक असून तो अर्जुन रामपाल याचा मित्र आहे. पॉल याचे ही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. पॉल याच्या आंतरराष्ट्रीय माफिया सोबत असलेल्या संबंधा बाबत रामपाल यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती.

अर्जुन आणि गब्रिएला हे दोघे वांद्रे येथे राहतात. त्यांच्या सोबत गब्रिएला हिचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स हा देखील राहत होता. गेल्या महिन्यात एनसीबी अधिकाऱ्यांनी अ‍ॅगिसिलोस याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले होते. वेगवेगळ्या प्रकारचे हे ड्रग्ज होते. तपासात अ‍ॅगिसिलोस हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांच्या संपर्कात असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

अ‍ॅगिसिलोसने आपल्याला जामीन मिळावा म्हणून मुंबई सेशन कोर्टात अर्ज केला होता. अखेर आज (15 डिसेंबर) त्याला पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. यावेळी त्याने पासपोर्ट जमा करावा, तसेच देश सोडून जाऊ नये, कुठे जायचे असल्यास परवानगी घेऊन जावे, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...