आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण:करण जोहरच्या कंपनीच्या माजी दिग्दर्शकाला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर, जमा करावा लागला पासपोर्ट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्षितिज प्रसादला 26 सप्टेंबर रोजी एनसीबीने मुंबईतून ताब्यात घेतले होते.

धर्मा प्रोडक्शनचा माजी दिग्दर्शक क्षितिज रवी प्रसादला NDPS कोर्टाने गुरुवारी 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. कथित ड्रग्ज प्रकरणी अर्थातच 16/20 केसमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 26 सप्टेंबर रोजी त्याला अटक केली होती. न्यायलयाने त्याला आपला पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे.

रकुल प्रीत सिंहनेही घेतले होते क्षितिजचे नाव
बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहची काही दिवसांपूर्वी चौकशी झाली होती. या चौकशीत तिने क्षितिजचे नाव घेतले होते. त्यावेळी क्षितिज प्रसाद दिल्लीत होता आणि एनसीबीचे समन्स मिळाल्यानंतर मुंबईत आला होता. एनसीबीने विमानतळावरूनच क्षितिजला ताब्यात घेतले होते. पण त्याआधीच क्षितिजच्या मुंबईमधील घरावर छापा टाकण्यात आला होता, त्यात अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. क्षितिजसह अर्जुन रामपालचा मेहुणा अगिसिलयाओस डेमेट्रिएड्स याला देखील करण्यात आली होती.

क्षितिजच्या वकिलांनी एनसीबीवर लावले होते गंभीर आरोप
क्षितिजचे वकील अ‍ॅड. सतीश मानशिंदे यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, त्यांचे क्लायंट क्षितिज प्रसादच्या घरात एनसीबीला फक्त कोरड्या सिगारेटचे थोटके मिळाली होती, एनसीबीने जबरदस्तीने त्याला गांजचे नाव दिले. करण जोहर, सोमन मिश्रा, राखी, अपूर्व, नीरज, राहिल यांची नावे घेण्यासाठी क्षितिजवर एनसीबीकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.

एनसीबीच्या कोठडीच क्षितिजला थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले होते. पहिल्या दिवशी एनसीबी कोठडीत क्षितिजला चांगली वागणूक दिली गेली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी क्षितिजचा जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली तेव्हा, समीर वानखेडेंसह इतर अधिकारी तिथे उपस्थित होते. क्षितिज प्रसाद धर्मा प्रोडक्शनशी संबंधित असल्याने त्याने करण जोहर, सोमल मिश्रा, राखी, अपूर्व, नीरज यांनीही ड्रग्ज घेतले असे कबूल करावे, तर त्याला सोडून देण्यात येईल, असे क्षितिजला सांगण्यात आले. त्याने या गोष्टीस नकार दिल्यावर त्याच्याकडून जबरदस्तीने वदवून घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे सतिश मानेशिंदे यांनी म्हटले होते.

क्षितिजसोबत नाव जुळल्याने करण जोहरने व्यक्त केली होती नाराजी
क्षितिजसोबत नाव जुळल्याने करण जोहरने स्पष्टीकरण दिले होते. त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपले निवेदन जारी केले होते. करण म्हणाला होता, "मी ड्रग्जचे सेवन करत नाही आणि अशा गोष्टींसाठी कधी कोणाला प्रोत्साहन किंवा पाठिंबादेखील देत नाही. माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, सहका-यांबद्दल आणि धर्मा प्रोडक्शनबद्दल जे काही बोलले जात आहे, त्या सर्व गोष्टी निराधार आहेत."

क्षितिजसोबत नाव जोडल्यानंतर करणने 5 पॉइंट्समधून स्पष्टीकरण दिले होते

  • 28 जुलै 2019 रोजी माझ्या घरी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज नव्हते, असे स्पष्टीकरण करण जोहरने दिले आहे. काही न्यूज चॅनल, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माझ्या घरी झालेल्या पार्टीत ड्रग्ज होते, अशी चुकीची रिपोर्टिंग केली जात आहे, असे करणने म्हटले होते.
  • क्षितिज रवी प्रसाद आणि अनुभव चोप्रा या दोन व्यक्तींचा आणि धर्मा प्रॉडक्शनचा संबंध जोडण्यात येत आहे. त्यांचा आणि माझा किंवा धर्मा प्रॉडक्शनचा कोणताच संबंध नाही. तसेच मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखतदेखील नाही.
  • अनुभव चोप्रा हा माझ्या कंपनीचा कर्मचारी नव्हता. मात्र 2011 ते 2013 याकाळात त्याने स्वतंत्रपणे आमच्या कंपनीसोबत दोन प्रोजेक्ट्सवर काम केले होते.
  • क्षितिज रवी प्रसाद नोव्हेंबर 2019 मध्ये धर्मा प्रॉडक्शनची संबंधित कंपनी धर्ममेटिक एंटरटेन्मेंटशी संबंधित होता. तो एका प्रोजेक्टसाठी कराराच्या आधारे कार्यकारी निर्माता होता.
  • लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे राहतात किंवा काय करतात याच्याशी मला किंवा धर्मा प्रॉडक्शनला काही घेणे-देणे नाही.
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser