आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:अंमली पदार्थप्रकरणी आता अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला NCB चे समन्स, आज होणार चौकशी

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 डिसेंबर रोजी अर्जुन रामपालची NCBकडून चौकशी करण्यात आली होती.

बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाचा तपास करणा-या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला चौकसीसाठी समन्स बजावले आहे. ड्रग्ज प्रकरणात आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एनसीबीकडून आतापर्यंत अर्जुन रामपालची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय अर्जुनची लिव्ह इन पार्टनल ग्रॅबिएला डेमेट्रियड्स हिची देखील याप्रकरणी दोनदा चौकशी झाली. तपास यंत्रणेने ग्रॅबिएलाचा भाऊ गिसियालोस डेमेट्रियड्स याला अटकदेखील केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

गेल्या नोव्हेंबर महिन्यात एनसीबीने अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्या घरातून एनसीबीच्या अधिका-यांना NDPC अॅक्टनुसार प्रतिबंध असलेली औषधे मिळाली होती. अर्जुनने आपल्या एका नातेवाईकामार्फत बेकायदेशीरपणे ही औषधे घेतली होती. या औषधांसाठी ज्या प्रिस्क्रिप्शनचा वापर करण्यात आला होता ते एक्सपायर झाले होते. चौकशीवेळी अर्जुन रामपालने सांगितले होते की, आपण NCBला एक विशेष औषधांचे प्रिस्क्रिप्शनही दिले आहे. हे प्रिस्क्रिप्शन दिल्लीच्या मनोवैज्ञानिकाने आपल्याला दिल्याचे त्याने म्हटले होते.

बहिणीवर बनावट प्रिस्क्रिप्शन बनवल्याचा आरोप
अर्जुन रामपालची बहीण कोमल यांना सकाळी 11 वाजता मुंबईतील एनसीबीच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अर्जुनच्या घरातून जे प्रिस्क्रिप्शन एनसीबीच्या अधिका-यांना मिळाले आहे, ते अर्जुनच्या बहिणीच्या सांगण्यावरुन दिल्लीच्या मनोवैज्ञानिकाने तयार केल्याचे म्हटले जात आहे. एनसीबीने त्या डॉक्टराचा जबाब CRPC च्या कलम 164 अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवला होता.

21 डिसेंबर रोजी अर्जुन रामपालची NCBकडून चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी सुमारे 6 तास चालली. त्या दिवशी त्याला अटक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण चौकशीनंतर अर्जुनला सोडून देण्यात आले होते. तत्पूर्वी NCBने त्याला 16 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले होते. पण अर्जुनने 22 डिसेंबरला वेळ मागितली होती. पण 21 डिसेंबरला अर्जुन चौकशीसाठी हजर झाला होता.

अर्जुन रामपालच्या घरातून ही औषधे ताब्यात घेण्यात आली

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) च्या चौकशीत अर्जुन रामपालने सांगितले होते की, त्याच्या घरातून जी औषधे जप्त केली गेली, ती त्याच्या कुत्र्यासाठी डॉक्टरांनी लिहून दिली होती. कारण त्याच्या कुत्र्याच्या जॉइंटमध्ये वेदना होत असतात. व्हेटरनरी डॉक्टरांनी ती औषधे प्रिस्क्राइब केली होती. एनसीबीच्या म्हणण्यानुसार छापेमारीमध्ये अभिनेत्याच्या घरातून अल्ट्रासेट टॅबलेट जप्त करण्यात आल्या आहेत. हे एक प्रिस्क्राइब औषध आहे, जे तीव्र वेदना दरम्यान वापरले जाते. दुसरे औषध क्लोनाजेपाम होते, हे औषध केवळ डॉक्टरांनी लिहून दिल्यास घेतले जाऊ शकते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser