आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण:​​​​​​​रियाला ड्रग्स सप्लाय करणारा पेडलर रिगेल महाकाल अटकेत, NCB ची मुंबईत छापेमारी सुरू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रीगेल महाकाल हाच आरोपी अनुज केशवानीला ड्रग्ज पुरवत होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कथित आत्महत्या प्रकरणी ड्रग अँगलने तपास करत असलेल्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने बुधवारी ड्रग पेडलर रिगेल महाकालला अटक केली आहे. सूत्रांनुसार रिगेल ड्रग पेडलर अनुज केशवानीच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीपर्यंत ड्रग्स पोहोचवत होता. NCB रिगेलच्या सांगण्यावरून एनसीबी मुंबईतील लोखंडवाला आणि मिल्लतनगर येथे छापा टाकत आहे. एनसीबीने येथून अडीच कोटी रुपयांची ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रीगेल महाकाल हाच आरोपी अनुज केशवानीला ड्रग्ज पुरवत होता. जो रिया चक्रवतीपर्यंत पोहोचवत होता. NCBने यापूर्वीच अनुज केशवानीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या आरोपीकडे सध्या छापेमारी सुरू आहे, तो रिगेल महाकालला ड्रग्स सप्लाय करायचा.

सूत्रांनुसार रीगेल महाकाल बॉलवूडच्या काही सेलिब्रिटींशीही संबंधित आहेत. NCB बराच काळापासून रीगेलचा शोध घेत होती. आरोपी रीगेल महाकालला मेडिकलसाठी नेण्यात आले आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser