आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'लज्जा' ला 19 वर्षे पूर्ण:कलाकारांचा फौजफाटा असूनही फ्लॉप ठरला होता पहिला स्त्रीप्रधान चित्रपट, सीतेच्या नावावर ठेवण्यात आली हाेती अभिनेत्रींची नावे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 31 ऑगस्ट 2001 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

राजकुमार संतोषी दिग्दर्शित “लज्जा’ चित्रपट 2001 मध्ये रिलीज झाला होता. भारतातील महिलांच्या स्थितीवर आधारित या चित्रपटातून समाजातील कुप्रथेवर ताशेरे ओढण्यात आले होते. विशेष म्हणजे मनीषा कोईराला, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, रेखा, माधुरी दीक्षित, महिमा चौधरी, अजय देवगण आणि शरमन जोशीसारख्या कलाकारांचा फौजफाटा असूनही चित्रपट देशात चांगली कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटाला नुकतीच 19 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याविषयी काही रंजक किस्से जाणून घेऊ...

 • या चित्रपटात महिलांच्या 4 वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या. या सर्व सत्य घटनेवर आधारित आहेत.
 • यात अजय देवगण, अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनी एकत्र काम केले होते.
 • हा राजकुमार संतोषी आणि अजय देवगण यांचा पहिला चित्रपट होता. यात राजकुमार संतोषीने पहिल्यांदाच रेखासोबत काम केले होते.
 • अजय देवगणच्या भूमिकेसाठी आधी सनी देओलला संपर्क करण्यात आला होता. मात्र, जास्त मानधन मागितल्यामुळे संतोषींनी अजयला घेतले.
 • या चित्रपटासाठी आधी ऐश्वर्या रायला संपर्क करण्यात आला होता. तिनेही हा चित्रपट करण्यास नकार दिला.
 • तब्बूलाही ऑफर आली होती, मात्र कमी मानधनामुळे तिनेही नकार दिला.
 • रेखाच्या भूमिकेसाठी आधी हेमामालिनीशी संपर्क करण्यात आला होता.
 • आधी संगीतकार ए. आर. रहमान यांच्याशी करार करण्यात आला होता. मात्र, कोणत्यातरी कारणावरून रहमान यावर काम करू शकले नाही. नंतर अन्नू मलिक यांनी संगीत दिले.
 • चित्रपटाची सर्व गीते समीरने लिहिली होती. एकमेव गीत “कौन डगर...’ प्रसून जोशी यांनी लिहिले होते. ते इलयाराजाने कंपोझ केले होते आणि लता मंगेशकर यांन गायले होते.
 • चित्रपटातील गाण्यांची त्या वेळी 13 लाखांत विक्री झाली होती. चित्रपटातील सर्वच गाणी हिट झाली होती.
 • मोठी स्टारकास्ट असूनही चित्रपटातील गाण्यात ऊर्मिला मातोंडकर आणि सोनाली बेंद्रेसारख्या अभिनेत्रींनी काम केले होते. अभिनेत्री आरती छाब्रियाचा हा पहिला चित्रपट होता.
 • 47 व्या फिल्मफेअर पुरस्कारात या चित्रपटाला 3 पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. यात सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून अजय आणि रेखा-माधुरीला उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले.
 • महिला कलाकारांचे नाव (मैथिली, जानकी, रामदुलारी, वैदेही) सीतेच्या नावावर ठेवण्यात आले हाेते.