आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आज ‘द बर्निंग ट्रेन’ या क्लासिकल, थ्रिलर चित्रपटाबाबत जाणून घेणार आहोत. चित्रपटातील दृश्ये खूप दमदार होती. सिक्वेन्स असा होता की, काही वेळ असे वाटायचे की, आता काय हाेईल, कोणी जिवंत राहील की नाही. जाणून घेऊया 1980 मधील सर्वात थरारक अॅक्शन चित्रपटाशी संबंधित खास गोष्टी.
चित्रपटाचे कथानक तीन मित्रांवर आधारित आहे. अशोक सिंह (धर्मेन्द्र), विनोद वर्मा (विनोद खन्ना) आणि रणधीर (डॅनी डेंगजोंगपा) यांच्या बालपणापासून कथानक सुरू होते. यातील अशाेक मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा असतो. तर, विनोद आणि रणधीर, राकेश (विनोद मेहरा) इंजिनअर्स असतात. हे तिघेही आपापल्या सुपरफास्ट ट्रेनचे मॉडेल रेल्वेला देतात. ज्यात विनोदच्या मॉडेलची निवड होते आणि रणधीर या गोष्टीमुळे नाराज होतो. एक दिवस रेल्वे एक “सुपर एक्सप्रेस” बनवण्याची मान्यता देते. जवळपास 6 वर्षांनी ट्रेन तयार होते आणि फर्स्ट रनसाठी दिल्ली ते मुंबईसाठी निघते. यादरम्यान रणधीर विनोदसोबत असलेले काही खासगी आणि व्यावसायिक शुत्रूत्वामुळे ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवतो. यादरम्यान अशोकची भेट रणधाीरसोबत होते आणि तो अशोकला सांगतो की, त्याने विनोदसाेबत सूड घेण्यासाठी इंजिनमध्ये बॉम्ब ठेवला आहे. हे समजल्यावर अशोक ट्रेनला थांबवण्यासाठी वेगाने पळतो. इकडे इंजिनमध्ये ब्लास्ट होतो. ट्रेनला थांबवणे आणि प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू होतो. रेल्वे कर्मचाऱ्यांना ही गोष्ट ज्यावेळी समजते तर ते हादरतात. शेवटी विनोद, अशोक आणि रवी मिळून ट्रेनला थांबवतात. आणि चित्रपट संपतो.
चित्रपट बनवण्यासाठी पूर्ण पाच वर्षे लागली होती. चित्रपटात हॉलिवूडच्या टीमचा सहभाग होता. चित्रपट सुरू झाला त्यादरम्यान हेमामालिनी यांनी ‘रजिया सुल्तान’ आणि ‘राजपूत’ हे दोन मोठे चित्रपटही केले होते. बी. आर. चोप्रा यांनी रेल्वेचे जे सामान वापरले होते त्यासाठी अगोदरच पैसे दिले होते. बी. आर. चाेप्रा यांनी या चित्रपटासाठी कलाकारांची निवड करण्यात खूप वेळ घेतला. त्यांना त्यांची आवडती अभिनेत्री विद्या सिन्हा यांनाही चित्रपटात घ्यायचे होते. विद्या सिन्हा यांनी नवीन निश्चल यांच्यासोबत सेकंड क्लास प्रवाशाची भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु, त्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला. यानंतर पद्मिनी कपालिया यांची एंट्री झाली. त्यावेळी विद्या सिन्हा यांचे बी. आर. चोप्राचे जावई राज तिलकसोबत अफेअर होते असे म्हटले जाते. राज नेहमी विद्या यांना बी.आर.चोप्राबद्दल वाईट सांगायचे. त्यामुळे विद्या यांनी भूमिकेसाठी नकार दिला.
द बर्निंग ट्रेनला आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले होते. ते त्यांच्या उत्कृष्ट संगीतासाठी ओळखले जातात. त्यामुळे रोमँटिक गाणे असो वा चित्रपटाचे बॅकग्राउंड संगीत हे कमालीचेच होणार होते. ट्रेनला बदलल्याचे दृश्य असो किंवा मारामारीचे दृश्य सर्व कमालीचे होते. रवी चोप्रा यांनी चित्रपटातील सर्वच दृश्य सुंदरतेने चित्रीत केले हाेते. त्यात बर्मन दा यांचे संगीत म्हणजे दुग्धशर्करा योगच. शेवटच्या दृश्यात मिनिएचरचा वापर करून नको, असे सुरुवातील बऱ्याच जणांनी रवीला सल्ला दिला होता. परंतु हेच फायदेशीर ठरले. व्हिज्युअल्स इफेक्टमुळे चित्रपट अधिक प्रभावी झाला होता. चित्रपटातील शेवटच्या दृश्यात जंक्शनवर एक मैल लांब यार्ड बनवून इंजिनला ट्रेनपासून वेगळे करण्याचे दृश्य आहे, ती मिनिएचर चित्रीकरणाची कमाल आहे.
1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट खूप हिट झाला नव्हता, मात्र त्यावर्षीचा सातवा सर्वंात जास्त कमाई करणारा चित्रपट होता. बी. आर. चोप्रा यांना या चित्रपटाची प्रेरणा जापानीज फिल्म्स, बुलेट ट्रेन आणि टॉवरिंग इंफर्नोंकडून मिळाली होती. चित्रपटात धर्मेंद्र, विनोद खन्ना, विनोद मेहरा, जितेंद्र यांच्यासारखे एकापेक्षा एक हँडसम अभिनेते होते. तर परवीन बॉबी, हेमा मालिनी, नीतू सिंह या अभिनेत्री होत्या. खलनायक म्हणून मोस्ट हँडसम डॅनी होते. याचे कथानक ज्यावेळी लिहिले जात होते त्यावेळी अमिताभ बच्चन यांना यासाठी विचारले होते. परंतु ते ‘दोस्ताना’च्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे त्यांनी नकार दिला होता. म्हणून विनोद खन्ना यांची यात एंट्री झाली.
चित्रपटात खूप सारे प्रसिद्ध कलावंत होते. बडखल तलावजवळ गाणे चित्रीत झाल्यानंतर दुपारी सर्वजण मयूर नावाच्या रेस्टारंटमध्ये जेवणासाठी गेले. विनोद खाण्याचेे शौकीन होते. त्यांनी अगोदरच सांगितले होते की, ते फरीदाबादची स्पेशल थालीच खाणार. ज्यावेळी ते रेस्टारंटमध्ये पोहाेचले तर त्यांना वांग्याचे भरीत, भरलेली पडवळ आणि टोमॅटोची भाजी वाढली. तर विनोद हसत म्हणाले, अशी भाजी तर मी माझ्या घरीही खातो. मला वाटले की, काही खास पदार्थ असेल. त्यानंतर इतर अभिनेत्यांनी आणि टीमने नॉनव्हेज ताव मारला, विनोद खन्ना मात्र जेवले नाहीत.
चित्रपटात ‘मेरी नजर तुझपे’ हे एक गाणे होते. ज्यासाठी आशा भोसले यांची निवड झाली होती. चित्रपटात भारतीय आणि पाश्चिमात्य दोन्ही प्रकारचे संगीत होते. आणि आशा यांना दोन्ही प्रकारचे गाणे गायचे होते. आशा यांना हे गाणे हेमा आणि परवीन या दोघींच्या शैलीत गायचे होते. आशा यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने गाणे गाऊन घेतले आणि त्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने मिक्स केले. आशा यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारचे गाणे गायले होते. हे गाणे एेकून असे वाटतच नव्हते की हे एकाच गायिकेने गायले आहे.
‘द बर्निंग ट्रेन’ चित्रपटात विनोद खन्ना, धर्मेंद्र, हेमामालिनी आणि परवीन बॉबी यांच्यावर फरदीबाद येथील बडखल तलावाच्या काठावर सायकल चालवत असतानाचे गाणे चित्रीत केले होते. ‘पहली नजर में हमने तो अपना दिल दे दिया’ असे गाण्याचे बोल होते. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान धर्मेंद्र आणि विनोद खन्ना एकदाही पडले नाहीत, मात्र परवीन बॉबी आणि हेमामालिनी तीनेवळा पडल्या. चित्रीकरण आणि अभिनेत्यांची एक झलक पाहण्यासाठी जवळपास दहा हजार लोक बडखल तलावाजवळ पोहोचले होते. चार पैडलच्या दोन सायकलींवर बसून हे गाणे चित्रीत केले होते. चारही कलाकार एका छोट्या बसमध्ये दिल्लीहून फरीदाबादला आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.