- Marathi News
- Entertainment
- Bollywood
- Bollywood | Marathi News | Kareena Kapoor Katrina Kaif | Bollywood Actors List Who Worked For Free In Movies, Celebrities Did Free Work In Films To Become Famous.
नावासाठी केले काम:करिना कपूरपासून कतरिना कैफपर्यंत, 'या' सेलिब्रिटींनी फेमस होण्यासाठी चित्रपटात फुकट केले काम
बॉलिवूड कलाकारांना स्टार म्हटले जाते कारण, त्यांनी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्यामुळेच चित्रपट हिट होतो किंवा कधी-कधी फ्लॉप देखील होतो. प्रत्येक चित्रपटासाठी अभिनेते-अभिनेत्री प्रोड्यूसर्सकडून कोटींची फीस आकारत असतात. करिना कपूरपासून कतरिना कैफपर्यंत असे अनेक सेलिब्रिटी आहे ज्यांनी, चित्रपटासाठी किंवा गाण्यासाठी कोणत्याही प्रकारे फीस घेतली नव्हती आणि मोफत चित्रपटात काम केले होते. चला तर मग आज आपण जाणून घेऊया, या कलाकारांविषयी..
अभिनेत्री करिना कपूर हिने एक नव्हे तर तब्बल दोन चित्रपटात मोफतमध्ये काम केले आहे. रिपोर्ट्सनुसार, 'बिल्लू' या चित्रपटातील 'मरजानी' आणि 'दबंग 2' च्या 'फेव्हिकॉल' गाण्यासाठी करिनाने कोणतीही फीस घेतली नसुन, मोफतमध्ये अभिनय केला आहे.
अभिनेत्री कतरिना कैफ हिने देखील 'अग्निपथ' या चित्रपटात 'चिकनी चमेली' या गाण्यासाठी मोफत अभिनय केला आहे. या चित्रपटात मोफत अभिनय साकारल्यानंतर करण जोहर आणि कतरिनाची चांगलीच मैत्री झाली होती.
अभिनेता शाहरुख खानने 'भूतनाथ' या चित्रपटात छोटीशी भुमिका साकारली होती. ज्यासाठी शाहरुखने देखील कोणत्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाहीत. या चित्रपटात शाहरुख खान बरोबर अमिताभ बच्चन आणि जूही चावला देखील पाहायला मिळले होते.
अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने 'बिल्लू' या चित्रपटात 'यू गेट मी रॉकिंग अॅण्ड सेलिंग' हा गाणा गायिला होता. त्यासाठी प्रियंकाने कोणत्याही प्रकारे मानधन घेतलेले नाही.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सर्वात जास्त फीस आकारणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रिपोर्ट्सनुसारने आपल्या पहिल्या चित्रपटात 'ओम शांती ओम' साठी एक रुपया देखील घेतली नव्हता. या चित्रपटात दीपिकाने मुख्य भुमिका साकारली होती.
मोफत काम करणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. सलमानने 'सन ऑफ सरदार', 'तीस मार खा' यासह अनेक चित्रपटात मोफत काम केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, फरहान खानच्या 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटात पहिल्यांदा पाहायला मिळाली. या चित्रपटासाठी सोनमने फक्त 11 रुपये मानधन घेतले होते. जे की एका चहाची किंमत आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहे. रिपोर्टर्सनुसार अक्षय कुमारचा चित्रपट 'बॉस' मध्ये असलेल्या 'पार्टी ऑल नाइट' साठी सोनाक्षीने पैसे घेतले नव्हते.
अभिनेता शाहिद कपूरने देखील 'हैदर' या चित्रपटाच्या अभिनयासाठी कोणत्याही प्रकारे फीस आकारली नाही. हा चित्रपट काश्मीरातील तरुणावर बनवण्यात आला आहे. या चित्रपटासाठी 'बेस्ट अॅक्टर फिल्म फेयर अवॉर्ड' देखील मिळालेला आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जीने बॉलिवूडला खुप सारे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. रिपोर्टर्सनुसार, राणीने आपल्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटासाठी करण जोहरकडून कोणत्याही प्रकारे फीस घेतली नव्हती. कारण, करण हा राणीचा चांगला मित्र आहे.