आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॉप झाले तरीही तोट्यात नसतात चित्रपट:निर्माते किंवा अभिनेत्यांचे होत नाही नुकसान, चार प्रकारचे हक्क विकून आधीच कमाई करतात प्रोडक्शन हाऊस

अरुणिमा शुक्ला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही कधी विचार केला आहे की, या वर्षी एकामागून एक बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले आहेत, परंतु तरीही दर महिन्याला तितक्याच चित्रपटांची घोषणा होत आहे आणि चित्रपट प्रदर्शितही होत आहेत. गंमत म्हणजे फ्लॉप झाले तरीही चित्रपटही तोट्यात नसतात, पण हे कसे घडते?

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड बिझनेसची संपूर्ण स्ट्रॅटेजी सांगणार आहोत. चित्रपट बनवल्यानंतर, थिएटरमध्ये येईपर्यंत किती टप्प्यातून जातो चित्रपट? कमाईत कुणाकुणाचा असतो वाटा?

चित्रपटाने किती कमाई केली याच्या आधारावर चित्रपट हिट की फ्लॉप हे ठरवले जाते, पण फ्लॉप चित्रपटही गुंतवलेली रक्कम वसूल करतात. राज बन्सल यांच्या मते, फ्लॉप चित्रपट प्रीसेल्सच्या माध्यमातून कमाई करतात. खरे तर निर्माते चित्रपटांचे हक्क चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विकतात. चित्रपट संगीत अधिकार, OTT प्लॅटफॉर्म अधिकार, उपग्रह हक्क आणि वितरक हक्कांमधून त्यांचे पैसे कमावतात. नुकताच प्रदर्शित झालेला 'शमशेरा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला, परंतु रिलीज होण्यापूर्वीच, प्रोडक्शन हाऊसने प्री-सेलद्वारे आपली गुंतवणूक वसूल केली होती.

अभिनेते, निर्मात्यांपेक्षा वितरकांना जास्त होते नुकसान?

राज बन्सल यांच्या मते, फ्लॉप चित्रपटांचे नुकसान कलाकार, निर्मात्यांना नाही तर वितरकांना सहन करावे लागते. जे लोक रिलीजपूर्वी चित्रपटांचे सर्व हक्क विकत घेतात, त्यांना फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांचा फटका सहन करावा लागतो.

चित्रपटांची दोन प्रकारे विक्री होते. पहिली अॅडव्हान्स, दुसरी एमजी म्हणजेच किमान हमी. चित्रपट वितरकांना अॅडव्हान्स कसे विकले जातात हे उदाहरणासह समजून घेऊ. समजा एखाद्या चित्रपटाच्या वितरकाने निर्मात्याला 15 कोटी रुपये दिले. यानंतर, जर चित्रपट फक्त 10 कोटी रुपये कमवू शकला तर निर्मात्याला वितरकाला 5 कोटी रुपये परत करावे लागतील.

जर चित्रपट MG म्हणजे मिनिमम गॅरंटीवर विकले गेल, तरच वितरकांना फ्लॉप चित्रपटांचा तोटा सहन करावा लागतो. म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वितरक निर्मात्याला जी रक्कम देतो. यानंतर चित्रपट फ्लॉप झाला तरी वितरकाला निश्चित रक्कम भरावी लागते.

वितरक कोणत्या आधारावर चित्रपट खरेदी करतात?
राज बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वितरकाला दाखवला जातो. चित्रपट पाहिल्यानंतरच वितरक तो विकत घेण्याचा दर ठरवतो. चित्रपट वितरकाला किती आवडते त्यानुसार ते चित्रपटांवर करोडो रुपये खर्च करतात. याशिवाय प्रोडक्शन हाऊस, निर्माता कोण, या सर्व गोष्टी पाहून वितरक चित्रपट खरेदी करतात.

चित्रपटांमध्ये स्टारकास्टची भूमिका काय असते?

चित्रपट हिट होणार की फ्लॉप, या सर्व गोष्टी स्टारकास्टवर अवलंबून असतात. बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकास्टपेक्षा चित्रपटाच्या कथेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा ट्रेंड आहे. तथापि, स्टार कास्ट चित्रपटांना बझ देतात. मोठ्या स्टार्समुळे वितरकही खेचले जातात.

तिकिटांमधून चित्रपटाची कमाई कशी होते?

राज बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा चित्रपट वितरकाला विकला जातो, तेव्हा वितरक नंतर उप-वितरकाला चित्रपट विकतो. त्यानंतर ते उप-वितरक त्यांच्या भागातील चित्रपटगृह मालकांना चित्रपटाच्या प्रिंट देतात. चित्रपटगृहात जेव्हा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा तिकीट विक्रीतून मिळालेल्या कमाईला चित्रपटाचे एकूण कलेक्शन असे म्हणतात. त्यानंतर, तिकीटातून मिळणारे उत्पन्न आधीच्या कराराच्या आधारे वितरक आणि थिएटरचे व्यवस्थापक आपापसात वाटून घेतात.

चित्रपट रिमेक अधिकार आणि सिंडिकेशन अधिकारातून कसे कमावतात?
अक्षय राठीच्या म्हणण्यानुसार, परदेशात कमाई करण्याव्यतिरिक्त, चित्रपट रिमेक आणि सिंडिकेशन अधिकारांमधूनही चांगली कमाई करतात. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की सिंडिकेशन राइट्स म्हणजे काय?

Netflix, Amazon Prime Video सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे हक्क विकून मिळालेली कमाई सिंडिकेट राइट्सचा भाग आहे. याशिवाय, सेट मॅक्स, स्टार गोल्डवर चित्रपट विकून कमाई केली जाते. हे सॅटेलाइट राइट्ससुद्धा सिंडिकेशनचा भाग आहेत. युट्यूब चॅनल हे सिंडिकेशन कमाईचे एक मोठे स्त्रोत आहे. संगीत अधिकार हे सिंडिकेशन अधिकारांचा एक प्रमुख भाग आहेत.

म्युझिक राइट्स - चित्रपटांच्या संगीतातूनही भरपूर कमाई होते. मोठ्या बजेटच्या चित्रपटांसाठी वेगवेगळ्या संगीत कंपन्या रांगेत उभ्या असतात. जी कंपनी निर्मात्याला गाण्यांसाठी जास्त पैसे देऊ करते, तिला चित्रपटाची गाणी आणि रचनेचे अधिकार दिले जातात. गाण्यांना जितके जास्त व्ह्यूज मिळतात तितका जास्त नफा म्युझिक कंपनीला मिळतो.

रिमेक राइट्स - रिमेक राइट्सचा अर्थ असा होतो की, साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपटांचे रिमेकचे हक्क हिंदी चित्रपटांच्या निर्मात्याला विकले जातात.

प्रायोजकांच्या माध्यमातून चित्रपट कमाई करतात
प्रायोजक म्हणजेच स्पॉन्सर ते लोक असतात जे चित्रपटात स्वतःच्या प्रमोशनसाठी पैसे गुंतवतात. चित्रपटात कंपनीचे नाव कुठे आणि केव्हा दाखवले जाणार याबाबत निर्माता आणि प्रायोजक यांच्यात करार असतो. चित्रपटाच्या मध्यभागी जाहिरात दिसते, हा प्रायोजकाच्या जाहिरातीचा भाग असतो, असतो. या प्रक्रियेचा चित्रपटाला लाखो-कोटींचा फायदा होतो. थिएटर चित्रपटांतील जाहिरातींमधून मिळणारा नफा फक्त थिएटर मालकालाच जातो.

थिएटर प्री-बुकिंगमधून चित्रपटांची करोडोंची कमाई होते का?

अक्षय कुमार स्टारर चित्रपट 2.0 ने प्री बुकिंगमधून करोडोंची कमाई केली होती. वास्तविक, मोठ्या स्टारकास्ट चित्रपटांसाठी अनेक दिवस आधीपासून थिएटरमध्ये प्री-बुकिंग सुरू होते. बॉलिवूडमध्ये सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या स्टार्सच्या चित्रपटांचे प्री-बुकिंग सर्वाधिक आहे. मोठ्या स्टारकास्टच्या चित्रपटांची चर्चा अधिक असते, त्यामुळे चित्रपटांना प्री-बुकिंगचा खूप फायदा होतो.

निर्माता आणि वितरक यांच्यात झालेल्या करारापेक्षा चित्रपटांनी अधिक कमाई केली, तर त्याचा नफा किती?

राज बन्सल यांच्या मते, जेव्हा चित्रपट करारामध्ये निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त कमाई करतात, तेव्हा त्या कमाईला ओव्हरफ्लो म्हणतात. RRR चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच सुमारे 500 कोटींची कमाई केली होती आणि चित्रपटाचे एकूण कलेक्शन सुमारे 1100 कोटी होते. वितरकाशिवाय या ओव्हरफ्लोच्या कमाईचा काही भाग चित्रपट निर्मात्यालाही जातो. निर्मात्याचा वाटा किती टक्के असेल, हे आधीच करारात लिहिलेले असते.

बॉक्स ऑफिस कलेक्शनची गणना कशी केली जाते?

भारतात 2 प्रकारचे थिएटर आहेत-

सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स चेन वितरकांना थिएटर्सकडून दर आठवड्याला पैसे मिळतात. ग्राफच्या मदतीने हे समजून घेऊया-

वितरकांचे नुकसान आणि भरपाई कशी मोजली जाते?

वितरकांचा नफा/तोटा = चित्रपट खरेदीचा खर्च - वितरकाचा खर्च

आता हे एका उदाहरणाने समजून घेऊ.

समजा मल्टिप्लेक्समध्ये एका तिकिटाची किंमत 200 रुपये आहे आणि संपूर्ण आठवड्यात एकूण 100 लोकांनी चित्रपट पाहिला आणि चित्रपटगृहात चित्रपटाचे 100 शो झाले.

त्यानुसार, संपूर्ण आठवड्यासाठी एकूण कलेक्शन असे असेल- 200 x 100 x 100 = 20 लाख

यानंतर, जर करमणूक कर वजा केला, जो 30% दराने 6 लाख रुपये आहे, तर थिएटर मालकाकडे उर्वरित रक्कम 14 लाख होईल.

करारानुसार, थिएटर मालक वितरकाला 50 टक्के हिस्सा देईल, म्हणजे रु. 7 लाख रुपये. याचा अर्थ वितरकाने पहिल्या आठवड्यात 7 लाख रुपये कमावले.

दुसऱ्या आठवड्याचे कलेक्शन = 200 x 80 x 100 = 16 लाख. करमणूक कर कपातीनंतर थिएटर मालकासह कमाईचा एकूण हिस्सा = 1600000 - 480000 = 11 लाख 20 हजार

दुसऱ्या आठवड्यात वितरकाचा एकूण हिस्सा = 11 लाख 20 हजार पैकी 42% = 4 लाख 70 हजार 400

तिसऱ्या आठवड्यात, वितरकांचा एकूण हिस्सा = 4 लाख 70 हजार 400 च्या 30% होईल.

तत्सम वितरण धोरण सिंगल स्क्रीनवर देखील लागू आहे, परंतु एकूण कमाईपैकी 70-80 टक्के रक्कम वितरकाकडे जाते.

बातम्या आणखी आहेत...