आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:'ड्रीम गर्ल 2' साठी आयुष्मान पहिली पसंत, बिकिनी फोटोवर मीरा राजपूतच्या कॅप्शनने वेधले लक्ष आणि शेतकऱ्यांबद्दल भावूक झाली सोनाक्षी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2. करण जोहरने विजय देवरकोंडा-अनन्या पांडे स्टारर 'लिगर' ची रिलीज डेट घोषित केली

'ड्रीम गर्ल 2'मध्ये वरुण धवनला अप्रोच केलेल्या वृत्तांचे लेखक-दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी खंडन केले आहे. पहिल्या भागाप्रमाणेच सिक्वेलसाठी देखील आयुष्मान खुराणा त्यांची पहिली पसंती आहे. दैनिक भास्करसाठी अमित कर्णशी चर्चा करताना ते म्हणाले की, "आम्ही या चित्रपटासाठी कधीच वरुण धवनला ग्राह्य धरले नाही." आयुष्मान खुराणा बर्‍याच चित्रपटांमध्ये सतत व्यस्त असल्यामुळे निर्माते सिक्वेलमध्ये वरुण धवनला कास्ट करू शकतात अशी चर्चा होती.

2. करण जोहरने विजय देवरकोंडा-अनन्या पांडे स्टारर 'लिगर' ची रिलीज डेट घोषित केली

करण जोहरने अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा स्टारर 'लिगर' च्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करणने सोशल मीडियावर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. पोस्टरमध्ये देवरकोंडाचा रागीट अवतार दिसत आहे.

3. शाहिद कपूरच्या पत्नीने शेअर केला बिकिनी फोटो, कॅप्शनने वेधले लक्ष

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने गुरुवारी सोशल मीडियावर तिचा बिकनी फोटो शेअर केला. फोटो पेक्षा त्याच्या कॅप्शन लोकांना लक्ष वेधत आहे. मीराने लिहिले की, "बिकीनी बॉडी एवोकॅडोसारखी असते. आपण ते तयार होण्याची नेहमीच प्रतीक्षा करता आणि खराब होण्यासाठी फक्त एक दिवस लागतो." सोशल मीडिया युजर्स तिच्या लुकचे कौतुक करत आहेत तर कॅप्शनवर गमतीशीर कमेंट देखील करत आहेत.

4. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोनाक्षी सिन्हाने शेअर केली भावनिक कविता, विचारले - असे का?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर वरद भटनागरांची एक कविता शेअर केली, जी तिने शेतकऱ्यांसाठी लिहिली आहे. या भावनिक कवितेचे शीर्षक 'क्यों' आहे.