आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:शरमन जोशीला गोलमाल सीरिजमध्ये कमबॅक करायचे आहे, 'मला चित्रपटात घ्यायचे का नाही, हे रोहित सरच ठरवतील'- शरमन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

(किरण जैन)

शरमन जोशीची वेब सीरीज 'बारिश'चा दुसरा सीजन डिजिटल प्लॅटफार्मवर रिलीज झाला आहे. या सीरीजला मिक्स्ड रिव्ह्यू मिळत आहेत. नुकतच दैनिक भास्करसोबतच्या बातचीतदरम्यान शरमनने या सीरीजबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. यादरम्यान शरमनने रोहित शेट्टीची लोकप्रिय चित्रपट सीरिज 'गोलमाल'मध्ये कमबॅक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गोलमालच्या पहिल्या पार्टमध्ये शरमन जोशीने काम केले होते. पण, त्यानंतरच्या चित्रपटात तो दिसला नाही. त्याच्या जागी अभिनेता श्रेयस तळपदेला चित्रपटात घेण्यात आले. 

  • 'आपेक्षा पुर्ण करू न शकल्यामुळे माफी मागतो'

आपल्या वेब सीरिजबद्दल सांगताना शरमन म्हणाला की, अनेकांना 'बारिश 2' आवडली आहे. परंतू, अनेकांना सीजन-2 आवडलेला नाही. त्यांची मी माफी मागू इच्छितो. मी त्यांच्या आपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. आम्ही सर्वांनी खूप मन लावून काम केले आहे. ज्यांना हे सीजन आवडले नाही, त्यांना फक्त हेच सांगू शकतो की, पुढच्या वेळेस अजून मेहनत करुन तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल.

  • 'समीक्षकांचे मत महत्वाचे आहे'

अभिनेता म्हणून समीक्षकाचे मत माझ्यासाठी महत्वाचे आहे. दर्शक समीक्षकांचे मत जाणून घेतल्यानंतरच चित्रपट किंवा सीरिजला वेळ देते. क्वचितच समीक्षकांच्या मताऐवजी माउथ पब्लिसिटीमुळे एखादा चित्रपट किंवा सीरिज हीट होते.

  • 'वेब सीरीज केल्यामुळे आत्मविश्वास वाढला'

वेब सीरीज शूट करण्याचा अनुभव खूव वेगळा होता. मी बहुतेकवेळा थिएटर आणि चित्रपट केल्यामुळे सीरिज करण्याचा मला अनुभव नव्हता. वेब सीरिज केल्यानंतर माझ्यात आत्मविश्वास वाढला आहे.

  • 'किसिंग सीनमध्ये कम्फर्टेबल करण्याचे स्वप्न पूर्ण झाले'

या वेब सीरीजची किसिंग सीनमुळे खूप चर्चा झाली. मी यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये किसिंग सीन केल्यामुळे, यावेळी मला वेगळं वाटलं नाही. अशाचा पहिला सीन असल्यामुळे, ती थोडी नर्व्स होती. यापूर्वी जेव्हा चित्रपटात किसिंग सीन केला, तेव्हा मला अभिनेत्रीला कम्फर्टेबल करण्याची वेळ आली नाही, त्या स्वतःच कम्फर्टेबल असायच्या. यावेळी सह अभिनेत्रीला कम्फर्टेबल करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. 

  • 'अब्बास मस्तानच्या 'पेंटहाउस'ची शूटिंग लवकर सुरू होईल'

आगामी काळात मी उमेश शुक्लाच्या 'आंख मिचौली'चित्रपटात दिसणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. त्यानंतर मी नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल 'पेंटहाउस'मध्ये काम करत आहे. याला अब्बास मस्तान डायरेक्ट करत आहेत. लॉकडाउनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल.

  • 'रोहित शेट्टीच्या 'गोलमाल'मध्ये काम करायचे आहे'

मला रोहित शेट्टीचे चित्रपट खूप आवडतात. मला 'गोलमाल' फ्रेंचाइजीमध्ये कमबॅक करायला आवडेल. आता रोहित सरने ठरवावे, मला चित्रपटात घ्यायचे का नाही. 

बातम्या आणखी आहेत...