आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अपडेट:अभिनेत्री ईशा गुप्ता कोरोना पॉझिटिव्ह; उद्या प्रदर्शित होणार हृतिक रोशनचा 'विक्रम वेधा' लूक, वाढदिवसाला दिसणार पहिली झलक

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री ईशा गुप्ताचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये तिने ही माहिती दिली आहे. ईशाने लिहिले, "खूप खबरदारी घेतल्यानंतरही मी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मी कोविड प्रोटोकॉलचे पालन करत आहे आणि होम क्वारंटाईन आहे. कृपया सुरक्षित रहा आणि मास्क घाला, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या."

उद्या प्रदर्शित होणार हृतिक रोशनचा 'वेधा' लूक

अभिनेता हृतिक रोशनचा 10 जानेवारी (सोमवार) रोजी 48 वा वाढदिवस आहे. हृतिकच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, त्याच्या आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकच्या निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून हृतिकच्या वाढदिवसानिमित्त उद्या 'विक्रम वेधा' मधील त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित या चित्रपटात हृतिकशिवाय सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक 'वेधा' आणि सैफ 'विक्रम'च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात राधिका आपटेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2017 मध्ये आला होता. हा माधवन आणि विजय सेतुपती यांच्या विक्रम वेधा या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

पुढील आठवड्यापासून 'कैथी'च्या रिमेकच्या शूटिंगला सुरुवात
अभिनेता अजय देवगण यावर्षी धर्मेंद्र शर्मा दिग्दर्शित 'कैथी'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय पुढील आठवड्यापासून या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. कैथीचे दिग्दर्शक धर्मेंद्र शर्मा हे अजयचे चुलत भाऊ आहेत. अभिनेत्याने नुकतेच 'मैदान', 'थँक गॉड', 'रनवे 34', 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले. अजय 'रुद्र' या वेब शोद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...